Makeup Kasa Karava Marathi Makeup Tips in Marathi Language आज आपला चेहरा सुंदर असावा आपल्याला कोणीतरी सुंदर म्हणावं असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येक चेहऱ्यामध्ये काहीतरी सुंदरता असतेच त्याला थोडासा मेकअप केला केला तर सोने पे सुहागा !!! या खास मेकअप टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगात येतील.
रंग हवा असतो, फुलाला गंध हवा असतो ,तसं स्त्रियांना एक नवीन सौंदर्य हवं असतं .
Makeup Kasa Karava Marathi Makeup Tips in Marathi Language
मेकअप कसा करावा मेकअप टिप्स मराठी
लग्न -समारंभ , सण सुरू झाले की, मग वेगवेगळ्या सौंदर्याची हिरवळ बघायला मिळते; डोळ्यासमोर सौंदर्याच तेज उभं राहतं. मेकअपला आपण सौंदर्याची कला म्हणू शकतो. आपल्याला जेव्हाही कधी खास समारंभाला जायचे असते, त्यावेळी प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपण खूप सुंदर दिसावं. मेकअप करणे आपल्यासाठी खूप गरजेचे असते. मेकअप ही एक अशी गोष्ट आहे, जी खराब चेहर्याला सुद्धा सुंदर आणि आकर्षित बनवू शकते. पण जर मेकअप योग्य रितीने नाही केला तर मेकअपच आपल्या चेहर्याला अधिक खराब बनवू शकतो. थोडक्यात काय, तर मेकअप ह्या मध्ये जेवढे फायदे तेवढेच तोटे सुद्धा आहेत. पण जर आपण घरगुती सौंदर्य प्रसाधने वापरली तर तेवढा आपला तोटा होत नाही. म्हणून काही मेकअप टिप्स असतात. आपण त्या नियमित पाळल्या चेहर्याला एक अनोखा रंग मिळतो.
मेकअप करण्याची पद्धत मेकअप कसा करतात
Daily Makeup Tips in Marathi
मेकअप चे असंख्य प्रकार असतात. एंगेजमेंट , मेंदी मेकअप , पार्टी मेकअप , विधीसाठी मेकअप , चाइल्ड मेकअप , माॅडेलिंग साठी मेकअप , सोसायटी मेकअप , सिनियर्स मेकअप इत्यादी ….
मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी
आपण मेकअप करताना आपल्या चेहर्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मेकअपसाठी अंडाकृती चेहरा सर्वात जास्त आदर्श मानला जातो. मेकअप करण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. जर तुमचा चेहरा साफ नसेल, तर तुम्हाला मेकअपचा चांगला परिणाम मिळणार नाही. मेकअप करण्यापूर्वी तुमच्या त्वचेला मोईस्चराईज करा. यात तुम्ही कच्च दुध किंवा बर्फ एका कपड्यात बांधून सुद्धा वापरू शकता. सर्व प्रथम मेकअप करण्यासाठी आपला चेहरा उजळ दिसण्यासाठी नानाप्रकारचे फाउंडेशन वापरले जाते. फाऊंडेशनचा विचार करता यात तीन प्रकार आढळतात.
Makeup Kasa Karava Marathi Makeup Tips in Marathi Language
लिक्वीड , क्रिम आणि पावडरफाउंडेशनच्या वापरासाठी मऊ स्पंजचा वापर करावा. चेहर्यावर फाउंडेशन लावून घेऊन हलक्या हाताने स्पंज फिरवावा. चेहर्याप्रमाणेच मानेवरही फाउंडेशन लावावे. त्याचप्रमाणे आपल्याला चेहर्याला फाउंडेशन सुट होत नसेल तर आपण डाळीचं पीठ वापरू शकतो त्यानेही चेहर्याला उजळ पणा मिळतो. तसेच आपल्या चेहर्याचा तेलकट पणा नाहिसा होतो , चेहर्यावरील छोटे डाग, खड्डे, काही गडद वर्तुळे झाकली जातात.
Eye Makeup Tips in Marathi language
Eye Makeup Tips in Marathi language
त्याचबरोबर मेकअप करतांना डोळ्यांकडे सर्वात जास्त लक्ष दिले पाहिजे. कधीही मेकअपची सुरुवात आयशॅडो लावून करावी. तुम्ही तुमच्या वस्त्राच्या रंग प्रमाणे आयशॅडो लावू शकता. तसेच तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी मस्कारा अवश्य करा. ह्याने तुमच्या डोळ्यांना चमक आणि पापण्यांना वक्रदार बनवेल. जर तुमच्या डोळ्यांखाली खूप जास्त प्रमाणात गडद वर्तुळे असतील तर काजळ याचा वापर करू नये. ते कमी करण्यासाठी तुम्ही नियमित दररोज १५ – २० मिनिटे डोळ्यावर काकडी ठेवून आराम करू शकतात. जेणेकरून तुमचे डोळे स्वच्छ आणि तेज येईल.
त्यानंतर आयलायनर लावावा. आयलायनर लावत असतांना आधी डोळयांची ठेवन बघावी; जर डोळे लहान असतील तर आयलायनर जाडसर लावावा यामुळे डोळे उठून दिसतात; मस्कारा लावावा. गालावर मेकअपचा हात फिरवताना तोच रंग जबडयापाशी आणि गालावरच्या कडांवर लावावा. डार्क ब्रशने त्वचा कोरडी होण्याचा धोका असतो. नेहमी ब्राईट आणि ग्लासी कलर वापरावेत. गोर्या चेहर्याने लाईट पिंक शेड वापरावा.
Lips Beauty Tips in Marathi language
Lips Beauty Tips in Marathi language
त्यानंतर आपला चेहरा दुसर्यांना आपले ओठ आकर्षित करतात. चेहर्याच्या रंगा प्रमाणे आपण ओठांवर लिपस्टिक लावू शकतो. ओठांचा मेकअप करण्यापूर्वी ओठांना सुद्धा मोईस्चराईज करून घ्यायचं. आपण यात शुध्द तुपाने ओठांच मोईस्चराईज करू शकतो; जेणेकरून आपले ओठ हिवाळ्यात फुटत नाहीत आणि ओठांतून रक्त सुद्धा येत नाही.
लिपस्टिक लावताना आऊटलाईन करून घ्यावी आणि मग त्यात आपल्या आवडीच्या रंगाची लिपस्टिक लावावी.
गोर्या चेहर्यांसाठी ओठांवर गडद जसे की लाल, ऑरेंज, ब्राऊन, गुलाबी रंगाची लिपस्टिक लावू शकता; तसेच सावळया चेहर्यांसाठी फिकट गुलाबी किंवा लाल रंगाची लिपस्टिक लावू शकता. त्यानंतर ओठांना लावलेल्या लिपस्टिकच्या रंगाचे लिपगलाँस वापरावे; ते जर उपलब्ध नसेल तर आपण लिपकेअर वापरू शकतो. जेणेकरून आपले ओठ आणखीन चमकतील. या पद्धतीने काळजीपूर्वक मेकअप केला तर मेकओव्हरचा आनंद मिळवता येतो.
मेकअप कसा काढावा
मेकअप करण्याएवढेच लक्ष मेकअप उतरण्याकडे द्यावे. न कंटाळता मेकअप धुणे आणि त्वचेवर ओलावा देणारे क्रिम लावणे महत्त्वाचे आहे. मेकअप अधिक काळ त्वचेवर राहिल्यास त्याचे काही साइड इफेक्ट्स भोगावे लागतात हे लक्षात ठेवावे. मात्र, त्यासाठी प्रत्येक वेळेस पार्लर मध्ये जाणं जमत नाही आणि घरीच पटकन मेकअप कसा करायचा याचं ज्ञान प्रत्येकाला असतचं असं नाही. प्रसंगानुसार हलकासा मेकअप करण्याचं ज्ञान आज बहुतेक मुलींना असतं.
त्वचेनुसार फाउंडेशन हे बहुतेकींना माहित असतं; मग ह्याने चेहर्यावरचा मेकअप उत्तम दिसून येतो. पूर्वीचे लोक असे म्हणयाचे की, बाईचं सौंदर्य तिच्या केसात लपलेलं असतं. त्यामुळे आपल्याला अधिक केसांची काळजी घ्यावी लागेलं; तसेच वरचा किरकोळ सौंदर्य प्रसाधने वापरावीत. मग संपूर्ण मेकअप झाल्यावर आपल्या चेहर्याला एक नवीन लुक मिळतो. आणि त्यात आपल्या या चेहर्यासाठी खूप गोड प्रतिसाद मिळाला तर स्वतःला एक फुलपाखरू बनल्याचा आभास होतो आणि आनंद गगनात मावेनासा होतो.
-तेजल महाजन.
Leave a Reply