Marathi lekh blog नोटबंदी वर निबंध मराठी . नोटा बंदीचे परिणाम मराठी निबंध . नोटबंदी चे फायदे आणि तोटे . नोटा बंदी योग्य की अयोग्य.
Marathi lekh blog नोटबंदी
नोटबंदी च्या निमित्ताने लोकांना स्वप्न दाखवली. भ्रष्टाचार संपनार. काला धन बाहर निकलेगा. बॅकामध्ये पैसा जमा होणार. कर्जाचा व्याजदर कमी होणार. फक्त काही काळ थोडी कळ सोसा. देशाचे जवान सिमारेखेवर दिवस रात्र उभे असतात तुम्ही थोडा वेळ रांगेत उभा राहिलात तर काय बिघडलं तुमच्या भल्या साठीच तर चाललंय हे. पण याच नोटाबंदी च्या काळात २००० च्या नोटा पोलिसांनी छापे टाकून जप्त केल्या त्या आल्या कुठून ? या काळात व्यवहार मंदावले याचा फटका लघु उद्योग, बाजारपेठा, शेतकरी यांना बसला पण हे सगळं दिसत नाही किंवा दाखवलं जात नाही राष्ट्रीय उत्पन्न दरात काहीच घसरण नाही असं का? का हे फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी दाखवलं जातय हा विचार सर्वसामान्य कधी करणार. स्विस बॅकेतला काळा पैसा आनणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होणार? हे तर जुणं झालं. मध्यंतरी जो कॅशलेस चा बागुलबुवा उभा केला लोकांनी बंदी च्या काळापुरताच प्रतिसाद दिला आता जसं चलन उपलब्ध होत आहे लोक रोख व्यवहार करत आहेत. आता याला काय म्हणाल. ही अवस्था शहरी भागातली. ग्रामीण भागात आजही राष्ट्रीय बॅका नाहीत. त्याच्या मुलभूत गरजांचे प्रश्न कायम आहेत. अशा लोकांना आॅनलाइन व्यवहार काय समजणार.Marathi lekh blog.
निच्चलिकरण केल्यानंतर सर्व बँका मध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा झाली म्हणजे याचा अर्थ बॅका श्रीमंत झाल्या असा सर्वसामान्यांच्या गैरसमज आहे. कुठल्याही बँकेला खातेदारांना जमा झालेल्या पैशावर व्याज द्यवं लागतं आणि सध्या बँका मध्ये खुप मोठी रक्कम आहे. बँकेच्या उत्पन्ना साठी बँका कर्ज वाटप करते पण सध्या कर्ज काढणा-याची संख्या वाढत नाही. मग बँकानी त्यांच उत्पन्न वाढवण्यासाठी ठराविक मर्यादा किंवा व्यवहारानंतर चार्जेस लागू केले. सध्या सरकार हे चार्जेस कमी किंवा काढून टाका म्हणतय पण बॅकाची परिस्थिती पाहता हे शक्य वाटत नाही. यात भर म्हणजे जणधन खाती नोटबंदी च्या काळात या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा झाली ती सध्या काढता येत नाही. हुकुमावरून. अमिर खानची बायको ने देश सुरक्षीत नाही असं म्हणल्यावर ती देशद्रोही. मोहंमद शमीच्या बायकोने स्लीव्हलेस घातला तर तिने चुक केली. तिने कोणते कपडे घातले पाहिजे हे कोण ठरवणार ? मध्यंतरी गुरमेहर कौर म्हणाली Pakistan doesn’t kill my father war killed तर किती मोठी चूक झाली तिला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या तिला देशद्रोही ठरवण्यात आलं. निच्चलिकरणाला विरोध करणा-या लोकांनाही देशद्रोही ठरवण्यात आलं. सध्या निवडणुकांपुर्वी शेतकरी कर्जमाफीची आश्वासन दिली गेली. निकाल लागल्यानंतर स्टेट बँकेच्या अध्यक्षा म्हणतात शेतकरी कर्जमाफी शक्य नाही. मुख्यमंत्री म्हणतात शेतकरी कर्जमाफी हा कायमस्वरुपी उपाय नाही. एकीकडे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव नाही कर्जमाफी ही नाही. शेतकऱ्याने काय करायचं? यावर उपाय सांगा? निवडणुक प्रचारादरम्यान आश्वासने देणे ती पुर्ण न करणे. लोकांना स्वप्न दाखवून ती पुर्ण न करणे. हा देशद्रोह नाही का? का? फक्त जवानांबद्दल देशाबद्द्ल आदर असणे म्हणजे देशप्रेम? हे सगळं कायम चर्चेत ठेवून कोणी तुमची दिशाभूल तर करत नाही ना ? कारण या देशातला प्रचंड जनसमुदाय आजही मुलभूत गरजांसाठी झगडत आहे.
marathi nibandh notebandi . नोटबंदी वर निबंध मराठी . नोटा बंदीचे परिणाम मराठी निबंध . नोटबंदी चे फायदे आणि तोटे . नोटा बंदी योग्य की अयोग्य.
Leave a Reply