Marathi Romantic Paus Kavita
जसा पाऊस वाढत होता तुझा चेहरा देखील वेगळाच भासत होता पावसाप्रमाणेच स्वच्छ नवीन कोरा कोरा…
Marathi small poem मी ती आणि एक कप कॉफी
Marathi Romantic Paus Kavita paus ani prem marathi kavita
बऱ्याच दिवसांपासून मनातलं गुपित तुला सांगायचंय
सुरवात कशी करावी कळत नव्हतं
आणि तुझ बोलणं देखील थांबत नव्हत
तु कॉफी पीत होती आणि मी नजरेने तुला
असं वाटत होतं तुझ बोलणं एकतच राहावं
मी बोलायला सुरवात करणार
इतक्यात ढगांना पाझर फुटला
जणू ते माझ्या मनातलं बोलत होते पण तुला हे समजत नव्हतं
जसा पाऊस वाढत होता तुझा चेहरा देखील वेगळाच भासत होता
पावसाप्रमाणेच स्वच्छ नवीन कोरा कोरा
तुझं हळुवार बोलणं समजत नव्हतं मला
पण प्रतिसाद म्हणून नकळतच मान हलत होती
अचानक वारा पावसाच्या थेंबांना घेऊन अंगावर आला
काय मज्जा आली होती
तु स्वतःलाच बिलगली होतीस नकळत
तुझा कॉफीचा कप कधी रिकामा झाला
कळलच नाही तुला आणि त्या कपामध्ये मी शोधात होतो स्वतःला
तुझ्या सोबतीची स्वप्न रंगवत होतो मी इशाऱ्यानेच विचारलं माझी कॉफी घेणार का
तु देखील होकार दिला कदाचित माझ्या मनातलं तुला समजलं होतं
मी ती एक कप कॉफी आणि आठवणी
-अभिजित हजारे.
पहिला पाऊस प्रेम कविता Marathi Romantic Paus Kavita paus ani prem marathi kavita
Wow this is very nice Marathi Kavita. I like it very much.