Marathi blogs माणसातली माणुसकी संपतेय काय? माणुसकी या शब्दाचा अर्थ हा तसा खुप खोल आहे. ज्याने त्याने एैपतीनुसार या शब्दाचा अर्थ लावला आहेच पणसाधारण विचार केला तर भुतदया, समान वागणूक, दया अशा गोष्टी येतीलच.
नुकताच पुण्यामध्ये या माणुसकीच्या तोंडाला काळीमा फासणारे वाईट कृत्य घडले. काही लोकांनी जिवंत कुत्र्यांना जाळले एकीकडे लोकांना गाईमध्ये तेहतीस कोट देव दिसतात त्याच माणसाला कुत्र्यांना जिवंत जाळताना एक देव सुध्दा दिसला नाही. तसं पाहीलं तर कुत्रा आणि माणसाचं नातं फार जुणं आहे. माणुस भटका टोळीमध्ये रहायचा तेव्हापासुनची माणसाची आणि कुत्र्याची मैत्री. कुत्र्याचा प्रामाणिकपणा आोळखुन माणसाने त्याला सोबत घेतले कुत्र्यानेही माणसावर विश्वास टाकला. मिळेल ते भाकर तुकडा खावुन कुत्रा माणसाला संरक्षण देऊ लागला पण माणसाने कुत्र्याच्या या विश्वासाला कुत्रा लावला. त्याला खाण्यात विष खाऊ घातलं. Marathi blogs
माणसातली माणुसकी संपतेय काय खरतर जो आजचा माणुस आपण बुध्दीने आणि शक्तीने श्रेष्ठ असल्याच दाखवू पाहत आहे पण वेळोवेळी निसर्गाने आणि इतर प्राण्यांनी निसर्गाचे नियम पाळुन. प्रेमाचे भुकेले हे प्राणी माणसापेक्षा श्रेष्ठ आहेत माणुस त्याच्यापुढे खुप लोभी अाणि स्वार्थी वाटतो. माणसाने जिवंत जाळलेल्या कुत्र्यांना माणसाकडे पाहुन काय वाटत असेल?
-अभिजीत हजारे.
Leave a Reply