Mother Teresa information Biography in Marathi मदर तेरेसा मराठी माहिती Mother Teresa essay in Marathi

एक थोर मानवतावादी समाजसेविका व शांततेच्या नोबेल पारितोषिकाच्या मानकरी. आधुनिक संत म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या मदर तेरेसा. आपले संपूर्ण आयुष्य इतरांच्या सेवेसाठी खर्च करणाऱ्या मानवतावादी समाजसेविका मदर तेरेसा, या महिलेला दयेची देवी आणि मानवतेची मूर्ती म्हटले जाते. त्या जन्माने भारतीय नव्हत्या परंतु गरजवंताच्या सेवेसाठी भारतात आल्या होत्या.कोलकत्यात येऊन अनाथ, अपंग, गोरगरीब, भुकेले यांच्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या “भारतरत्न मदर तेरेसा.”
चला तर मग आज त्यांच्या विषयीच माहिती पाहुया.
Mother Teresa information Biography in Marathi
मदर तेरेसा मराठी माहिती Mother Teresa essay in Marathi
मदर तेरेसा यांचे खरे नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू होते. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० ला युरोपातील मॅसेडोनिया या देशात झाला होता. मदर तेरेसा यांच्या आई वडिलांना तीन अपत्य होती. मदर तेरेसा या सर्वात लहान होत्या. त्यांचे वडील एक साधारण व्यवसायिक होते. मदर तेरेसा आठ वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मदर तेरेसा या एका ख्रिश्चन कुटुंबात जन्म आल्या होत्या. त्यांना ख्रिश्चन धार्मिक कार्य करण्याची आवड होती. २१ वर्षाच्या वयात त्यांनी चर्चमधील नन बनण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यावेळी त्यांचे नाव मदर तेरेसा करण्यात आले. नन बनल्यानंतर त्यांनी अनेक देशाची यात्रा करून लोकांमध्ये धार्मिक विश्वास वाढवला. त्या भारतातली कोलकाता शहरात आल्या व लोरेट कॉन्व्हेन्ट स्कूल मध्ये मुलांना शिकवू लागल्या. त्या अतिशय शिस्तप्रिय शिक्षिका होत्या. कोलकत्याच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे दुःख व पीडा पाहून मदर तेरेसा यांचे मन अस्वस्थ होत असे. १० सप्टेंबर १९४६ मध्ये हे त्यांनी कॉन्व्हेंट स्कूल सोडले व अतिनिर्धन लोकांच्या सेवेसाठी कार्य करणे सुरू केले. यानंतर त्यांनी कोलकत्याच्या गल्ल्या-गल्ल्यांमध्ये फिरून लोकांना दया व प्रेम शिकवले. त्यांनी कलकत्ता निगमाकडून जमिनीचा एक तुकडा मागितला व या जमिनीवर धर्मशाळा स्थापित केली. या छोट्याश्या सुरुवातीनंतर त्यांनी जी प्रगती केली ती खरोखर महान होती. त्यांनी ९८ स्कूटर, ४२५ मोबाईल डीस्पेंसरीज, १०२ कुष्ठरोगी दवाखाना, ४८ अनाथालय आणि ६२ असे घर बनवले जेथे गरीब लोक विनामूल्य राहू शकतील.
मदर तेरेसा निबंध मराठी
सिस्टर्सची वा धर्मगुरूंची नवीन संस्था सुरू करण्यासाठी कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरू पोप यांची परवानगी मिळणे आवश्यक होते. सुदैवाने रोममधून लेखी परवानगी मिळाली आणि समाजाने टाकून दिलेल्या उपेक्षित लोकांची व गरिबांची सेवा करण्यासाठी सिस्टर तेरेसा लॉरेटो संस्थेतून १९४८ साली बाहेर पडल्या. रस्त्यांवर, फूटपाथवर वा उकिरड्यापाशी पडलेल्या महारोग्यांची, आजाऱ्यांची वा अनाथ अर्भकांची सेवा करण्यासाठी सिस्टर तेरेसा यांनी परिचारिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पददलितांची काळजी घेण्यासाठी त्या शब्दश: रस्त्यावर आल्या. लॉरेटो संस्थेच्या सिस्टर असताना तेरेसा सफेद पायघोळ झगा, डोक्यावरून कमरेपर्यंत पडणारा काळा गाऊन असा पोशाख करत असत. ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ (स्था. १९५०) ही नवीन संस्था स्थापन केल्यावर सिस्टर तेरेसा यांनी स्वत:साठी खास बंगाली पद्धतीच्या पेहरावाची निवड केली. जाड्याभरड्या सफेद सुताची आणि निळ्या रंगाची काठ असलेली साडी बंगाली पद्धतीने नेसून त्या काम करू लागल्या. अशा प्रकारची साडी सफाईकाम करणाऱ्या वर्गातील स्त्रिया परिधान करत असत. लॉरेटो संस्थेतून बाहेर पडल्यानंतर रात्रीच्या निवासासाठी सिस्टर तेरेसा काही काळ ‘लिटल सिस्टर्स ऑफ दि पुअर’ या सिस्टर्सच्या कॉन्व्हेंटमध्ये राहत. दिवसभर त्या मोतीझील झोपडपट्टीतील मुलांसाठी शाळा चालवत. ‘लिटल सिस्टर्स ऑफ दि पुअर’ ही संस्था त्यांच्या ट्रामच्या प्रवासासाठी पैसे देत असे. सुरुवातीच्या काळात झोपडपट्टीतील मुलांच्या अंघोळीच्या साबणासाठी, आजाऱ्यांच्या औषध पाण्यासाठी, भुकेलेल्यांना जेवण देण्यासाठी सिस्टर तेरेसा कोलकाता शहरात भीक मागत. काही दिवसांनंतर सिस्टर तेरेसा यांना राहण्यासाठी एका जुन्या इमारतीतील एक खोली मिळाली. केवळ एका लाकडी खोक्याशिवाय तेथे इतर काहीही सामान नव्हते. या खोलीत सिस्टरांनी आपल्या एकटीचा संसार थाटला. याच खोलीत त्यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या संस्थेचा जन्म झाला. मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या सिस्टर्स बनून त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या इतर युवती सुरुवातीला या खोलीतच राहात असत. त्या घरात तेरेसा यांचे चार वर्षे म्हणजे १९५३ पर्यंत वास्तव्य होते.
झोपडपट्टीमध्ये सिस्टर तेरेसा एकट्याने काम करत असताना एक दिवस सेंट मेरीज स्कूलमधील त्यांची जुनी विद्यार्थिनी सुभाषिनी दास त्यांना भेटायला आली. या अठरा वर्षांच्या तरुणीची सिस्टरांच्या बरोबरीने काम करण्याची इच्छा होती. त्यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’मध्ये प्रवेश करणारी ही पहिली मुलगी. सिस्टर बनल्यानंतर सुभाषिनी दास ही सिस्टर ॲग्नेस झाली. कॅथलिक सिस्टरांच्या संघात प्रमुखांना ‘मदर’ या उपाधीने संबोधले जाते. या नियमानुसार सिस्टर तेरेसा आता मदर तेरेसा बनल्या. टाकून दिलेल्या निराश्रित व्यक्तींची मायेने काळजी घेणाऱ्या त्या मदर−आई−बनल्या. मोतीझील झोपडपट्टीत शाळा सुरू केल्यानंतर मदर तेरेसांनी तेथे दवाखाना सुरू केला. कोलकात्यातील हमाल, रिक्षा ओढणारे लोक आणि गरीब लोक या दवाखान्यात उपचारासाठी यायचे. या लोकांमध्ये क्षयरुग्णांची संख्या अधिक असायची. रस्त्यावर राहणाऱ्या, भुकेने हाडांचे सापळे बनलेल्या लोकांना जेवण देण्यासाठी मदरने अन्नछत्र सुरू केले. कुष्ठरोग्यांसाठी कुष्ठधाम; कचराकुंड्यांत, दवाखान्यांच्या पायऱ्यांवर किंवा गटारापाशी टाकून दिलेल्या अर्भकांचे पालन-पोषण करण्यासाठी त्यांनी शिशुभवन उघडले.मिशनरीज ऑफ चॅरिटीची जगभर अनेक केंद्रे आहेत. त्यांपैकी सर्वांत नावाजलेले केंद्र म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या निराश्रित व्यक्तींसाठी चालविले जाणारे कोलकात्यातील ‘निर्मलहृदय’ किंवा ‘होम फॉर डाईंग डेस्टिट्यूट’ (स्था. १९५२). भारताचे तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६० साली मदर तेरेसांच्या दिल्लीतील संस्थेच्या ‘होम फॉर द डाईंग डेस्टिट्यूट’चे उद्घाटन केले. मिशनरीज ऑफ चॅरिटीची ही कोलकाताबाहेरील पहिली शाखा. १९६५ मध्ये व्हेनेझुएला या मागासलेल्या देशात नवे केंद्र सुरू करून या संस्थेने जागतिक पातळीवर आपल्या सेवेची मुहूर्तमेढ रोवली.
भारत सरकारने त्यांचे जनहितार्थ कार्य पाहून “पद्मश्री” आणि त्यानंतर “भारतरत्न” या दोन पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले. पुढे १९७९ मध्ये त्यांना मानव कल्याणार्थ केलेल्या उत्कृष्ट कार्याकरीता शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. याशिवाय १९८५ साली त्यांना मेडल ऑफ फ्रीडम अवार्डने देखील गौरवान्वित करण्यात आले.वृद्धापकाळात त्यांची प्रकृती ढासळत गेली. १९८३ व १९८९ साली त्यांना दोन हृदय विकारांच्या झटक्यांचा सामना करावा लागला. या प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी समाजसेवेचे कार्य सुरूच ठेवले. १९९७ ला मदर तेरेसा यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या प्रमुख पदावरून निवृत्ती घेतली. ५ सप्टेंबर १९९७ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्या अनंतात विलीन झाल्या.
मित्रांनो, Mother Teresa information Biography in Marathi
मदर तेरेसा मराठी माहिती Mother Teresa essay in Marathi मदर तेरेसा निबंध मराठी माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा.
Leave a Reply