
नव्या कामांची घोषणा, जुन्यांच काय…?
मोठ्या उत्साहात वाजत गाजत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कर्जतला पार पडला… आनंदाची गोष्ट आहे कर्जत सारख्या तालुक्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री आले, त्यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यशही आलं… माझ्या माहितीप्रमाणे निवडणुकीच्या प्रचारानंतर आताच मुख्यमंत्री कर्जतला आले असतील…
नेहमीप्रमाणे भाषणात पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानुन तालुक्यासाठी काही नव्या कामांची मागणी केली… त्यात तालुका हा लाल मातीचा आखाडा असुन क्रिडा प्रबोधीनीसाठी १० कोटी रुपयांची मुख्य मागणी केली… सोबतच कुकडी चारीचा अंतीम टप्पा, MIDC ची मागणीही केली… लगोलग तुम्ही मागत रहा मी मंजुरी देऊन टाकतो असं सांगत सगळ्याच मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली… फक्त MIDC साठी जागा उपलब्ध करा आसही मुख्यमंत्र्यांनी सुचवलं… याबद्दल पालकमंत्री आणि मुख्यमंत्री दोघांचेही आभार…
पण खरा प्रश्न हा आहे की नव्या मागण्या करताना पालकमंत्र्यांनी जुन्या मागन्यांना बगल दिलीय का?… पहीली गरज तालुक्यासाठी काय आहे?.. ज्या गोष्टीची घोषणा, अश्वासन निवडणूकीच्या काळात केली होती त्याचा सोयीस्कर विसर पालकमंत्र्यांना पडला आहे का? तालुक्यासाठी महत्वाचा असणारा एसटी डेपो, तुकाई चारीच काम या प्रश्नांचा पालकमंत्र्यांना विसर पडलाय काय? असा प्रश्र्न पडतोय… याचा साधा उल्लेखही भाषणात यावा नाही ही खेदाची बाब आहे… कधी रात्री उशीरा कर्जतला जायच किंवा कर्जतवरून बाहेर गावी जायचं असेल तेंव्हा डेपोची गरज लक्षात येते… कर्जतच्या बस अागारा विषयी सत्ताधा-यांसोबतच विरोधकही उदासीन दिसत आहेत … कर्जतचे हे दुर्दैव आहे की जानकारांची वैचारिक दिवाळखोरी का असा प्रश्न पडतोय… समाजात शिक्षक वर्गान आजपर्यंत नेहमीच वैचारिक क्रांती केली… अशा सर्व शिक्षकांना दुचाकी, चारचाकी असल्याने हा वर्गही कधी बस आगार विषयी बोलताना दिसत नाही हे कर्जतचे दुर्दैव आहे … शेजारच्या तिन तालुक्यातून (श्रीगोंदा, करमाळा, आष्टी) विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात… संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत स्टॅंडवर उभं रहा मग डेपोची गरज किती आहे हे समजेल… अर्थात समजून घेतली तर… आबासाहेब निंबाळकर यांच्यानंतर तालुक्याला पहीलं मंत्रीपद मिळालं अपेक्षा होती की वर्षभरात काम पुर्ण होईल मात्र तसं झालं नाही… डेपोकडे डोळे लावून बसलेल्या सामान्य कर्जतकरांचा हा प्रश्र्न पुढच्या निवडणुकीपर्यंत सुटेल की नाही यात शंका आहे.
MIDC च म्हणाल तर मागणी कौतुकास्पद आहे पण तालुक्यात असणार काळवीट अभयारण्य पाहाता वनविभागाची परवानगी मिळण अवघड आहे… अर्थात याची शहानिशा करुनच पालकमंत्र्यांनी याची मागणी केली असेल अशी अपेक्षा आहे.
बाकी पालकमंत्र्यांनी केलेल्या मागण्या उचीतच आहेत… त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि आभार… परंतु प्राधान्य लक्षात घेणही गरजेचं आहे… लवकरात लवकर मागणी केलेली काम सुरू होतील अशी सामान्य कर्जतकर म्हणून नविन वर्षानिमित्त अपेक्षा करतो. Marathi lekh on Politics
प्रमोद जगताप,
पत्रकार टिव्ही नाईन मराठी
मो- 9503959446.
Leave a Reply