Makar Sankranti festival Information in Marathi मकर संक्रांति मराठी निबंध Makar sankranti in marathi
भारतामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात, त्यामध्ये सर्वांचे असे वेगळे स्थान वेगळे महत्व आहे, काही सणांचे धार्मिक महत्व आहे, तर काही सणांना शास्त्रीय दृष्टीकोनातुन महत्वाचे स्थान आहे. परंतु नविन वर्ष सुरू झाल्यानंतर पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती. हा नविन वर्षातील पहिला सण आपणास सर्व रूसवे फुगवे दूर करण्याची संधी देखील देतो, परंतु हिंदू संस्कृतीमधील हा एकमेव सण दरवर्षी एकाच दिवशी येतो तो म्हणजे 14 जानेवारीला क्वचितच तो 15 जानेवारीला येतो, परंतु ते कदाचितच. याचे कारण हा एकमेव सण सूर्याच्या स्थानावर आधारलेला आहे. बाकी सर्व सण हे चंद्राच्या स्थानावर आधारलेले असतात. सोलर सायकल ही दर 8 वर्षांनी एकदा बदलते, त्या वेळी मात्र हा सण 15 तारखेला साजरा केला जातो. मागील दोन वर्षापुर्वी म्हणजेच 2016 ला मकर संक्रांती ही 15 तारखेला साजरी करण्यात आली होती. मकर संक्रांती सण दर 50 वर्षानंतर एक तारीख पुढे जाते. याचे उदाहरणच द्यावयाचे म्हटले तर, स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी रोजी झाला होता, त्या वेळी मकर संक्रांतीचा दिवस होता, याप्रमाणे जर पाहिले तर, 2050 साली हा सण 15 जानेवारीला साजरा होईल. असेही अंदाज लावले जात आहेत.
मकरसंक्रांती या सणाबद्दल दंतकथाही सांगितल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे Story of Makar sankranti in Marathi. Makar Sankranti festival Information in Marathi
अनादी वर्षांपुर्वी संकरासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार त्रास देत असे, मग त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांती देवीने संकरासुराचा वध केला आणि लोकांची त्याच्यापासून सुटका केली. याला आणखी एक अख्यायिका आहे. ती म्हणजे, महाभारतामध्ये कुरु वंशाचे संरक्षक महाराज भीष्म बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान प्राप्त होते. त्यांनी या शुभ दिवशी म्हणजेच उत्तरायण सुरू होताच प्राणत्याग केल्याची गाथा आहे. हिंदू परंपरेमध्ये उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायन कालावधी पेक्षा जास्त शुभ मानला जातो.
बारा राशींमधील एक मकर रास आहे, सूर्य एका राशिमधून दुसर्या राशीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रमण त्यालाच संक्रांती असे म्हटले जाते. त्याचबरोबर मकर संक्रांती दिवशीच सूर्य धनु राशीतुन मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या सणाला मकर संक्रांती असे म्हटले जाते. या दिवसा अगोदर रात्र मोठी असते दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवास मोठा होत जातो. या दिवसा पासून थंडी कमी होऊन गर्मीचे दिवस सुरू होतात.
महाराष्ट्रामध्ये हा सण तीन दिवस साजरा केला जातो. या 3 दिवसांमध्ये संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी, भोगीच्या दुसर्या दिवशी संक्रांत आणि संक्रांतीच्या किंक्रांत अशी नावे देण्यात आली आहेत. संक्रांतीस सर्व जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे सांगून प्रेम आणि चांगली भावना वाढीस लागण्यास शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी एकमेकींना हळदी-कुंकू लावतात.
अनेक ठिकाणी या दिवशी पतंग उडवून हा सण साजरा करतात. भारतामध्ये गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी हा सण पतंगाचा सण म्हणून ओळखला जातो. पतंग सकाळी सकाळी उडवल्याने शरीराला ऊन लागून अधिक प्रमाणात ड जीवनसत्व मिळते. यामुळे थंड हवेपासून होणार्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी मदत मिळते.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अनेक यात्रा आयोजित केल्या जातात, यात सर्वात प्रमुख म्हणजे प्रसिद्ध कुंभमेळा. हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी नाशिक, हरिद्वार, प्रयाग, उज्जैन अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित केला जातो. याशिवाय कोलकाता शहरा जवळ गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गासागर यात्रा आयोजित करण्यात येत असते. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थ स्नान आणि दान पुष्यदायी मानले आहे. या दिवशी प्रयाग, गंगासागर इत्यादी ठिकाणी भक्तांचे प्रचंड मेळे भरतात. मकरसंक्रांतीस अनेक यात्रांचे आयोजन देखील केले जाते. यामध्ये सर्वात प्रमुख म्हणजे प्रख्यात कुंभमेळा जो दर बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित होतो. याबरोबरच गंगासागर येथे, कोलकाता शहराजवळ गंगा नदी, ज्याठिकाणी बंगालच्या उपसागरास मिळते, तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते. केरळच्या शबरीमला येथे मकरज्योतीचे दर्शन घेण्यास या दिवशी अनेक भाविकांची गर्दी होते. पूर्व भारतातील संक्रांत: संक्रात संपुर्ण दक्षिण पूर्व आशियामध्ये थोड्या फार बदलाने साजरी केली जाते.
मकर संक्रांतीला भारतातील विविध भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.
Makar Sankranti festival Information in Marathi
काही राज्यांमध्ये या नावाने ओळखला जातो मकर संक्रांती…
पंजाब – लोहडी किंवा लोहळी हिमाचल प्रदेश – लोहडी किंवा लोहळी, बिहार – संक्रान्ति, आसाम – भोगाली बिहु, पश्चिम बंगाल – मकर संक्रान्ति, ओडिशा – मकर संक्रान्ति, गुजरात व राजस्थान – उतरायण (पतंगनो तहेवार) पतंगांचा सण, कर्नाटक, आंध्र प्रदेश – संक्रांति, तमिळनाडू – पोंगल शबरीमाला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव साजरा केला जातो,
भारताचे अन्य भागात मकर संक्रान्ति
थारू लोक – माघी, थायलंड – सोंग्क्रान. लाओस – पि मा लाओ
म्यानमार – थिंगयान
ही मकर संक्राति मराठी माहिती कशी वाटली हे प्रतिक्रिये मधून आवर्जून कळवा. मकर संक्रांति मराठी निबंध.
-सागर गोरखे.
Leave a Reply