मुळव्याध वर उपाय घरगुती उपचार करून लगेच आराम मिळावा
मुळव्याध आहे घाबरून जाऊ नका. नियमित पणे आहारातील पथ्य, व्यायाम आणि हे आयुर्वेदिक घरगुती उपचार करून बघा काही दिवसातच फरक जाणवेल.
Mulvyadh Gharguti Upay Ayurvedic Upchar Mahiti in Marathi Language
मुळव्याध म्हणजे काय ?
मुलाव्याधी म्हणजे मानवी शरीराच्या मुळाशी होणारी व्याधी आहे. आज घडीला भारतात ४ कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत तर दरवर्षी १० लाख लोकांना हा आजार नव्याने होतो. पूर्वी मुल्व्याधी हा आजार साधारणपणे वयाच्या चाळीशी नंतर व्हायचा पण आता या आजाराचे रुग्ण अगदी १८ ते २५ या वयोगटातही आढळतात. त्यात सुमारे १२ टक्के रुग्ण हे याच वयोगटातील आहेत. त्यामुळे या आजाराची दाखल जागतिक आरोग्य संघटनेने घेऊन २० डिसेंबर हा दिवस जागतिक मुळव्याध दिन म्हणून म्हणून पाळला जातो.
मुळव्याध विषयी माहिती
मुलाव्याधी दोन प्रकारची असते. एक अंतर्व्याधी आणि दुसरी बाह्यव्याधी त्याची अनेक कारणे आहेत.
मुळव्याध होण्याची कारणे-
Mulvyadh Pathya in Marathi मुळव्याध आहार काय घ्यावा
- आहारातील तंतुमय पदार्थांची कमतरता.
- व्यायामाचा अभाव.
- एकाच जागेवर जास्त वेळ बसणे.
- सतत उष्ण पदार्थ खाणे.
- तिखट पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे.
- अनियमित दिनश्चर्या.
- रक्तदोष
- वेळच्या वेळी शौचास न जाणे.
- अतिजागरण.
- मधुमेह.
- वृद्धत्वामुळे पचनक्रियेत येणार दौर्बल्य.
- गरोदरपणात शरीरात होणारे बदल.
- जोर देऊन शौच करणे.
- बुद्धकोष्टता.
- चहा व कॉफीच जास्त प्रमाणात सेवन करणे.
या सर्व कारणांमुळे मुलाव्याध हा आजार होतो.
Mulvyadh Gharguti Upay Ayurvedic Upchar Mahiti in Marathi Language
मुळव्याध आजाराची लक्षणे-
Mulvyadh chi Lakshane ani Upay
मुळव्याध या आजाराच्या अवस्थेनुसार लक्षणे आढळतात.
- प्रथमावस्था– मुलाव्याधीच्या प्रथमावस्थेत खाज येणे, वेदना होणे, कमी प्रमाणात दाह होणे हि लक्षणे आढळतात.
- द्वितीयावस्था – या अवस्थेमध्ये गुदद्वाराच्या ठिकाणी आग होणे, खाज येणे त्यासोबतच शौचाच्या वेळी दुखणे, बुद्धाकोष्टता, मलावरोध, व रक्तस्राव हि लक्षणे आढळतात. तसेच शौचाच्या वेळी गुदद्वाराच्या ठिकाणी मोड आल्यासारखे वाटते.
- ततृतीयावस्था– या अवस्थेमध्ये शौच्याच्या वेळी प्रचंड प्रमाणात आग होणे, खाज येणे,बुद्धकोष्टता, रक्तस्राव व भयंकर वेदना होतात व टोचल्यासारखं होण्याची लक्षण वाढतात. या अवस्थेत रुग्णाला बाहेर येणारे मोड हाताने आत ढकलावे लागतात.
- चतुर्थावस्था – या अवस्थेमध्ये वर सांगितलेल्या लक्षणांच प्रमाण प्रचंड वाढत जात व बाहेर आलेले मोड परत आत जात नाहीत.
मुळव्याध वर उपाय घरगुती उपचार:-
Mulvyadh Home Made Upay in Marathi Ayurvedic
आजही अनेक लोकांमध्ये वेगवेगळे गैरसमज आहेत. ते स्पष्टपणे बोलत नाहीत. पण हा आजार न सांगता येणारा आणि न दाखवता येणारा असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते पण याच दुर्लक्षामुळे त्याचा भयंकर त्रास हा रुग्णाला होत असतो. यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. मुलाव्याधीवर आयुर्वेदिक उपचारही महत्वाची भूमिका बजावतात.
आयुर्वेदिक उपाय- मुळव्याध कोंब आयुर्वेदिक औषध:-
या उपचारामध्ये सुरणाच्या कंदाची वरची साल काढून टाकावी आणि आतील गुलाबी भागाचे बटाट्यासारख्या काचर्या करून त्या शुध्द गाईच्या तुपात परताव्या व खाव्यात. यात मीठ टाकू नये. ही भाजी अधूनमधून खात जावी. त्यासोबतच हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे यासारख्या चोथायुक्त पदार्थांचा आहारात वापर करावा. साध्या मीठाऐवजी संधव मिठाचा वापर करावा. आहारात दही, ताक यांचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे. तिखट खाऊ नये. जास्त चहा व कॉफी सेवन करू नये. जेवण वेळच्या वेळी करावे. हे मुळव्याध कोंब आयुर्वेदिक औषध वापरून बघा नक्की फायदा होईल.
ऍलोपॅथी–
अनेक दिवस लोक उपचाराविना राहतात. यातच हा आजार बळावतो आणि मग शास्राक्रिया करण्यावाचून दुसरा उपाय नसतो. यात रुग्णाने पथ्य पालन करणे अत्यंत आवश्यक असते.
हे “मुळव्याध वर उपाय घरगुती उपचार” ‘Mulvyadh Gharguti Upay Ayurvedic Upchar Mahiti in Marathi Language’ तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा आणि ही पोस्ट नक्की शेअर करा.
आपल्या आवडत्या College Catta ‘College Katta’ वर वेगवेगळी आणि महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी पुन्हा भेट द्या.
-भरत.दि.मोहळकर.
Mulvyadh Pathya in Marathi Mulvyadh Home Made Upay in Marathi Ayurvedic Mulvyadh chi Lakshane ani Upay
मुळव्याध आहार काय घ्यावा.
Leave a Reply