Nikola Tesla information biography in Marathi Language
निकोला टेस्ला माहिती निबंध भाषण मराठी

“निकोला टेस्ला”
“If your hate could be turned into electricity, it would light up the whole world.”
वरील विचार वाचुन आपणाला लक्षात आले असेलच आपण कोणविषयी बोलणार आहोत.
वरील वाक्य आहे महान वैज्ञानिक, भौतिकशास्त्रज्ञ,संशोधक,विद्युत अभियंता ‘निकोला टेस्ला’ यांचे.
अनेक महत्वपूर्ण शोध लावणारा परंतु तरीही दुर्लक्षित राहणारा हा महान ‘शापित’ वैज्ञानिक.
मी विचारपूर्वक ईथे शापित हा शब्द वापरत आहे.
शापित म्हणजे आपल्या महाभारतातील ‘कर्णा’ सारखा असा समजन्याचा कृपया गैरसमज करु नये. यातील एक अर्जुनाच्या काळात जन्मला तर एक एडिसनच्या काळात हाच यांना असणारा शाप म्हणून शापित हा शब्दप्रयोग.
टेस्ला याचे शोध आइन्स्टाइन आणि एडिसन यांच्या शोधापेक्षा कधीच कमी नव्हते परंतु शांतपणे जगणाऱ्या या माणसाला आइन्स्टाइन आणि एडिसन यांचे आकर्षण नव्हते. टेस्लाला विज्ञान समजले,परंतु सामाजिक व्यव्हारज्ञान नाही. त्यामुळे एडिसन आणि आइन्स्टाइन यांना मिळालेली किर्ती त्याला कधी मिळू शकली नाही.
टेस्ला कोण होता हे समजन्यासाठी पुढील ओळ पुरेशी आहे- “हा तोच आहे ज्याने पृथ्वीला प्रकाशाने सजविले”.
Nikola Tesla information biography in Marathi Language
निकोला टेस्ला माहिती निबंध भाषण मराठी
निकोला टेस्ला यांचा जीवनपरिचय
निकोला टेस्ला यांचा जन्म सध्याच्या क्रोएशियामध्ये १० जुलै १८५६ रोजी झाला टेस्ला हा वडील मिलुतिन टेस्ला आणि आई डुका टेस्ला यांच्या ५ अपत्यांपैकी १ अपत्य होते. जेव्हा टेस्ला शाळेत होता तेव्हा गणिताचे कठिण प्रश्न केवळ मनातल्या मनात सोडवत असे.
१९७५ मध्ये त्याने पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रवेश मिळविला आणि तिथे ९ परिक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
१८८१ मध्ये त्याला टेलीग्राफ कंपनित नोकरी मिळाली जिथे त्याने संप्रेषण उपकरनांमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आणि टेलीफोन एम्पलीफायरची नव्याने रचना केली. परंतु त्याने त्यावर पेटंट लावले नाही.
निकोला टेस्ला आणि एडिसन यांच्यातील वाद संघर्ष
टेस्ला-एडिसन वाद
विज्ञान जगतात टेस्ला आणि एडिसन यांच्यातील वाद हा खुप चर्चेचा विषय राहीला आहे. जेव्हा टेस्ला ने एडिसन सोबत काम केले तेव्हा एडिसनने टेस्ला ला आपले जनरेटर आणि मोटर अधिक चांगले बनविन्याचे आव्हान दिले आणि म्हणाला की जर टेस्ला ने है काम केले तर एडिसन त्याला काही हजार डॉलर्स देईल.
जेव्हा टेस्ला ने स्वतःच्या मेहनतीने आणि हुशारीने है काम केले तेव्हा एडिसनने आपला दिलेला शब्द मागे घेतला हेच कारण ठरले तय दोघांमधील वादाला. त्यानंतर टेस्ला ने एडिसनची कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर टेस्लाने उद्योगपती जॉर्ज वेस्टिंगयांच्यासोबत AC प्रणाली जगसमोर ठेवली. या प्रणालीचा एडिसनच्या उद्योगावर परिणाम होणार होता म्हणून एडिसनने याला जोरदार विरोध केला.
कारण त्यावेळी सम्पूर्ण यूनाइटेड स्टेट्स मध्ये DC ऊर्जा प्रणाली कार्यरत होती आणि त्याची कंपनी मोठ्या प्रमाणावर DC आधारित उपकरणे तयार करत होती.
एडिसन याने AC बद्दल लोकांच्या मनात भीति निर्माण करण्यासाठी खुप अफवा पसरविल्या त्याने सांगितले की AC विज खुप खतरनाक आहे है सिद्ध करण्यासाठी त्याने अनेक लोकांसमोर एका हत्तीला AC विजेचा झटका देउन ठार केले. परंतु प्रत्येक घरात विज केवळ AC पावर्समुळेच पोहचु शकली आणि शेवटी टेस्ला विजयी झाला.
म्हणूनच वर उल्लेख केला आहे की हा तोच टेस्ला ज्याने पृथ्वीला विजेने सजविले.
एडिसन टेस्ला चा द्वेष करत होता जेव्हा मार्कोनी आणि टेस्ला यांच्यातील रेडिओच्या शोधमुळे वाद निर्माण झाले, तेव्हा एडिसनने मार्कोनीची बाजू उचलून धरली. एडिसन आणि टेस्ला यांच्यात बरेच संघर्ष झाले असले तरीही एडिसनने शेवटच्या वर्षांत टेस्लाप्रति आपल्या चुकीच्या व्यवहाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
मृत्यु
नंतरच्या काळात त्यांचे काही प्रयोग अयशस्वी ठरले त्यामुळे ते नैराश्याला बळी पडले. त्यांनी बाहेरिल लोकांशी भेट घेणे बंद केले. ७ जानेवारी १९४३ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
टेस्ला एक विलक्षण शास्रज्ञ ज्याने वायरलेस एनर्जी आणि मृत्युकिरण यासारख्या आश्चर्यकारक गोष्टींवरही काम केले. त्याच्या बऱ्याच गोंधळून टाकणाऱ्या व्यवहारामुळे ते ओळखले जात होते. पण आता असे मानले जाते की त्यांना Obsessive-compulsive disorder (OCD) हा आजार होता त्यांच्यासारख्या एकट्या राहणाऱ्या वे वैज्ञानिकाला हा आजार होणे ही सामान्य गोष्ट आहे.
“Be alone, that is the secret of invension; be alone, that is when ideas are born.”
निकोला टेस्ला यांचे शोध
१-AC विज– AC पूर्वी DC प्रणाली संपूर्ण अमेरिकेत चालली होती. DC हा विद्युत प्रवाह आहे जो एका दिशेने वाहतो. परंतु टेस्ला ने डीसी च्या बऱ्याच त्रुटिंवर प्रकाश टाकला आणि AC सिस्टम कार्यान्वित केली. AC पावर चा फायदा असा आहे की इलेक्ट्रिक पावर सतत दिशा बदलत राहते. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते DC पावर पेक्षा खुप दूर पाठवले जाऊ शकतात आणि यात इलेक्ट्रिकल खपत देखील कमी असते.
२-इलेक्ट्रिक मोटर ( AC motor)–टेस्ला ची AC इलेक्ट्रिक मोटरच्या शोधामुळे आज संपूर्ण जगात कूलर,फॅन, आणि इतर फिरणाऱ्या विद्युत उपकरणे चालतात.
३-पहिले जलविद्युत केंद्र–त्यांनी पहिले जलविद्युत केंद्र उभारले जे नंतर सर्व धरणांतून विज निर्मितिची कल्पना बनली.
४-रेडिओ आणि टेस्ला रॉड–मार्कोनी रेडिओ चा शोधक मानला जातो परंतु है देखील सत्य आहे की या शोधात टेस्ला यांचे योगदान देखील कमी नाही. त्याने असे सिद्धान्त मांडले की वातावरणाच्या बाह्य आयनोस्फीयरद्वारे रेडिओ लहरी जगभर पाठविल्या जाऊ शकतात
५-वायरलेस कम्युनिकेशन–१८९०-१९०६ पर्यंत टेस्ला ने वायरलेस पद्धतीने एका ठिकानाहुन दुसऱ्या ठिकाणी विज पोहचविन्याच्या मार्गावर काम केले परंतु त्याला यात यश मिळू शकले नाही परंतु त्याची कल्पना नंतर लेसर किरणांचा (Laser Rays) आधार बनली. या आधारे त्यांनी आकाशात चमकनारी लाखो वोल्ट विज तयार केली तेव्हा सगळे चकित झाले.
मैग्नेटिक प्रभाव, रिमोट कंट्रोल, आणि रडार यांचा शोध टेस्ला यांनीच लावला. त्याला आयुष्यभरात ३०० पेटेंट्स मिळाली. याव्यतिरिक्त टेस्ला ने बरेच शोध लावले पण त्यांना पेटेंट मिळू शकले नाही.
I don’t care that they stole my idea . . I care that they don’t have any of their own–निकोला टेस्ला
सन्मान
१-चंद्रावरील २ की.मी. व्यासाच्या खड्याचे नाव टेस्ला आहे.
२- मंगल आणि गुरु ग्रहादरम्यान आढळल्या एक लघुग्रहाला २२४४ टेस्ला हे नाव देण्यात आले आहे.
३-सर्बियामध्ये विद्युत घराला TPP टेस्ला हे नाव देण्यात आले आहे. सर्बियाच्या १०० च्या नोटेवर टेस्ला चे चित्र आहे.
४- विद्युत कार बनवणाऱ्या अमेरिकन कंपनीके नाव टेस्ला मोटर्स आहे.
५- त्यांच्या नावाने टेस्ला पुरस्कार दिला जातो.
हा महान पण आपल्या भारतीय लोकांच्या परिचयाच्या नसलेल्या ‘निकोला टेस्ला’ यांचा थोडक्यात जीवनपरिचय.
अक्षय जाधव
कडूस, राजगुरुनगर.
Nikola Tesla information biography in Marathi Language
निकोला टेस्ला माहिती निबंध भाषण मराठी
टेस्ला काँइल मराठी माहिती
निकोला टेस्ला आणि एडिसन यांच्यातील वाद संघर्ष
टेस्ला आणि मार्कोनी मधील शोध पेटंट संघर्ष
Scientist information in marathi language
वैज्ञानिक शास्त्रज्ञ माहिती मराठी
Nikola Tesla information biography in Marathi Language
निकोला टेस्ला माहिती निबंध भाषण मराठी मित्रांनो, ही महत्वपूर्ण माहिती कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. अशा पद्धतीची माहिती वाचण्यासाठी कॉलेज कट्टाला सबस्क्राईब करा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Leave a Reply