ममता बॅनर्जी आदर्श व्यक्तिमत्व

अनेक अडचणीवर मात करत सतत संघर्ष करायला प्रेरणा देणाऱ्या ममता बॅनर्जी दिदींच्या मधील विशेष गुणांबद्दल ह्या गोष्टी जाणून घ्या नक्कीच तुमचा फायदा होईल.
मुद्दे
१. परिचय
२. ममता बॅनर्जी यांचे उपक्रम आणि कर्तुत्व
३. ममता बॅनर्जी यांचे व्यक्तिमत्व
४. पुस्तके/ हस्तलिखित पुस्तके
५. पुरस्कार / गौरव
परिचय
सध्या बंगालच्या मुख्यमंत्री तसेच दिदी या प्रेमळ नावाने सर्वत्र चर्चेत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे “ममता बॅनर्जी” होय.
दिदींचा जन्म ब्राम्हण परिवारात ५ जानेवारी १९५५ रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रोमिलेश्वर बॅनर्जी आणि आईचे नाव गायत्री देवी असे आहे.
ममता बॅनर्जी यांची वैयक्तिक पार्श्वभूमी
ममता दिदी यांनी कोलकाताच्या जोगोमया देवी महाविद्यालयातून इतिहासात पदवी संपादन केली. पुढे त्यांनी कोलकत्ता विद्यापीठातून इस्लामिक इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतले. बॅनर्जी यांनी कोलकाताच्या जोगेश्वर चंद्र चौधरी विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली आहे. ममता दिदीनां चित्रकलेत तसेच कवितांमध्ये आवड आहे. याच बरोबर त्यांना संगीत, वाचन, लेखन यांचा समावेश आहे.
ममता बॅनर्जी यांचे उपक्रम आणि कर्तुत्व
१९९७ मध्ये कॉंग्रेस पासून विभक्त झाल्यानंतर दिदींनी यशस्वीरीत्या एक नवीन पक्ष स्थापन केला. त्यांच्या अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा पक्ष पुढे माकपच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमधील प्राथमिक विरोधी पक्ष बनला.
२००२ मध्ये रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी नवीन गाड्या सुरु केल्या. काही एक्स्प्रेस ट्रेन सेवा वाढवल्या. पर्यटनाच्या आणि विकासाच्या दृष्टीने काही गाड्यांची वारंवारता वाढवली आणि भारतीय रेल्वे केटरिंग आणि पर्यटन मंडळाचा प्रस्तावही दिला.
२० ऑक्टोबर २००८ रोजी बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्वात तत्कालीन डाव्या आघाडी सरकारने पश्चिम बंगालमधील औद्योगीकिकरणासाठी शेतकरी व शेतकऱ्यांच्या जबरदस्तीच्या भूसंपादनाच्या विरोधात त्यांनी सक्रीय विरोध केला.
१ जुलै २०११ य दरम्यानच्या रेल्वेमंत्री कार्यकाळात त्यांनी बरीच शहरे, इतर प्रवासी गाड्या आणि स्रियांसाठी विशेष गाड्या जोडल्या. अनेक नॉन स्टाँप टूरान्टो एक्स्प्रेस गाड्या सादर केल्या.
याच वर्षी २०११ साली पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेस, नॅशणल कॉंग्रेस आणि एसयुआयच्या युतीने २२७ जागा जिंकून बहुमत मिळवलं.
२० मे २०११ रोजी तब्बल ३४ वर्षाच्या डाव्या आघाडीच्या सरकारला पायउतार करायला लाऊन ममता दिदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या.
ममता बॅनर्जी यांचे व्यक्तिमत्व
शहरी सुशिक्षित मध्यमवर्ग ममता यांना दैत्य मानतो. तर याच्या विपरीत अर्धशिक्षित गरीब ग्रामीण मतदार त्यांना दयाळू देवता मानतो. ममतांना त्यांच्या या प्रतिमांची पक्की जाणीव आहे. आपली कोणती प्रतिमा कुठे उपयोगी पडते. हे त्यांना अचूक उमगते. म्हणून त्या बुद्धिमान आणि कर्तृत्ववान आहेत.
तीन दशकांहून प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दिदिंसाठी २०१६ ची निवडणूक ही आजवरची सर्वात अवघड लढाई होती. विरोधी मतांची फुट टाळण्यासाठी अनेक पिढ्या वैर असलेले कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट एकत्र आले. मोदी-शाह जोडीला देखील मामातांबद्दल सहानुभाव नव्हता. त्यांनी मामातांविरोधाची पट्टी उंचावली होती. निवडणूक आयोगाने देखील गैर व्यवहार रोखण्यासाठी जणू तिसरी विरोधी आघाडीच उघडली होती. बंगाल पोलीसही दंगेखोर तृणमूल कार्यकर्त्यांना जाब विचारू लागले. यातून ममता एकाकी आणि चिंताग्रस्त झाल्या. अनेक मित्र हितचिंतक अर्ध्यावरती हात सोडून निघून गेले होते. पाच वर्षापूर्वी डाव्यांच्या विरोधात ममतांना साथ देणारे बुद्धीजीवीनी देखील त्यांची साथ सोडली. निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील बड्या नेत्यांनी नोटांचे बंडले स्वीकारतानाचे व्हिडीओ ‘नारद’ ने उजेडात आणले. “चीट-फंड” च्या घोटाळयानंतर ही बंडलबाजी मतदारांना दिसू लागली. तृणमूल कॉंग्रेस पुरती भ्रष्ट झाल्याची चर्चा सुरु झाली. व्यक्तिगत सचोटी आणि अत्यंत साधी जीवनशैली असणाऱ्या ममता यांच्या अनेक वर्षाच्या ममता यांच्या प्रतिमेला तडे जाऊ लागले. त्या हादरल्या. मात्र चारी बाजूंनी कोंडी झालेल्या ममता वाघिणी सारख्या चवताळून उठल्या आणि जणू आग ओकू लागल्या. त्यांनी सारा बंगाल पिंजून काढत १५० सभा आणि ५० पदयात्रा काढत संपूर्ण वातावरण ढवळून काढले. साऱ्या नेत्यांशी संवाद साधत त्यांनी थेट मतदारंशी संवाद साधला.
गैरकृत्य करणाऱ्या पक्षातील नेत्यांपासून त्यांनी फारकत घेतली. प्रेत्येक भाषणात ममता जनतेला साद घालू लागल्या.
तुमच्या मतदार संघात कोण उभे आहे हे बघू नका. तिथे मामताच उभी आहे असं समजा. आणि मतदान करा.
दिदींनी साऱ्या प्रशासनाचे वळण आपला स्वभाव, सवयी आग्रह आणि काहीवेळा विक्षिप्तपणा यानुसार बदलला. साडेचार वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा मुख्यालयात त्यांनी शंभरहून अधिक बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये प्रेत्येक जिल्ह्यांच्या विकासकामांचा त्या आढावा घेत. यामुळे विकासकामांना गती आली.
पंतप्रधान मोदीप्रमाणेच मामती दिदिंवर शहरी सुशिक्षित वर्ग टीका तर ग्रामीण अशिक्षित वर्ग त्यांच्यावर अतोनात प्रेम करतो.
ममता बॅनर्जी यांनी स्वतः लिहिलेली पुस्तके
१. हसू
२. लोकशाहीची कत्तल
३. अस्तित्वासाठी संघर्ष
४. गडद होरायझन (इंग्रजी भाषेत)
पुरस्कार विजेती ममता दिदी
२०१२ साली टाईम मासिकाने तिचा उल्लेख जगातील १०० प्रभावशाली व्यक्तीमध्ये केला होता. याच वर्षी सप्टेंबर मध्ये “ब्लूमबर्ग मार्केट्स” या मासिकाने “वित्त जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्ती” या पुरस्काराने सन्मानित केले.
-ॲड.एम.डी.भागवत
BSL. L.L.B
CollegeCatta.com
मित्रांनो, ममता दिदिंबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्य कळवा आणि अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती तुम्हाला वाचायला आवडत असेल तर आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचं व्यासपीठ जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Leave a Reply