
POCO X2
XIAOMI कंपनी पासून स्वतंत्र झाल्यानंतर पोको कंपनीने पहिल्यांदा आपला स्वतंत्र स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कोणता दुसरा नव्हे तर तो POCO X2 आहे. POCO X2 च्या डिजाईन बद्दल सांगायचं म्हटलं तर फोनला ग्रेडियंट फिनिश चे चमकदार रूप दिले आहे. विशेष म्हणजे फोनचे डिजाईन हे त्याचे प्रमुख आकर्षण आहे. कंपनीने हा फोन दोन कलर अर्थातच फिनिक्स रेड आणि पर्पल मध्ये लॉन्च केला आहे.
POCO X2 ची बॅक केस 3D रूपात दिसून येते तसेच या मॉडेलला चार कॅमेरे दिले आहे जे 64+8+2+2mp प्रत्येकी आहेत. फ्रंटला दोन कॅमेरा असून ते 20+2 mp प्रत्येकी आहेत. फोनची स्क्रीन 6.67 इंच इतकी आहे जी सामान्य पेक्षा या फोनला अद्वितीय बनवते. फोनच्या डाव्या बाजूला पॉवर बटण आहे आणि त्याचा वरच्या बाजूस व्हॉल्युम बटण सेट केले आहे तसेच फोनच्या उजव्या बाजूला सिम कार्ड स्लॉट आहे. फोनला फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे जे फोनचे अधिक संरक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण आहे.
Qualcomm Snapdragon 730G हे चिपसेट या फोनमध्ये उपलब्ध आहे म्हणून या फोनला गेमिंगसाठी उत्तम मानले जाते. 6Gb Ram, 64Gb Internal storage च्या या वारिएंट मॉडेलला आपण 15,999/- मध्ये विकत घेऊ शकतो तसेच 128Gb च्या वारिएंटला आपण 16,999/- मध्ये विकत घेऊ शकतो. POCO X2 ची बॅटरी लाईफ देखील उत्तम आहे. सांगू इच्छितो की या फोनची बॅटरी 4500mAH इतक्या क्षमतेची आहे.
Xiaomi पासून स्वतंत्र झाल्यांनतर POCO ने आपले स्वतंत्र यूजर इंटरफेस लॉन्च केले आहे जे पोको लॉन्चर किंवा MIUI 11.0.3 या नावाने ओळखले जातात. सोबतच हा फोन PUBG साठी फास्टर आणि अप्रतिम आहे कारण त्यात इनबिल्ट सेटीन्ग्स आहेत.
अश्या प्रकारे एकंदरीत POCO X2 सर्व क्षेत्रात एक उत्तम स्मार्टफोन मानला जातो.
-नीरज भावसार कॉलेज कट्टा
Leave a Reply