Popular Writer Chetan Bhagat information in Marathi

प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांची माहिती
चेतन भगत यांचा जन्म 22 एप्रिल 1974 तारखेला दिल्लीत पंजाबी परिवारात झाला.त्यांचे वडील एक अधिकारी आहेत आणि त्यांची आई कृषी विभागातील सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. सुमारे एक दशकभर चेतन भगत हे होंकॉंग गोल्डमन सत्य सेवेच्या इन्व्हेस्टमेंट बँकर पदावर काम करत होते. गोल्डमन साचस इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनीमध्ये 27 अंतर्गत मुलाखती दिल्या नंतर त्यांची अखेर निवड झाली. तेथे राहूनही त्यांनी लेखन केले आहे. गोल्डमन सच होंग कोंग येथील इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनीमध्ये जवळजवळ दहा वर्षे काम करताना त्यांनी फाइव्ह पॉईंट समवन ही कादंबरी लिहिली त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ लेखक होण्यासाठी मुंबईमध्ये वास्तव करण्याचे ठरवले. चेतन भगत एक मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्त्व म्हणून युवापिढी मध्ये प्रसिद्ध आहे.
Writer Chetan Bhagat information in Marathi प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांची माहिती
त्यांचे प्राथमिक शिक्षण धौला कुवा, नवी दिल्ली येथील सैन्यातील सार्वजनिक शाळेत (army public school) झाले. 1978 ते 1991 पर्यंत शिक्षण घेत होते. नंतर आयआयटीमधून त्यांनी अभियांत्रिकी पदवी नवी दिल्ली येथून घेतली.1991 ते 1995 नंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद मे त्यांना ‘सर्वोत्कृष्ट नवोदित विद्यार्थी पुरस्कार’पदक प्रदान केले.
1998 मध्ये त्यांनी आय आय ॲम अहमदाबाद मध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या तामीळनाडूच्या अनुषा सूर्यनारायण यांच्याशी विवाह केला. चेतन भगत यांची ‘फाइव्ह पॉइंट समवन’ ही पहिलीवहिली कादंबरी सुद्धा सुपरहिट ठरली. ज्यावर नंतर थ्री इडीयट्स हा सिनेमा निघाला. त्यांची ‘वन नाईट ॲट कॉल सेंटर’ ही कादंबरी गुडगाव येथील एका कॉल सेंटर वर आधारित आहे.आजही अनेक पुस्तक विक्री दुकानांमध्ये त्यांच्या या दोन्ही कादंबर्या विक्रीचे उच्चांक मोडताना दिसतात. ‘गर्ल इन रूम १०५’ ही एक त्यांची प्रेम कथा कादंबरी सुवर्ण अभ्यंकर यांनी मराठीत अनुवाद केलेली आहे. इसवी सन 2008 मध्ये त्यांनी ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ ही कादंबरी लिहिली. टू स्टेट्स 2010 मध्ये प्रकाशित केलेली त्यांची कादंबरी उत्तर आणि दक्षिण यामध्ये होणाऱ्या विवाहाची व त्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर आधारित कादंबरी आहे. या कादंबरीवर ही टू स्टेट्स नावाचा सिनेमा निघालेला आहे.बरेच जाण ही कादंबरी त्यांच्या आयुष्याशी निगडीत असल्याचे सांगतात. पण ते कितपत सत्य आहे हे सांगता यायचे नाही. ‘रिव्होल्यूशन,’ ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘व्हॉट यंग इंडिया वॉन्ट’ या सुद्धा त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत ज्या अजूनही फाईव्ह स्टार या लिस्टमध्ये गणल्या जातात.
“When you fly high. People will throw stones at you, don’t look down. Fly
Higher so the stones won’t reach you.”
“World’s most sensible person and the biggest idiot both stay within us. The worst part is, you can’t even tell who is who.”
अशा काही विचारांचे चेतन भगत आज युवा पिढीसाठी एक मार्गदर्शक म्हटले जाऊ लागले आहेत. त्यांना इसवी सन 2004 मध्ये सोसायटी ऑफ फ्लॉवर्स हा पुरस्कार तर इसवी सन 2005 मध्ये पब्लिशर्स रेकग्निशन पुरस्कार मिळाला असून त्यांच्या प्रगतीचा ग्राफ वाढतच आहे. म्हणून “Try not to become a man of success,Rather become a man of value.” हे त्यांच्या बाबतीत खरे ठरते.
– गौरी डांगे.
Writer Chetan Bhagat information in Marathi प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांची माहिती
Leave a Reply