Mukesh Ambani information Biography in Marathi

मुकेश अंबानी हे एक भारतीय उद्योगपती तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. अफाट वैयक्तिक संपत्तीचे मालक मुकेश अंबानी यांचे नाव भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश आहे. एवढंच नाही तर मुकेश अंबानींची तुलना जगातील मोठमोठ्या उद्योगपतींशी देखील केली जाते. मुकेश अंबानी हे रिलायन्स कंपनीचे संचालक स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांचे पुत्र तसेच ‘रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप’ चे अध्यक्ष अनिल अंबानी यांचे मोठे बंधू आहेत. तर चला मग जाणून घेऊया अश्या यशस्वी उद्योगपतींच्या जीवन चारित्र्याबद्दल…
Mukesh Ambani information Biography in Marathi मुकेश अंबानी यांच्याबद्दल माहिती मराठी
जन्म आणि प्रारंभिक जीवन:
मुकेश अंबानी यांचा जन्म १९ एप्रिल १९५७ रोजी यमन मध्ये स्थित अदेन शहरात धीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी यांचा घरात झाला. त्या काळात धीरूभाई अदेन मध्ये काम करीत असायचे. मुकेश अंबानी यांना एक लहान भाऊ- अनिल अंबानी असून दोन बहिणी नामे दीप्ती आणि नीना होते. १९७० दरम्यान धीरूभाई अदेनहुन मुंबई येथे स्थलांतरीत झाले, सुरुवातीला त्यांचा संपूर्ण परिवार भुलेश्वर मधील दोन रूमच्या घरात राहायचा. त्यानंतर धीरूभाईंनी कुलाबा क्षेत्रातील एक १४ मजली इमारत (सी. विंड) विकत घेऊन टाकली त्यानंतर ते तेथे राहायला गेले.
मुकेश अंबानी यांचं प्रारंभिक शिक्षण मुंबईतील पेड्डार रोडवर स्थित हिल ग्रांज हाय स्कूल मध्ये झालं. मुकेश अंबानी यांचे मित्र आनंद जैन आणि लहान भाऊ अनिल अंबानी यांनी देखील याच शाळेतून शिक्षण घेतलं आहे. ‘इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, माटुंगा’ येथून मुकेश अंबानींनी बॅचलर ऑफ इंजिनीरिंग ची डिग्री प्राप्त केली. यानंतर, त्यांनी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी मधून एमबीए करण्यासाठी प्रवेश घेतले मात्र, एका वर्षानंतर वडील धीरूभाई यांच्या उद्योगात मदतीसाठी त्यांनी शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला व भारतात परतले.
Mukesh Ambani information Biography in Marathi मुकेश अंबानी यांच्याबद्दल माहिती मराठी
करियर:
इंदिरा गांधी सरकारने १९८० दरम्यान पीएफवाय (पॉलिस्टर फिलॉमेंट यार्न) खाजगी क्षेत्रांसाठी सुरु केले. त्यानंतर, रिलायन्स कंपनीने देखील पीएफवायचा परवाना प्राप्त करण्यासाठी आपली दावेदारी पेश केली होती. रिलायन्स सोबतच टाटा बिर्ला आणि आणखी ४३ दिग्गज कंपन्यांना परवाना मिळवण्यात यश आले. एमबीए चे शिक्षण घेत असतांना मुकेश अंबानींना पीएफवाय च्या फॅक्टरीवर निरीक्षण आणि उद्योगात मदतीसाठी भारतात बोलावले गेले. मुकेश यांनी मग भारतात आल्यावर पीएफवायचा संपूर्ण कारभार सांभाळला.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्सने भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी ‘रिलायन्स इन्फोकॉम लिमिटेड’ सध्या रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड म्हणून प्रसिद्ध याची स्थापना केली. मूलभूत स्तरावर जामनगर (गुजरात) येथे जगातील सर्वात मोठी पेट्रोलियम रिफायनरी उभारण्यात मुकेश यांचे मोलाचे योगदान होते. या रिफायनरीची क्षमता साल २०१० मध्ये दररोज 6,60,000 बॅरेल इतकी होती. तेच वर्षभरात दशलक्ष टन. सुमारे 100000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने बनवलेल्या या रिफायनरीमध्ये पेट्रोकेमिकल, वीज निर्मिती आणि संबंधित पायाभूत सुविधा आहेत. त्यानंतर, रिलायन्स इंडस्ट्रीजने पुन्हा एकदा ‘रिलायन्स जिओ’ च्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रात पाऊल टाकला.
वैयक्तिक जीवन:
मुकेश अंबानी हे दिगवन्त धीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी यांचे पुत्र आहेत. रिलायन्स कंपनीची स्थापना मुळात धीरूभाई अंबानी यांचीच होती. मुकेश यांचे छोटे भाऊ अनिल अंबानी ‘रिलायन्स अनिल अंबानी ग्रुप’ चे प्रमुख आहेत. दूरसंचार, ऊर्जा, नैसर्गिक संसाधने, पायाभूत सुविधा आणि वित्तीय सेवा या क्षेत्रात यांचा समूह सक्रिय आहे. धीरूभाई यांच्या निधनानंतर दोघी भावांनी आपापले उद्योग सुरु केले.
मुकेश अंबानी यांनी नीता अंबानीशी लग्न केले. रिलायन्स इंडस्ट्रीजची सामाजिक आणि सेवाभावी कामे नीता पाहतात. आकाश, ईशा आणि अनंत हे मुकेश आणि नीता यांची तीन मुले आहेत. मुकेश अंबानी यांचे कुटुंब गुजरातच्या मोद बनिया समुदायाशी संबंधित आहे.
Niraj Bhawsar.
मित्रांनो, Mukesh Ambani information Biography in Marathi मुकेश अंबानी यांच्याबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.
Leave a Reply