पी व्ही सिंधू ही रियो ओलिम्पिक्स मध्ये रौप्य आणि टोकियो मध्ये कांस्य पदक भारतासाठी जिंकण्याची किमया करणारी खेळाडू. P V Sindhu information Biography in Marathi पी व्ही सिंधू माहिती मराठी
पी व्ही सिंधू ही रियो ओलिम्पिक्स मध्ये रौप्य आणि टोकियो मध्ये कांस्य पदक भारतासाठी जिंकण्याची किमया करणारी खेळाडू. सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदाची कमाई केली आहे. या स्पर्धेचं जेतेपद पटकावणारी सिंधू पहिलीवहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे.पी. व्ही. सिंधू हिचं नाव ऑलिम्पिक रौप्य पदका पूर्वीपासूनच गाजत होतं. पुल्लेला गोपीचंद यांच्या अॅकेडमीत तिचं खडतर प्रशिक्षण हे तिच्या यशामागचं एक कारण आहेच. याच भारताची मान जागतिक पातळीवर ऊँचावरणाऱ्या कन्ये विषयी माहिती घेऊया.
पूर्सला वेंकटा सिन्धु चा जन्म एका तेलगु परिवारात झाला. तीचे वडील पी.व्ही रमण आणि आई चे नाव पी. विजया. असे आहे. हे दोन्ही माजी व्हाँलीबाँल खेळाडू आहेत. २००० मध्ये पी.व्ही. रमण यांना त्यांच्या खेळासाठी अर्जुन अवाँर्ड ने सन्मानीत केले गेले होते. आई वडील व्यावसायीक व्हाँलीबाँल खेळत असतांना पिव्ही सिंधूने आपण बॅडमिंटन खेळण्याचा निर्णय घेतलेला होता. आपल्या यशाचे प्रेरणास्त्रोत ती २००१ मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅंपियन पुल्लेला गोपीचंद यांना मानते. सिन्धू ने वयाच्या ८ व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरूवात केली होती. पी. व्ही. सिंधूने सर्वप्रथम महबूब अली यांच्या प्रशिक्षणाखाली या खेळाच्या मूलभूत माहिती समजून घेतली. सिकंदराबाद मधील भारतीय रेल्वे इंस्टीटयूट मधून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ती पुल्लेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी प्रशिक्षणासाठी शामील झाली. सिन्धू आपले प्रशिक्षण पूर्ण करीत असतानाच द. हिन्दू च्या एका लेखकाने लिहीने होते, पी व्ही सिन्धू प्रशिक्षणासाठी घरापासून ५६ किमी चा प्रवास करून आपल्या प्रशिक्षणास वेळ देणारी खेळाडू म्हंटले होते. हयावरून तिच्यातील खेळाप्रतिचे समर्पण दिसून येते. पि.व्ही. सिन्धू बाबत एक महत्वाची गोष्ट म्हणजे तीची जिद्द् आणि जिंकण्यासाठीची चिकाटी होय. हयामुळेच ती तिच्या प्रतिस्पर्धेच्या कमजोरीचा फायदा घेत जिंकत असते. अंडर १० इयर गटात सिन्धूने पाचवा सर्वो ऑल इंडिया रॅंकिंग चॅंपियनशिप तर युगल गटात ही ती अजिंक्य ठरली होती. त्यानंतर अंडर १३ च्या गटात पाँडीचेरी सब ज्युनियर चॅंम्पियनशिप मध्ये सिंगलकप तिने अर्जित केला होता. यासोबतच सिन्धूने कृष्णा खेतान ऑल इंडिया टूर्नामेंट १०८ आँल इंडिया रॅंकिंग सब ज्यूनियर नॅशनल आणि पूणे ऑल इंडिया रॅंकिंग सारखे कप आपल्या नावी केले. भारतातील ५१ व्या नॅशनल स्कुल गेम्स मध्ये अंडर १४ गटात तीने सुवर्ण पदक जिंकले होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधूने २००९ मध्ये कोलंबो मध्ये सबज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅंपियनशिप मध्ये रजत पदक जिंकले होते. २०१० ईराण फजर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज मध्ये सिन्धू ने एकल गटात रौप्य पदकाची कमाई केली. २०१० मध्ये मेक्सिको मध्ये ज्युनियर वर्ल्ड बॅडमिंटन चॅंपियनशिप मध्ये सिन्धू अंतिम ८ मध्ये पोहोचली होती. २०१० मध्ये उबेर कप साठीची भारतीय टिमची सदस्यही होती.२०१६ मध्ये सिंधूने रिओ ऑलिम्पिकमधील महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात जपानी खेळाडू नोजोमी ओकुहाराला पराभूत करून अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकून अंतिम फेरी गाठली. यासह, तिला भारतातील सर्वात युवा ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी प्रथम भारतीय महिला बॅडमिंटनपटू होण्याचा मान मिळाला आणि त्याने जगभरात स्वत: चे नाव कोरले.२०१९ मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेल्या पीव्ही सिंधूने अनेक वेळा पराभवानंतर हे स्थान मिळवले आहे. पीव्ही सिंधूने या स्पर्धेत बर्याच वेळा अंतिम फेरी गाठून सुवर्ण पदकाला मुकावले पण तिने कधीही माघार घेतली नाही आणि शेवटी या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले. पीव्ही सिंधूने स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०१९ च्या अंतिम सामन्यात जपानी खेळाडू नोजोमी ओकुहारावर मात केली, या सामन्यात ओकुहाराने वर्चस्व राखले आणि त्यांना सामन्यात परतण्याची संधी दिली नाही आणि तिने २१ -७ वर्ल्ड चॅम्पियन विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय बनली. पुरुष आणि महिला या दोन्ही गटातून भारतासाठी बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत अद्याप कोणीही सुवर्णपदक जिंकले नव्हते. या स्पर्धेत तिच्या महाजीतनंतर सिंधूने तिच्या करिअरची नोंद नोजोमी ओकुहाराविरुद्ध ९-७ अशी केली आहे.
पीव्ही सिंधूने बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत ५ पदके जिंकली आहेत, सिंधूने आतापर्यंत एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदके जिंकली आहेत.जगातील कोणत्याही महिला खेळाडूने पीव्ही सिंधूपेक्षा जास्त पदके जिंकली नाहीत. यासह सिंधू महिला एकेरीत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक जिंकून जगातील चौथी मोठी खेळाडू ठरली आहे. त्यांच्याआधी ली गोंग रुइना, लिंगवेई आणि झांग निंग यांनी जेतेपद नोंदवले आहे.हैदराबादमध्ये जन्मलेल्या या प्रतिभावान भारतीय पीव्ही सिंधूने सन २०१७ आणि २०१८ मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले, तर २०१३ आणि २०१४ मध्ये तिला या स्पर्धेत कांस्यपदक जिंकता आले. २०१३ मध्ये पीव्ही सिंधूने या स्पर्धेत प्रथमच वरिष्ठ पातळीवर तिची कौशल्य मिळवले. विश्वविजेतेपद जिंकून भारतासाठी सुवर्ण इतिहास रचणार्या पीव्ही सिंधू जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे, बॅडमिंटनच्या तिच्या अप्रतिम क्रीडा प्रतिभाने तिने जगात भारताला वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
टोकियो २०२० मध्ये संपूर्ण भारताला सिंधु कडून सुवर्ण पदकाची आशा होती सिंधु ने तशीच आपल्या नावाला साजेशि सुरुवातही केली. पण सेमी फाइनल मध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला आणि प्रत्येक भारतियाचे गोल्ड मेडल चे स्वप्न भंगले पण सिंधुने पदक जिंकावे अशी भारतियांची इच्छा होती आणि सिंधुने देशवासीयांना निराश नाही केले आणि कांस्य पदकावर आपले नाव कोरले.
सिंधुने भविष्यात ओलिम्पिक मध्ये भारतासाठी गोल्ड मेडल जिंकाव याच तिला भविष्यासाठी शुभेच्छा!
अक्षय जाधव.
P V Sindhu information Biography in Marathi
पी व्ही सिंधू माहिती मराठी
Badminton Player information in Marathi
Leave a Reply