Marathi Nibandh Shetkari Farmer
जय जवान जय किसान असं श्री लाल बहादुर शास्त्री म्हणाले होते पण याच शेतकऱ्याची व्यथा एकूण तुमचे मन दु:खी झाल्याशिवाय राहणार नाही. याच जगाच्या पोशिन्द्याला आज आत्महत्या करण्याची वेळ का आली? स्वतः दिवस रात्र शेतात राबणारा माझा शेतकरी प्रेमाने, मनापासून संपूर्ण बळ एकवटून पिक घेतो. कधी दुष्काळ, कधी अतीवृष्टी, ही निसर्गनिर्मित संकटे त्याचापुढे कायम आ वासून उभे राहतात तरी माझा शेतकरी डगमगत नाही तो सह्याद्रीप्रमाणे कणखर उभा असतो, या संकटावर मात करून तो मायेने लावलेले, जपलेले पिक घेतो पण अजून त्याची परीक्षा संपलेली नसते. शाळेत शिकणाऱ्या मुलाला देखिल वर्षात फक्त दोनदाच परीक्षेला सामोरे जावे लागते पण शेतकऱ्याला प्रत्येक क्षणाला परीक्षेला सामोरे जावे लागते. एक समस्या सुटली कि दुसरी त्याचासमोर आ वासून उभी असते. शेतमालाला हमीभाव नाही. त्याने घेतलेल्या पिकला योग्य भाव मिळत नाही. या अवस्थेत शेतकरी काय करणार? Read Marathi Nibandh Shetkari Farmer
शेतीची सुरुवात केली तेंव्हा डोंगर टेकड्यावर लाकडाच्या साहाय्याने शेती करून त्यापासून धान्याची पैदास केली जायची , काही काळानंततर मानव एक जागी स्थिर झाला, त्यानंतर त्याने अधिक प्रमाणात क्षेत्रावर शेती करण्यास सुरुवात केली. कालांतराने, भारत देशामध्ये हरित क्रांती झाल्यानंतर देशाच्या धान्य उत्पादन क्षमतेमध्ये खूप मोठे बदल झाले. अन्न धान्याची उत्पादन क्षमतेमध्ये मोठी वाढ झाली, परंतु त्या काळी प्रश्न होता तोच की , उत्पादित केलेले धान्य साठवण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे तसेच वाटपाचे नियोजन नसल्यामुळे त्या उत्पादनापेक्षा जास्त प्रमाणात धान्याची नासाडी अधिक होत असे.देशातील गरिबांना हे धान्य मिळतही नव्हते. व्यवस्थित न साठवल्याने त्याची मोठी नासाडी होत असायची. आज आपल्या देशातील शेतकरी हा जास्तीत जास्त प्रमाणात खेड्यापाड्यात राहतो, आणि हा शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून गायी, म्हशींचे संगोपन करतो, त्यापासून मिळणारे दूध यापासून तो दैनंदिन जीवन जगण्यासाठी काही प्रमाणात उदरनिर्वाहासाठी त्याची विक्री करून पैसे मिळवतो. परंतु पूर्वीपासून उत्पादित फळभाज्या, पालेभाज्या, फ़ळे, यांना जास्तीत जास्त दिवस कसे टिकवता येईल या गोष्टी शेतकऱ्यांना माहीत नाहीत. धान्य हे काही दुधासारखे नाशवंत नसते, म्हणून धान्याची नासधूस दुधाच्या प्रमाणापेक्षा कमी होत असते. फळे, भाज्या आणि दूध हे नाशवंत असल्यामुळे त्यांची साठवणूक करण्यासाठी आपल्याकडे तरी काही सुविधा नाहीत, कोणत्याही प्रकारची सोयच नसल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होतो. असोचेम या संघटनेने याबाबत एक पाहणी केली असता असे आढळून आले की, आपल्या देशात या तीन नाशवंत मालाचे जेवढे उत्पादन होते त्याच्या ४० ते ५० टक्के एवढे उत्पादन वाया जाते, नासते आणि कुजते व्यर्थ जाते. भारताचा भाज्या आणि फळांच्या उत्पादनात दुसरा क्रमांक आहे. भारताने ठरवले तर तर निम्म्या जगाला दूध आणि भाज्या पुरवू शकतो. तेवढे उत्पादन आपल्याकडे घेतले जाते परंतु ते जगाला न पुरवता आपण त्यातला जवळपास निम्मा माल नासवून, कुजवून उकिरड्यावर फेकतो. त्यामुळे मालाची तर नासाडी होतेच पण उकिरड्यावर टाकल्याने त्याचा दुर्गंध सुटून रोगराई पसरते. निर्माण झालेला हा माल साठवण्याच्या पुरेशा सोयी सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. Marathi Nibandh Shetkari Farmer
आपले हे नुकसान ४४० अब्ज डॉलर्स एवढे प्रचंड आहेे. ते रुपयांत मोजायचे झाल्यास साधारण २४ लाख कोटी रुपये इतके आहे. आपण उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न भारतातील शेतकरी वर्गाने केला आहार परंतु त्यांना पण साठवण्याची योजना आखली नाही. त्याचा आपल्याला हा परिणाम भोगावा लागत आहे. ही उत्पादने अशी नासून आपले हे मोठे नुकसान टळावे यासाठी त्यांना गोदामे आणि कोल्टड स्टोरेज उपलब्ध करून दिले पाहिजेत परंतु सध्या तरी यावर एक मार्ग आहे, तो म्हणजे या मालावर प्रक्रिया करणे. आपण दूध वाया घालवण्यापेक्षा त्याची पावडर केली पाहिजे. फळांवरही अनेक प्रकारच्या प्रक्रिया करता येतात. त्यामुळे नासाडी तर टळतेच पण प्रक्रिया केलेल्या मालाला जास्त भाव मिळून शेतकर्यांना जास्त पैसे मिळतात. Marathi Nibandh Shetkari Farmer. शेतकरी.
-सागर गोरखे.
I like your essay
Mast ahee, Mala ha essay lihuin school Madhe 1st prize millale…..👌👌👌👌👌