Majhi Aai Nibandh Marathi Madhe My Mother Essay in Marathi Language
माझी आई न थकता आमची काळजी घ्यायची आणि आजही घेते. वडील रिटायर्ड झालेत, सध्या ते आराम करतात पण आई कधीच रिटायर्ड होत नाही ती आजही सकाळी सहाला उठते. रोज स्वयंपाक आणि दैनंदिन काम करते.एवढं प्रेम करण्याची आणि कष्ट करण्याची शक्ती तिच्यात कुठून येते माहित नाही.सध्या आईला लिहिलेले हे पत्र व्हायरल होत आहे…
माझी आई निबंध मराठी माझी आई भाषण मराठी माझी आई वर निबंध मराठी Short Mazi Aai Essay in Marathi Language Short Essay on Majhi Aai in Marathi Studymode Mazi Aai Essay in Marathi
Majhi Aai Nibandh Marathi Madhe My Mother Essay in Marathi Language
Mazi Aai Speech in Marathi Language Mazi Aai Nibandh Marathi Marathi Nibandh lekhan Mazi Aai
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, असं म्हण्टलं जातं आणि हे सत्यच आहे. जगातील दैवी नातं कोणत असेल तर ते आई आणि लेकराचं नातं. जशी नऊ महीने आईचा पोटात मुलाची नाळ जोडलेली असते तशीच नाळ आईशी मुलाची नात्याने आयुष्यभर जोडलेली असते.
जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत आपली काळजी ती करते. कारण आपण वयाने कितीही मोठे झालो तरी आईसाठी आपण तीचे मुलच असतो.
माझी आई. आई हा शब्द कोणी तयार केला मला माहीत नाही त्याचप्रमाणे मी लहान असताना कधी आई या शब्दाचा बरोबर उच्चार केला असेल हे देखील मी सांगू शकत नाही. आजही आई या शब्दाचे अर्थ काढायला शब्द अपुरे पडतात जे शब्द आईनेच मला शिकवले. मुळात आई हा फक्त शब्द नसून ही एक भावना आहे जी आपल्यावर प्रेम करते आपल्याला मरेपर्यंत माया लावते.
मी रोज शाळेत जायला लागलो, पुढे काॅलेज. नौकरी आणि लग्न असं वाटतं कोणीतरी सगळ्या चौकटी ठरवलेल्या आहेत याचा बाहेर कोणीच जाऊ शकत नाही. पण या चौकटीमध्ये राहून आपल्यासाठी आई सतत झटते.
मला चांगलं आठवतंय. बाबा नौकरीला आणि मी शाळेत जायचो तेव्हा आईचा दिवस रोज सकाळी ६ ला सुरू व्हायचा. घरातील साफसफाई ते चहा, डबा भरुन देणे ही सगळी काम ती रोज न थकता करायची एवढी शक्ती तीचात कुठून येते हे आजही मला समजलं नाही.
मी, कधी वडील आजारी पडल्यावर आमची काळजी आईच घ्यायची पण त्यावेळी आई आजारी पडल्यावर तिची काळजी घेणारं कुणीच नव्हतं हे आज मला समजलं.
आजही तीचा दिवस सकाळी सहालाच सुरू होतो. दैनंदिन काम करायला ती तेवढ्याच उत्साहाने सुरवात करते. वडील आता रिटायर्ड झाले. ते आराम करतात. पण आई कधीच रिटायर्ड होत नाही ती आजही तेवढ्याच प्रेमाने स्वयंपाक बनवते, घरकाम करते न थकता अशी माझी आई. बर्याच लोकांचे वेगवेगळी स्वप्न असतात ती पुर्ण करण्यासाठी ते खुप प्रयत्न करतात. आज मला समजलं आमची काळजी घेणं हेच माझा आईच स्वप्न होतं.
-अभिजीत हजारे.
Majhi Aai Nibandh Marathi Madhe My Mother Essay in Marathi Language
Mazi Aai Essay in Marathi Language Short Essay on Majhi Aai in Marathi Studymode Mazi Aai Essay in Marathi Mazi Aai Speech in Marathi Language माझी आई निबंध मराठी माझी आई वर निबंध मराठी Short माझी आई भाषण मराठी माझी आई निबंध मराठीत Majhi Aai Essay in Marathi Nibandh Mazi Aai Nibandh Marathi Marathi Nibandh lekhan Mazi Aai
Leave a Reply