पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आपण ठोस पावले उचलली नाहीत तर लवकरच आपल्याला दुसर्या ग्रहावर स्थलांतरण करावे लागेल. आणि हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही मग पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी कोणत्या महत्वाचा उपाय योजना कराव्यात हे जाणून घ्या. Paryavaran Samvardhan Kalachi Garaj Information Nibandh Essay in Marathi Language.
पर्यावरण संवर्धन काळाची गरज माहिती निबंध मराठी
StudyMode Paryavaran Sanrakshan Kalachi Garaj Nibandh Essay in Marathi language
पर्यावरण म्हणजे काय ?
आपल्या सभोवताली असणाऱ्या परिसराला पर्यावरण म्हणतात. यात सजीव निर्जीव या सर्व बाबी येतात. थोडक्यात हवा, पाणी, माती, सजीव या सर्वांचे मिळून पर्यावरण बनते. मानवनिर्मित गोष्टी देखील पर्यावरणात मोडतात. कारण तिथे माणूस राहतो म्हणजे त्या गोष्टी त्याचा परिसर झाला. सबोहतालचे वातावरण हे बदलत असतेच निसर्गात बदल झाला नसता तर पृथ्वी वर जीवसृष्टी तयार झालीच नसती. ऑक्सिजन तयार झाला नसता तर कदाचित आज माणूस नसता आणि असता तरी वेगळा असता. मुळातच निसर्गतः पर्यावरणात बदल घडत असतात.
StudyMode Paryavaran Sanrakshan Kalachi Garaj Nibandh Essay in Marathi language
आज पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. कारण निसर्गतः पर्यावरणात बदल होत असले तरी या बदलामध्ये मानवनिर्मित बदल हे पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत आहेत. दरवर्षी थोड-थोड पृथ्वीच तापमान वाढत आहे. असेच जर चालू राहिले तर आपलल्याला लवकरच दुसरा ग्रह बघावा लागेल आणि अशा प्रकारचे स्थलांतरण साहजीकच खूप खर्चिक असणार म्हणजे सर्वसामान्यांना ते परवडणारे नाहीच. मग आपण निसर्गाचा पर्यावरणाचा ऱ्हास का थांबवत नाही. ग्लोबल वॉर्मिंग मध्ये प्रदूषणाचा आणि वृक्षतोडीचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आज भारतात मोठी शहरे यात दिल्ली मुंबईची अवस्था खूप वाईट आहे. त्या ठिकाणी लोकाना हिवाळ्यात देखील ए सी वापरावा लागतो मग उन्हाळ्यात तापमान कुठे पोहचत असेल. मग अशा पर्यावरणात राहण्यात काय उपयोग जिथे मानवास किंवा इतर प्राण्यास अनुकूल वातारण नाही. आणि त्याच हिवाळ्यात भरपूर वृक्ष असणाऱ्या एखाद्या खेड्यात मनुष्य दुपारी उनात बसतो. किती हा विरोधाभास.
पर्यावरणासंबंधी चार्लस डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे त्यात ते असे म्हणतात की, सजीवांना त्यांच्या जीवनसंघर्षासाठी आणि उत्क्रांतीमध्ये पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव स्वतःमध्ये बदल घडवत नाहीत अथवा घडवू शकत नाहीत ते उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये नष्ट होतात. जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो. मानव आणि पर्यावरण यांचे परस्पर संबंध नेहमी बदलत असतात. पर्यावरणाचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे.
पर्यावरण संवर्धन जन जागृती करण्यासाठी 5 जून 1974 पासून 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.
Paryavaran Samvardhan Kalachi Garaj Information Nibandh Essay in Marathi Language
Environment Protection Information Essay Nibandh in Marathi language
पर्यावरणाच्या ऱ्हासाची कारणे-
आज माणूस स्वतःची भूक भागवण्यासाठी निसर्गाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास घडवत आहे. आज कारखानदारीसाठी, रस्ते, महामार्ग, रेल्वे तसेच शहरीकरण यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. परिसरातील जीवसृष्टीवर त्याचा वाईट परिणाम होत आहे.
- खाणकाम– माणसाने आपली विकृत भूक भागवण्यासाठी भूगर्भातील संसाधनाचा प्रचंड उपसा सुरु केला आहे. त्यामुळे परिसरातील जीवसृष्टीवर व पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम व्हायला लागला आहे.
- वृक्षतोड– डोंगर उतारावरील झाडे तोडून शेती तयार करणे, रस्ते, महामार्ग, रेल्वे, कारखाने, शहरीकरण यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. जंगले नष्ट होत आहेत. त्यामुळे या साऱ्याचे गंभीर परिणाम जीवसृष्टीला भोगावे लागत आहेत.
- प्रदूषण– कारखान्यातून बाहेर पडणारे दुषित पाणी, हवा, घन कचरा यामुळे आसपासच्या परिसरातील सजीवांवर वाईट परिणाम होतो. तसेच गाड्यांमधून बाहेर पडणारा कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डाय ऑक्साइड, यांसारख्या घटकांमुळे तापमान वाढत आहे.
- भूकंप– पर्यावरणाचा ऱ्हास घडण्यामध्ये भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचाही मोठा वाट आहे.
- दरड कोसळणे– माणूस आपल्या सोयीसाठी डोंगर पोखरून रस्ते तयार करणे, शेती करणे, वृक्षतोड करणे या कारणांमुळे डोंगरावरील मोठे दगड कोसळतात व मोठ्या प्रमाणावर हानी घडवून आणतात.
वरील सर्व कारणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो.
परिणाम–
जागतिक तापमानवाढ–
वाढते प्रदूषण, वाढती वृक्षतोड यांमुळे जागतिक तापमानवाढीची समस्या निर्माण झाली आहे. जागतिक तापमानवाढीचे गंभीर परिणाम मानवी आरोग्यावर होत आहेत. कॅन्सर सारखे आजार, उष्माघात यांसारखे परिणाम घडत आहेत.
वाढत्या तापमानामुळे अंटार्टिका खंडावर असणारा बर्फ वितळून अनेक शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण होत आहे.
वृक्षतोड मोठ्या प्रमाणात आल्याने जीवसृष्टीच व निसर्गच चक्र बदलल जाऊन त्याचा परिणाम ऋतुचक्र बदलण्यात झाले आहे. पाउस वेळेवर न आल्याने जीवसृष्टीवर गंभीर परिणाम घडत आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी उपाय–
Environment Protection Information Essay Nibandh in Marathi language
पर्यावरण संवर्धन काळाची गरज माहिती निबंध मराठी
- लोकांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जागृती निर्माण करणे.
- जलसंसाधनाच्या वापरासंबंधी लोकांमध्ये जागृती करणे.
- वृक्षतोड करणाऱ्याविरुध्द कठोर कारवाई करणे.
- पाठ्यपुस्तकात पर्यावरण संरक्षणाचा सामावेश करणे.
- वृक्षलागवड करणे.
- खाणी व अणुभट्ट्या यांना पर्यावरणाचे नियम घालून देणे.
- सार्वजनिक वाहनाचा वापर करणे.
- सायकलचा वापर करणे.
- इंधनबचतीसाठी मोहीम राबवने.
- लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणे.
- लाकडाला पर्याय म्हणून बायोगॅस चा वापर करणे.
- कारखान्यामधून निघणारे सांडपाणी ज्याच्यात विषारी मूलद्रव्ये असू शकतात असे सांडपाणी फिल्टर करूनच नदी पात्रात सोडावे.
- कारखान्याच्या धुराड्याला, गाडीचा धुराड्याला फिल्टर बसवावे जेणेकरून प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल.
- प्रदूषणरहित म्हणजे प्रदूषण कमी करणाऱ्या इंधनाची पर्यायी व्यवस्था निर्माण करावी.
मित्रांनो पर्यावरणाचा ऱ्हासा मध्ये मानवाचा खूप मोठा वाटा आहे म्हणून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी ही आपणच उचलायला हवी. प्रत्येकाने आपल्या उभ्या आयुष्यात कमीत कमी 10 झाडांचे संगोपन करावे संगोपन यासाठी की फक्त झाडे लाऊन उपयोग नाही त्यांचे संगोपन देखील करावे लागते. आपण आपल्या लेकरांना ज्याप्रमाणे जपतो त्याप्रमाणेच वृक्षांना देखल जपलं पाहिजे.
ही Paryavaran Samvardhan Kalachi Garaj Information Nibandh Essay in Marathi Language, StudyMode Paryavaran Sanrakshan Kalachi Garaj Nibandh Essay in Marathi language
माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा.
अशाच प्रकारची महत्वपूर्ण माहिती मराठी भाषेमधून वाचण्यासाठी आपल्या आवडत्या College Catta या संकेतस्थळाला पुन्हा भेट द्या, कारण College Catta म्हणजे माहितीचे व्यासपीठ. जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सहज साध्या भाषेत सादर केली जाते.
-भरत मोहळकर.
Fabulous writing or your word dictionary of Marathi thanks it helped me alot …