Maze Baba Nibandh Essay in Marathi Majhe Baba Speech in Marathi
Easy Essay on My Father in Marathi My Papa Essay in Marathi Maze Baba Nibandh Essay in Marathi
वडिलांना लिहिलेले पत्र माझे वडील निबंध मराठी माझे बाबा निबंध मराठी
Maze Baba Nibandh Essay in Marathi Majhe Baba Speech in Marathi
माझे वडील निबंध मराठी माझे बाबा निबंध मराठी
प्रिय दादा (वडील)
का कुणास ठाऊक आज मन का भरून आलं अन अचानकच डोळ्यांतून पाणी तरळलं. काय माहित आज असं का झालं अन मला मनापासून व्यक्त व्हावस वाटलं. होय अगदी यामुळेच हा पत्रप्रपंच.
तुम्ही आम्हाला उभं करण्यासाठी सतत जीवच रान करत आलात. आपण आम्हाला सावरतांना कितीतरी वेळेस स्वताच पडलात. आपण अगदीच आम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलत. कितीतरी वेळेस आमच्या चुका माफही केल्या. आपली परिस्थिती नसतांनाही आपण आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी जाणवू दिली नाही. आम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आपण कित्येकांचे उंबरे झिजवले. अनंत दुःख, वेदनांचे चटके सहन करूनही कसं जागाव याचा आदर्श तुम्ही आमच्यासमोर ठेवला. पिककर्जापायी आम्ही लहान असतांना बँकेचे लोक घरी वसुलीसाठी यायचे अन वेडवाकड बोलायचे ते सर्व तुम्ही सहन केलं. अन हो अगदी प्रामाणिकपणे ते कर्जही चुकतं केलं हा प्रामाणिकपनाचा आदर्श तुम्ही घालून दिला. दादा तुम्ही एकदा शेतात मशागत करतांना मला म्हटला होतात कि तुला माहितीय का भरत आपली हि काळी माय हिची पूर्ण मशागत केल्याखेरीज चांगल पिक येत नाय. त्याला शॉर्टकट मारला तर त्याचा तोटा आपल्यालाच होतो. अगदी तसाच असत कुठल्याही क्षेत्रात त्यामुळ तु कुठल्याही क्षेत्रात जा पण आपल काम प्रामाणिकपणे कर त्यात शोर्टकट मारू नको त्याने तुझाच तोटा होईल. त्यावेळी यातलं काहीच कळत नव्हत पण आता सगळ कळतंय अगदी जसच्या तसं.
Maze Baba Nibandh Essay in Marathi Majhe Baba Speech in Marathi
हो आजही आठवतोय मला तो दिवस जेव्हा मी दहावीला होतो. परीक्षा चालू होती आणि मी अभ्यास सोडून क्रिकेट खेळायला गेलो होतो त्या रात्री तुम्ही उसाच्या टिपऱ्यानी माझ केलेलं स्वागत सगळ आठवतंय. हो आज समजतीय तुमची त्या सगळ्या मागची तळमळ. तुम्ही नेहमी म्हणायचात आमची जी फरफट झालीय ती तुम्हा भावंडांची होऊ नये म्हणून मन लावून अभ्यास करा पण तेव्हा आमच वेगळच काहीतरी चालायचं. तेव्हा तुम्ही रागावल्यावर तुमचा रागही खूप यायचा पण आज आम्हाला आमची चूक समजत आहे. आम्ही सुखात राहावं म्हणून आपण बिनाचप्पलच राहिलात आणि आम्हाला नवी चप्पल घेऊन दिली. तुम्ही आमच्यासाठी स्वतःच्या गरजांना कातर लावलीत. कधी मालाला भाव नही मिळाला तर तुम्ही झोपीच सोंग करून, तोंडावर पांघरून घेऊन रडायचात अन आम्हाला अपयशात खचून जाऊ नको असं संगायचात. परिस्थिती कशीही असो आपण त्यावर मात करू शकतो हा विश्वास मला द्यायचात. मी दहावीत माझा अभ्यास व्हाव म्हणून तुम्ही पहाटे ४ ला अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे न कंटाळता उठायचात आन मला उठवायला यायचात. पण तुम्ही तिथून जाताच मी तोंडावर पुस्तक ठेऊन पुन्हा झोपी जायचो. त्यामुळे त्याचा परिणाम निकालात दिसला अन तुम्ही खूप रागावलात, चिडलात पण ते सगळ विसरूनही माझ्या ११ वी प्रवेशासाठी संचालकांचे उंबरठे झिजवले. तुम्ही मला प्रवेश मिळवून दिला. माझा भरकटलेल्या आयुष्याचे सारथी बनून आपण मला सावरलं. दुख आणि अपयशाच्या लाटांनी माझी आयुष्याची नाव हेलकावे खात असतांना आपणच मला आधार दिला. आपण माझ्या रंग उडालेल्या आयुष्यात रंग भरलात. मला माणूस बनवण्यासाठी आपण खरच किती कष्ट सोसले. तुम्ही सतत परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यासोबतच आपण कशात आनंद मानायला हवा हे शिकवलं अन आपल्या गरजा माफक असायला हव्यात ही शिकवण दिली.
होय आपणच माझ्यातला वक्ता, वेदनांची जाणीव असणारा कवी जागृत केला. आज कधीतरी एखादी वक्तृत्व किंवा काव्यवाचन स्पर्धा जिंकल्यावर तुमच्या चेहऱ्यावर निर्माण झालेला आनंद हेच माझ्या आयुष्याच सार्थक आहे. तुम्ही माझ्यासारख्या चीकालाच्या गोळ्याला आकार दिलात आणि हे जीवन परिपूर्ण व्हाव यासाठी तुम्ही दिलेली संस्काराची शिदोरी सोबतीला आहे. म्हणतात देव देवळात असतो पण तुम्ही माझ्या हृदयात आहात. अन तुम्हीच माझे परमेश्वर आहात. आपण जन्मोजन्मी वडील म्हणून लाभावेत एवढीच इच्छा.
तुमचा लाडका
भरत.
-भरत दिलीप मोहळकर.
७७०९६८६७५४.
Maze Baba Nibandh Essay in Marathi Majhe Baba Speech in Marathi Easy Essay on My Father in Marathi My Papa Essay in Marathi Maze Baba Nibandh Essay in Marathi Majhe Baba Speech in Marathi My Father Essay in Marathi Language वडिलांना लिहिलेले पत्र माझे वडील निबंध मराठी माझे बाबा निबंध मराठी Father’s Day in Marathi
Leave a Reply