अंतराळ संशोधन संस्थामधील नासा हे अग्रगण्य नाव. रशियाला मागे टाकून नासा कशा पद्धतीने पुढे गेली जाणून घ्या NASA Information in Marathi नासा या संस्थेची माहिती
National Aeronautics And Space Administration (NASA)
नासा ही संस्था कोठे आहे ती काय काम करते
अंतराळ संशोधन संस्था म्हटल की आपल्या तोंडून सहाजिकच अमेरिकेमधील कँलीफोर्निया येथील ‘नासा‘ या संस्थेचे नाव पुढे येते. यावरूनच नासाचे कार्य किती मोठे आहे याचा आपल्याला अंदाज येतो.
नासा अंतराळ संशोधन केंद्र
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, जागतिक स्तरावर फक्त दोनच महासत्ता अस्तित्वात होत्या. त्या दोन महासत्ता म्हणजे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका. त्या दोघांनाही दुस-यापेक्षा जास्त बलशाली व आधुनिक देश बनवण्याची इच्छा होती. साहजिकच त्यांच्यात अतिशय आक्रमक अशी स्पर्धा सुरू झाली ज्याचा शिरकाव प्रत्येक क्षेत्रात सुरू झाला, खासकरून संरक्षण व अवकाश संशोधनाच्या विभागात. ऑक्टोबर १९५७ मध्ये सोव्हियत संघाने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी स्पुटनिक उपग्रह अंतराळात लाँच केला तेव्हा तो आपल्या या अभियानाबरोबरच अंतराळ स्पर्धेत अमेरिकेपेक्षा बराच पुढे निघून गेला. अर्थात शीतयुद्ध अजूनही सुरूच होते आणि कोणत्याही प्रकारे सोव्हियत संघाचं हे पुढे जाणं कमी करण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू होते. अमेरिकेने आधीच एक उपग्रह तयार केला होता. अर्थात त्याची निर्मिती नासाच्या कार्यक्रमांतर्गत झालेली नव्हती. पण, अंतराळ स्पर्धेत सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी अमेरिका सुनियोजित अंतराळ संस्था बनवण्याच्या मार्गावर आहे, हे त्यावेळी स्पष्ट दिसत होतं. सोव्हियत संघाच्या अंतराळ कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसनआवर आणि सिनेटर लिण्डन बी जॉन्सन यांनी नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) स्थापनेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याला वेग दिला. अर्थात असं असूनही नासाला अस्तित्वात येण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागला आणि २९ जुलै १९५८ मध्ये ती अस्तित्वात आली.
१९५८ साली या संस्थेची स्थापना झाली. नासाने आपलं पहिलं अंतराळ यान एक्सप्लोअरर-१ हे १९५८ मध्ये लाँच केलं. या अंतराळ संशोधन संस्थेने आतापर्यंत अनेक यशस्वी योजना राबवल्या असून चंद्रावर पहिलं मानवी पाऊल ठेवण्याचं श्रेय त्याच देशाला जातं.
विराट विश्वाची ‘आभाळमाया’ नेमकी कशी आहे त्याचा ‘प्रत्यक्ष’ धांडोळा घेणारा एक शक्तिशाली ‘डोळा’ सँटेलाईट कॅमेरा camera १९९० मध्ये ‘नासा’या अमेरिकेचा अवकाशविज्ञान संस्थेने अवकाशात पाठवला आणि त्याने देदीप्यमान कामगिरी करून विश्वातील ग्रह, तारे, दीर्घिका, तेजोमेघ या सर्वांची लाखो तेजस्वी छायाचित्रं पृथ्वीकडे पाठवली. आता मंगळावर जीवन आहे की नाही यासाठी या संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.
अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नासा ही जगात अग्रस्थानी आहे. मंगळाबद्दल माणसाला फार पूर्वीपासूनच आकर्षण वाटत आलेले आहे. नासाने मंगळाबद्दलच्या याच कुतुहलापायी अनेक मोहिमा यशस्वीरीत्या राबविल्या. नासाने मार्स पाथफाइंडरद्वारे सोजनर हे स्वयंचलित निरीक्षण वाहन मंगळावर उतरवले आणि ही मोहीम बऱ्याचअंशी यशस्वी झाली. याद्वारे मंगळाची अनेक छायाचित्रे प्राप्त झाली. याच्या यशस्वितेनंतर नासाने २००७ मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त फोनिक्स लॅंडर पाठवले. हे यान एक मीटरपर्यंत माती खणत होते आणि त्यात उच्च प्रतीचा सूक्ष्मदर्शी कॅमेरा होता. आजवरच्या विविध यान मोहिमांमधून मंगळावर बर्फ, हायड्रोजन, मिथेन, अरोरा (ध्रुवीय प्रकाश), पाणी, जास्त काळ टिकणारी वादळे इत्यादी बाबी आढळून आल्या आहेत. त्यावर संशोधक मोठ्या प्रमाणावर संशोधन करत आहेत.
अर्थात, अनेक अभियानांमध्ये नासाला अपयशाची चवही चाखावी लागली. अपोलो -१ या मोहीमेच्या रंगीत तालीमीच्या वेळी १९६७ मध्ये आग लागून सहभागी तीन अंतराळवीर मृत्युमुखी पडले होते. २८ जानेवारी १९८६ रोजी चॅलेंजरने आकाशात झेप घेतली आणि केवळ ७३ सेकंदांमधे एक आकाशात लोळ उठलेला दिसला.१ फेब्रुवारी २००३ ला अशाच एका दुर्घटनेत स्पेस शटल कोलंबियामधे कल्पना चावला ह्या भारतीय वंशाच्या प्रथमच स्त्री आंतराळविरांगनेस असेच आंतराळप्रवास यशस्वी पणे येत असताना अपघातात बलीदान द्यावे लागले होते. असं असूनही अंतराळ अन्वेषणाच्या बाबतीत नासाच्या तंत्रज्ञानाचा बोलबाला चहुबाजूला राहिला आहे. नासाने एका सुपर कॉम्प्युटरचे नाव कल्पना चावला ठेवले आहे.
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
NASA Information in Marathi
नासा या संस्थेची माहिती
information about nasa in marathi
नासा अंतराळ संशोधन केंद्र
नासा या अंतराळ संशोधन केंद्राचे मुख्य ठिकाण
नासा या संस्थेची माहिती
नासा ही संस्था कोठे आहे ती काय काम करते
National Aeronautics And Space Administration (NASA)
Leave a Reply