भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हां वीरता पदक मिळवणारी नीरजा भनोत ही हवाई सुंदरी कोण आहे जाणून घ्या…
Neerja Bhanot Biography information in Marathi नीरजा भनोत
काही वर्षांपूर्वी आलेला नीरजा हा हिंदी चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित होता. त्यात सोनम कपूरच्या कामाचे खुप कौतुक झाले पण खरी नीरजा भनोत कोणाच्या लक्षात नाही. आज कोणाला त्यांच्या बद्दल विचारले तर सोनम कपूरचे नाव सांगतात ही तर आपल्या दशाची शोकांतिका आहे. पाकिस्तान ने सुद्धा त्यांच्या वीरतेबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. तर आज आपण नीरजा भनोत विषयी माहिती घेऊया.
मुंबईचे पत्रकार हरीश भनोट आणि रमा भनोट यांची मुलगी नीरजाचा जन्म ७ सप्टेंबर १९६३ मध्ये चंडीगढ येथे झाला होता. नीरजाने बॉम्बे स्कॉटिश शाळेतून स्कूलिंग करून सेंट झेवियर्स कॉलेजहून ग्रॅज्युएशन केले होते. तिचे आई वडील तिला प्रेमाने ‘लाडो’ म्हणत होते. 21 वर्षात नीरजाचे लग्न झाले होते आणि ती नवर्यासोबत वेस्टर्न एशिया गेली होती पण हुंडा प्रकरणामुळे ती मुंबईत परतली. त्यांचा नवरा त्यांचा मानसिक छळ करत असे. येथे येऊन तिने पॅन अमेरिकन एअरवेजमध्ये नोकरी करणे सुरू केले. असे म्हणतात की ट्रेनिंग दरम्यान नीरजाला एंटी-हायजॅकिंग कोर्समध्ये प्रवेश घ्यावे लागले होते तर तिच्या आईने तिला नोकरी सोडायला सांगितले, तर नीरजाचे उत्तर होते – जर सर्व आयांनी अशाच विचार केला तर देशाचे भविष्य काय होईल? एअर-होस्टेस बनण्या अगोदर तिने बेंजर सारीज, बिनाका टूथपेस्ट, गोदरेज बेस्ट डिटरजेंट, वॅपरेक्स आणि विको टरमरिक क्रीम सारख्या उत्पादांसाठी मॉडलिंग केले होते.
Neerja Bhanot Biography information in Marathi
५ सप्टेम्बर १९८६ मध्ये पाकिस्तान मधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या Pan Am 73 एयरलाइंसच्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले. त्या विमानात ४०० प्रवासी होते . निरजा सुद्धा याच विमानात होती . अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्राइल मधल्या कोणत्या तरी इमारतीला धड़कावयाचे होते. विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेवुन जाऊ शकत नव्हते . अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलटची मागणी केली . पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली . अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाश्यांना मारायची धमकी दिली . त्यांनी निरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले . त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाश्यांना निवडून मारायची धमकी देवून पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते. निरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफिने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले . त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाश्याला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला . पण निरिजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाश्याचे प्राण वाचविले.
निरिजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल . या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे निरजाने ठरविले त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरु केले . तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजा बद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाश्यां पर्यंत पोहोचविले . निरजाने जसा विचार केला होता तसेच घडले . थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्ण पणे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेवुन निरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले . प्रवाश्यांनी देखील पटापट विमाना बाहेर उड्या मारल्या.अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला . काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले . सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत निरजा विमानात थांबली होती . आता ती विमानातून बाहेर पडणार एतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला . एव्हड्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते . त्यांनी त्या चार अतिरेक्यां पैकी तिन जणांना मारून टाकले . निरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेव्हड्यात तो चौथा अतिरेकी निरजाच्या समोर आला . निरजानी त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या . त्यातच तीचा अंत झाला . १७ तास अतिरेक्यांशी झुजंत चारशे प्रवाश्यांना वाचवुन निरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देवून गेला. निरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलां पैकी एक जण मोठा झाल्या वर वैमानिक झाला . त्याने त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर निराजाचा हक्क आहे.
शूर असलेल्या नीरजाच्या निधनानंतर पाकिस्तानला अश्रू अनावर झाले व त्यांनी तिला ‘तमगा-ए-इंसानियत’ या पुरस्कारने गौरवले.’अशोक चक्र’ या पुरस्कारासोबतच नीरजाला ‘फ्लाइट सेफ्टी फाउंडेशन हिरोइजम अवॉर्ड’, ‘यूएसए’, ‘तमगा-ए-इंसानियत-पाकिस्तान’, ‘जस्टिस फॉर क्राइम्स अवॉर्ड’, ‘यूनाइटेड स्टेट्स अटॉर्नीज ऑफिस फॉर द डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया’, ‘स्पेशल करेज अवॉर्ड’, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अवघ्या २३ व्या वर्षी वीरगती प्राप्त केलेल्या या शुर कन्येला प्रत्येक भारतियाने लक्षात ठेवले पाहिले.
-अक्षय जाधव.
Neerja Bhanot Biography information in Marathi
नीरजा भनोट माहिती मराठी
Leave a Reply