धोनी हा फक्त विकेटकीपर आणि यशस्वी बॅट्समन नाही तर तो उत्तम रणनीतीकार आहे. धोनिच्या संघर्षाबद्दल जाणून घेऊयात.
यष्टीच्या मागे उभा राहून तो जणू जादूच करायचा. अशक्य कॅच असोत, विकेटकिपारिंग असो, असं वाटतं तो जणू यष्टीच्या पुढे उभा असलेल्या फलंदाजाच्या मनात काय चाललाय हे त्याला समजायचं….
Mahendra Singh Dhoni information Biography in Marathi Language
महेंद्रसिंग धोनी माहिती मराठी

महेंद्रसिंह धोनी
भारतीय क्रिकेटचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ज्याची ओळख आहे तो माही.
आईसीसी च्या सर्व ट्रॉफी जिंकनारा जगातील एकमेव करणार असा आपला माही.
जगातील सर्वात चपळ यष्टिरक्षक आणि धोनी रिव्यु सिस्टम अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा आपला लाड़का महेंद्रसिंह धोनी..
रांची सारख्या छोट्या शहरातून येऊन भारतीय क्रिकेटचा बादशाह होण ही काही साधी आणि सोप्पी गोष्ट मुळीच नवती पण त्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर सचिन,द्रविड़,गांगुली यासारख्या भारतीय दिग्गजांच्या पंक्तित बसन्याचे स्थान मिळविले.
याच आपल्या माही बद्दल माहिती देन्याचा है प्रयत्न.
धोनीचा जन्म 7 जुलै 1981 ला बिहार मधील रांची (आता झारखंड मध्ये समाविष्ट झाले आहे) येथे झाला. मुळात हा राजपुत परिवार उत्तराखंड मधील होता. त्यांचे वडिल पान सिंह मेकाॅन (स्टील मंत्रालया अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम) सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी कनिष्ठ व्यवस्थापन पदांवरही काम केले आहे.आई देवकी देवी या गृहीणी आहेत. माही ला एक मोठा भाऊ (नरेंद्र सिंह धोनी) आणि एक मोठी बहिण (जयंती गुप्ता) आहे. भाऊ राजकारणात सक्रिय असुन बहिण इंग्रजी विषयाची शिक्षीका आहे.
झारखंड च्या रांची मध्ये श्यामाली इथं डीएव्ही जवाहर विद्या मंदिर मधुन धोनी ने आपले शालेय शिक्षण पुर्ण केले.तो एक अथलेटिक विद्यार्थी होता, सुरूवातीच्या काळात क्रिकेट पेक्षा बॅडमिंटन आणि फुटबाॅल या खेळांमधे त्यांला अधिक रूची होती. आपल्या शाळेतील फुटबाॅल टिमचा तो चांगला गोलकिपर म्हणुन ओळखला जायचा.
या दरम्यान धोनी च्या फुटबाॅल कोच ने त्याला स्थानीक क्लब च्या क्रिकेट टीम चा विकेटकिपर म्हणुन पाठविले. त्यावेळी धोनी ने आपल्या चांगल्या प्रदर्शनाने सगळयांनाच आकर्षीत केले आणि 1995 ते 1998 दरम्यान कमांडो क्रिकेट क्लब टीम मधे नियमित विकेटकिपर म्हणुन स्थान मिळविले.माही ने सुरूवातीपासुन चांगले प्रदर्शन केले आहे.1997.98 दरम्यान माही ला विनु मंकड ट्राॅफी करीता अंडर.16 चॅम्पियनशिप करीता निवडले. 10 वी नंतर माही ने क्रिकेटला गांभीर्याने घेण्यास सुरूवाती केली होती. क्रिकेट करता या दिग्गज खेळाडुला आपल्या शिक्षणासोबत मात्र तडजोड करावी लागली.माही ने 12 वी नंतर शिक्षण सोडले.
Mahendra Singh Dhoni information Biography in Marathi Language
महेंद्रसिंग धोनी माहिती मराठी
1999.2000 मध्ये धोनी ला रणजी ट्राॅफी खेळण्याची संधी मिळाली.बिहार विरूध्द आसाम असा हा सामना खेळला गेला.या सामन्यात महेंद्र सिंग धोनी ने नाबाद 68 धावा केल्या. पुढच्या सत्रामधे धोनी ने बंगाल विरूध्द सामना खेळला यात त्याने शतक मारले तरी देखील संघ हा सामना हरला.
या ट्रॉफीच्या सत्रात माही ने एकुण 5 सामन्यांमधे 283 धावा काढल्या.या ट्रॉफीनंतर धोनी ने स्थानिक स्तरावर अनेक सामने खेळले. धोनीच्या चांगल्या प्रदर्शनानंतर देखील ईस्ट जॉन सिलेक्टर तर्फे त्यांची निवड करण्यात आली नाही, यामुळे धोनी खेळापासुन दुरावला आणि त्याने नौकरी करण्याचा निर्णय घेतला.
वयाच्या 20 व्या वर्षी माही ला खेळ कोटयातुन खडगपुर रेल्वे स्थानकावर ट्रॅव्हलिंग टिकीट परीक्षक (टीटीई) पदावर नौकरी मिळाली आणि तो पश्चिम बंगाल मधल्या मिदनापुर ला निघुन गेला.
2001 ते 2003 पर्यंत धोनीने रेल्वे कर्मचारी म्हणुन काम केलं.धोनीला लहानपणापासुन खेळाची आवड असल्याने नौकरीत त्याचे मन जास्त काळ रमले नाही. दुलीप ट्रॉफीत निवड झाल्यावर देखील सामना खेळु शकला नाही. 2001 साली महेंद्र सिंग धोनीची पुर्व क्षेत्रात दुलीप ट्रॉफी खेळण्याकरीता निवड झाली.
परंतु बिहार क्रिकेट असोसिएशन ही माहिती माहीला वेळेवर देऊ शकले नाही कारण माही त्यावेळी पश्चिम बंगाल मधील मिदनापुर येथे होता. धोनीला ही माहिती त्यावेळी मिळाली जेव्हां त्यांची पुर्ण टिम अगरतला या ठिकाणी आधीच पोहोचली होती. या ठिकाणीच हा सामना खेळला जाणार होता.
माहीच्या मित्राने कोलकत्ता विमानतळावरून फ्लाईट पकडण्याकरता एका कारची सोय केली परंतु ती कार मध्येच खराब झाली आणि माही विमानतळावर वेळेवर पोहोचु शकला नाही. या सामन्यात दिपदास गुप्ता ने यष्टीरक्षक बनुन हा सामना खेळला.
सतत आपल्या चांगल्या प्रदर्शनामुळे 2004.2005 साली महेंद्र सिंग धोनीची निवड राष्ट्रीय एकदिवसीय सामन्याकरीता झाली. आपला पहिला एकदिवसीय सामना त्याने बांग्लादेश संघा विरूध्द खेळला होता. आपल्या पहिल्या सामन्यात धोनी चांगले प्रदर्शन करू शकला नाही आणि केवळ शुन्यावर बाद झाला.
खराब प्रदर्शना नंतर देखील धोनीच्या नशीबाने त्याला साथ दिली आणि म्हणुनच पाकिस्तान विरूध्द खेळल्या जाणा.या एकदिवसीय सामन्यासाठी निवडसमीतीने त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. या वेळी मात्र धोनीने निवडकर्त्यांना आणि क्रिकेट रसिकांना निराश केले नाही आणि या सामन्यात जिद्दीने आणि जोमाने पाकिस्तान विरूध्द उत्तम प्रदर्शन केले.
महेंद्र सिंह धोनी ला आज एक चांगला क्रिकेटर म्हणुन सर्वदुर ओळख आहे. एम.एस धोनी या नावाने तो सुपरीचीत आहे. क्रिकेट जगतात त्याने आपल्या भारताचे नाव सर्वदुर चमकविले आहे. लहान गावातुन निघुन एक महान क्रिकेटपटु होण्यापर्यंत धोनी ला अनेक संघर्षामधुन जावे लागले. या संघर्षामधुन निघाल्यानंतर तो आज या ठिकाणी पोहोचलाय. जगापुढे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Mahendra Singh Dhoni information Biography in Marathi Language
महेंद्रसिंग धोनी माहिती मराठी
सुरूवातीच्या काळात महेंद्र सिंह धोनी करता हा प्रवास एवढा सहज सोपा मुळीच नव्हता पण क्रिकेट विषयी त्याला प्रचंड प्रेम आणि कठोर मेहनत घेण्याची तयारी या त्यांच्या जमेच्या बाजु ठरल्या म्हणुन त्याने आज हे यश मिळविले आहे. आज धोनी भारतातील दिग्गज क्रिकेट खेळाडुंच्या यादीत पोहोचला आहे एवढेच नाही तर भारतिय क्रिकेट संघात आपल्या कर्णधार पदाने कित्येकांची मने जिंकली शिवाय संघाला चांगले मार्गदर्शन देखील केले.
शाळेत असतांनाच धोनीने क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती परंतु भारतिय क्रिकेट संघाचा हिस्सा होण्यासाठी त्याला अनेक वर्ष लागली. ज्यावेळी त्याला भारताकडुन खेळण्याची संधी मिळाली त्यावेळी त्याने या संधीचे अक्षरशः सोने केले व हळुहळु स्वतःला सिध्द केले. एवढेच नाही तर आज जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेट विरांमधे ’’माही’’ चे नाव घेतले जाते, त्याने मर्यादित षट्कातही भारतिय संघाचे उत्तम नेर्तृत्व केले.
11 सप्टेंबर 2007 पासुन 4 जानेवारी 2017 पर्यंत महेन्द्र सिंग धोनी भारतिय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावर होता व 2008 ते 28 डिसेंबर 2014 पर्यंत कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार होता. साहसी, रोमांचक व्यक्तिमत्व, व युनिक हेयरस्टाईल ठेवणारा धोनी भारताचा एक लोकप्रीय क्रिकेटर व मार्केटिंग आयकॉन देखील ठरला आहे. धोनी एक यशस्वी, आक्रमक, उजव्या हाताचा फलंदाज व यष्टिरक्षक आहे.
माहीला आपल्या प्रतिभेचा थोडा सुध्दा गर्व नाही म्हणुन देखील तो भारताचा आवडता क्रिकेट खेळाडु आहे. धोनी त्या कर्णधारांपैकी एक आहे ज्यांनी ज्युनियर आणि भारतीय ए क्रिकेट संघाच्या क्रमवारीत राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. माही एक ’’आदर्श’’ आणि पिन अप.स्टार देखील आहे.
माही ने भारताच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघाला 2011 साली दुसरा विश्वकप मिळवुन देण्यात आपले महत्वपुर्ण योगदान दिले आहे या विजयामुळे त्याचे फार कौतुक झाले आणि भारतीय संघातील सर्वात चांगला खेळाडु ठरला. धोनी ने 23 डिसेंबर 2004 ला बांग्लादेश विरूध्द भारताकडुन एकदिवसीय पहिला सामना खेळला.
पुढे 2007 ते 2016 पर्यंत भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावर राहिला आणि आपल्या प्रतिभेला सिध्द केले. धोनीने 2 डिसेंबर 2005 ला श्रीलंके विरूध्द कसोटी खेळाडु म्हणुन पहिला सामना खेळला होता 2008 ते 2014 पर्यंत तो कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार होता.
आपल्या खेळातील आक्रमक शैलीमुळे त्याने विशेष ओळख तयार केली. माही भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे ज्यांनी आपल्या संघाचे चांगले नेर्तृत्व केले आणि अनेक सामन्यांमधे भारताला विजय मिळवुन दिला. या व्यतिरीक्त त्यांच्या नेर्तृत्वात अनेक नोंदी देखील आहेत.
त्याच्या नेर्तृत्वातच 2009 साली भारतिय संघ क्रमांक एक चा संघ बनला 2007 साली आयसीसी विश्वचषक 20.20 आणि 2013 आयसीसी चॅंपियंस ट्राॅफी जिंकतांनाच्या दरम्यान देखील महेंद्र सिंग धोनीने भारतिय क्रिकेट संघाचे नेर्तृत्व केले होते. आयपीएल सामन्यांमधे देखील माही ने अनेक आंतरराष्ट्रीय रेकाँर्डवर आपले नाव कोरले आहे.
आपल्या आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्सच्या मदतीने 2010 आणि 2011 मधे दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.
माही ने सुरूवातीपासुन चांगले प्रदर्शन केले आहे.1997.98 दरम्यान माहीला विनु मंकड ट्रॉफी करीता अंडर 16 चॅम्पियनशिप करीता निवडले. 10 वी नंतर माहीने क्रिकेटला गांभीर्याने घेण्यास सुरूवाती केली होती. क्रिकेट करता या दिग्गज खेळाडुला आपल्या शिक्षणासोबत मात्र तडजोड करावी लागली. माहीने 12 वी नंतर शिक्षण सोडले.
1998 च्या दरम्यान भारताचा हा महान खेळाडु फक्त शालेय आणि क्लब स्तरावरच क्रिकेट खेळत होता त्याच वेळी कोल फिल्ड लिमीटेड संघात खेळण्याकरीता माहीची निवड झाली. या दरम्यान माही ने क्रिकेट असोसिएशनचे पुर्व राष्ट्रपती देवल सहाय यांना आपल्या दृढसंकल्पाने, कष्ट, आणि चांगल्या प्रदर्शनाने खुप प्रभावित केले. त्यामुळे धोनीला प्रथम श्रेणीतील क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी दिली गेली.
1998.99 दरम्यान माही पुर्वी जोन यु.19 संघ किंवा इतर भारतिय संघ बनविण्यात यशस्वी होउ शकला नाही परंतु पुढच्या सत्रा मधे सीके नायडु ट्रॉफी करीता पुर्वी जोन यु.19 संघाकरता माहीची निवड झाली. दुर्देवाने यावेळी धोनीच्या संघाने चांगले प्रदर्शन केले नाही परिणामी त्यांचा संघ निच्चांकावर घसरला.
1999.2000 मध्ये महेंद्रसिंग धोनीला रणजी ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली. बिहार विरूध्द आसाम असा हा सामना खेळला गेला.या सामन्यात महेंद्र सिंग धोनीने नाबाद 68 धावा केल्या. पुढच्या सत्रामधे धोनीने बंगाल विरूध्द सामना खेळला यात त्याने शतक मारले तरी देखील संघ हा सामना हरला.
या ट्रॉफी च्या सत्रात महेंद्रसिंग धोनीने एकुण 5 सामन्यांमधे 283 धावा काढल्या.या ट्रॉफी नंतर धोनी ने स्थानिक स्तरावर अनेक सामने खेळले. धोनीच्या चांगल्या प्रदर्शनानंतर देखील ईस्ट जॉन सिलेक्टर तर्फे त्यांची निवड करण्यात आली नाही, यामुळे धोनी खेळापासुन दुरावला आणि त्याने नौकरी करण्याचा निर्णय घेतला.
वयाच्या 20 व्या वर्षी माहीला खेळ कोटयातुन खडगपुर रेल्वे स्थानकावर ट्रॅव्हलिंग टिकीट परीक्षक (टीटीई) पदावर नौकरी मिळाली आणि तो पश्चिम बंगाल मधल्या मिदनापुरला निघुन गेला.
MS Dhoni information in Marathi for project
2001 ते 2003 पर्यंत धोनीने रेल्वे कर्मचारी म्हणुन काम केलं. धोनीला लहानपणापासुन खेळाची आवड असल्याने नौकरीत त्याचे मन जास्त काळ रमले नाही. दुलीप ट्रॉफीत निवड झाल्यावर देखील सामना खेळु शकला नाही. 2001 साली महेंद्र सिंग धोनीची पुर्व क्षेत्रात दुलीप ट्रॉफी खेळण्याकरीता निवड झाली. परंतु बिहार क्रिकेट असोसिएशन ही माहिती माहीला वेळेवर देऊ शकले नाही कारण माही त्यावेळी पश्चिम बंगाल मधील मिदनापुर येथे होता. धोनी ला ही माहिती त्यावेळी मिळाली जेव्हां त्यांची पुर्ण टिम अगरतला या ठिकाणी आधीच पोहोचली होती. या ठिकाणीच हा सामना खेळला जाणार होता.
माहीच्या मित्राने कोलकत्ता विमानतळावरून फ्लाईट पकडण्याकरता एका कारची सोय केली परंतु ती कार मध्येच खराब झाली आणि माही विमानतळावर वेळेवर पोहोचु शकला नाही. या सामन्यात दिपदास गुप्ता ने यष्टीरक्षक बनुन हा सामना खेळला.
2002.2003 सत्रा दरम्यान धोनी ने रणजी ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफीत चांगले प्रदर्शन सुरू ठेवले, त्यामुळे क्रिकेट विश्वात त्याला ओळख मिळाली.
2003 मध्ये जमशेदपुर इथं प्रतिभा संसाधन विकास विंगच्या झालेल्या सामन्यात माजी कर्णधार प्रकाश यांनी माहीला खेळतांना पाहिले आणि धोनीच्या खेळाची माहिती त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला दिली आणि अश्यात. धोनीची निवड बिहार अंडर.19 संघाकरता झाली. पुर्व जोन संघातर्फे धोनीने 2003 – 2004 सत्रात देवधर ट्रॉफी स्पर्धेत भाग घेतला.
धोनीने हा सामना जिंकला आणि देवधर ट्रॉफी आपल्या नावावर केली. या सामन्यात धोनीने आणखीन एक शतक झळकवले. या सत्रात माहीने एकुण 4 सामने खेळले होते यात त्याने 244 धावा बनविल्या.
2003.2004 सत्रात धोनीची झिम्बाॅम्बे आणि केनिया दौ.याकरीता ’भारतिय संघात’ निवड करण्यात आली होती.
‘इंडिया ए टीम’ तर्फे धोनी पहिला सामना झिम्बाँम्बे इलेवन विरूध्द यष्टिरक्षक म्हणुन खेळला. सामन्या दरम्यान 7 झेल त्याने पकडले आणि स्टंपींग केली. महेंद्र सिंग धोनीने आपल्या संघाची ’पाकिस्तान ए’ संघाला हरविण्यात देखील मदत केली. या सामन्या दरम्यान धोनीने अर्धशतक झळकविले.
धोनीने अश्या तऱ्हेने तीन देशांसमवेत खेळल्या गेलेल्या सामन्यांमधे चांगले प्रदर्शन केले. त्याचा खेळ पाहुन त्याच्यातली प्रतिभा भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार सौरव गांगुलीच्या देखील लक्षात आली.
महेंद्रसिंग धोनी या खेळाडूंची संपूर्ण माहिती निबंध मराठी
Indian cricketer Mahendra singh dhoni information in marathi
सतत आपल्या चांगल्या प्रदर्शनामुळे 2004.2005 साली महेंद्र सिंग धोनीची निवड राष्ट्रीय एकदिवसीय सामन्याकरीता झाली. आपला पहिला एकदिवसीय सामना त्याने बांग्लादेश संघा विरूध्द खेळला होता. आपल्या पहिल्या सामन्यात धोनी चांगले प्रदर्शन करू शकला नाही आणि केवळ शुन्यावर बाद झाला.
खराब प्रदर्शनानंतर देखील धोनीच्या नशीबाने त्याला साथ दिली आणि म्हणुनच पाकिस्तान विरूध्द खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी निवडसमीतीने त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. या वेळी मात्र धोनीने निवडकर्त्यांना आणि क्रिकेट रसिकांना निराश केले नाही आणि या सामन्यात जिद्दीने आणि जोमाने पाकिस्तान विरूध्द उत्तम प्रदर्शन केले.
या सामन्यात धोनीने 148 धावा काढुन पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज होण्याचा बहुमान मिळवीला. महेंद्र सिंग धोनीला भारत–श्रीलंका व्दिपक्षीय साखळी सामन्यांमधे पहिल्या दोन सामन्यांमधे फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही तरी देखील या मालिकेत तिसऱ्या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याकरीता पुढे करण्यात आले.
माहीने या संधीचे अक्षरशः सोने केले आणि उत्कृष्ट प्रदर्शन केले. या सामन्यात त्याने 299 धावांच्या लक्ष्याला पहाता 145 चेंडुत नाबाद 183 धावा बनविल्या. या मालिकेचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि जोरदार प्रदर्शन केल्याने त्याला मालिकावीर घोषीत करण्यात आले.
2005-2006 मध्ये भारत–पाकिस्तान एक दिवसीय मालिकेत धोनीने मालीकेत 4-5 सामन्यांमधे 68 धावा, नाबाद 72 धावा, नाबाद 2 धावा, नाबाद 77 धावा, बनविल्या आणि आपल्या संघाला 4-1 ने मालिका जिंकण्यास मदत केली.आपल्या चांगल्या प्रदर्शनाने धोनी 20 एप्रील 2006 ला रिकी पाँटिंगला मागे टाकत आयसीसी एक दिवसीय रॅंकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
त्यानंतर 2007 साली द्रविड़ने आपल्या फलंदाजीवर लक्ष द्यायच आहे म्हणून कर्णधारपद सोडले. तेव्हा साहजिकच सचिनचे नाव पुढे आले पण सचिनने नकार देत धोनीची क्षमता आहे अस सांगून त्याला कर्णधार करण्यास सांगितले. थोड्याच दिवसात पहिला t-20 विश्वचषक होता आणि सचिन, गांगुली, जहीर यासारख्या मुख्य खेळाडूंनी आपली नावे काढून घेतली तरी सुद्धा नवीन खेळाडूनवर विश्वास टाकला आणि भारताला पहिला t-20 विश्वचषक जिंकून दिला त्यातील पाकिस्तान विरुद्धचा बॉल आउटचा आणि अंतिम सामन्याची शेवटचे षटक जोगिंदर शर्मा या नवख्या गोलंदाजाला दिले हे कोणीच विसरु शकत नाही.
त्यांनातर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात जाऊन एकददिवसीय मालिकेत हरवले.
त्यानंतर 2011 चा विश्वचषक आणि त्यामधे अष्टपैलु म्हणून युवराजवर दाखवलेला विश्वास.
2013 च्या चैंपियंस ट्रॉफी मधे रोहित शर्माला सलामिविर म्हणून जागा दिली त्यानंतर रोहितने काय केले हे संपूर्ण जगाने अनुभवले.
गांगुली नंतर संपूर्ण टीम धोनीने तयार केली.
भारतीय क्रिकेट प्रेमी बोलायचे ऑस्ट्रेलियाकडे पॉन्टिंग सारखा कर्णधार, गिलक्रिस्ट सारखा विकेटकीपर फलंदाज आणि बेवन सारखा मैच फिनिशर आहे. आपल्याकडे असे कोणी नाही तेव्हा या सगळ्यांच्या रूपाने धोनी भारतीय क्रिकेटमध्ये आला.
त्याच्या यष्टिरक्षणाचे तर काय बोलावे चित्याच्या चपलाईने त्याने फलंदाजाला केलेले यष्टिचित किंवा न बघता केलेले धावचित असो ते एक नवलच आहे.
अत्यंत शांत, संयमी असणारा धोनी निवृत्ती घेताना पण कोणताच गाजावजा केला नाही.
“मैं पल दो पल का साथी हु” हे आपले आवडते गाने पोस्ट करून आपण क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती घेत आहोत असे जाहिर केले.
पण त्यांच्या कोटयवधी चाहत्यांचे मन मात्र दुखावले भारताच्या सर्वात सफल कर्णधाराला मैदानावर निवृत्ती घेताना बघण्याचे त्यांचे स्वप्न मात्र भंगले.
महेंद्र सिंग धोनी एक चांगला क्रिकेटर आहेच या व्यतिरीक्त तो एक चांगला व्यावसायिक देखील आहे. अनेक व्यवसायांशी तो जोडला गेला आहे शिवाय रांची इथं त्याचे मोठे हॉटेल देखील आहे ज्याचे नाव माही निवास असे आहे. एवढेच नाही तर 2016 साली महेंद्र सिंग धोनी कपडयांच्या व्यवसायात देखील उतरला त्याने रीती ग्रुप समवेत सेव्हन नावाचा कपडयांचा एक नवीन ब्रॅंड सुरू केला.
धोनी एक उत्तम क्रिकेटर आहे तशी त्याला वेगाची आणि वेगवेगळया गाडयांची देखील आवड आहे. त्याच्या जवळ आज अनेक महागडया कार आणि बाईक्सचा संग्रह आहे. धोनीने अनेक महागडया कार आणि दुचाकी विकत घेतल्या आहेत. धोनी जवळ आँडी क्यु 7 आहे, इतकेच नाही तर त्याच्याजवळ सर्वात महाग आणि शानदार SUV हमर H2 चा देखील समावेश आहे.
त्याने ही गाडी 2009 मध्ये खरेदी केली होती. या व्यतिरीक्त धोनी जवळ काँन्फेडरेट हैलकैट X132 ही शानदार बाईक आहे आणि सुपरबाईक कावासाकी निंजा H2 समवेत अनेक महागडया बाईक्स्चा संग्रह आहे. क्रिकेटच्या या उंचीवर पोहोचणं धोनी करीता अजिबात सोपं नव्हतं.
अनेक संघर्षांनंतर आणि जीवनातील चढ- उतारानंतर धोनीने क्रिकेट विश्वात स्वतःला या जागी स्थापीत केलं आहे. कोणतेही कार्य दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकतेने केलं तर यश नक्की मिळतं हे धोनी कडे पाहिल्यावर पटतं ! ! ! !
अक्षय जाधव
कडूस,राजगुरुनगर
Mahendra Singh Dhoni information Biography in Marathi Language
महेंद्रसिंग धोनी माहिती मराठी
MS Dhoni information in Marathi for project
information about Mahendra Singh Dhoni in Marathi
Mahendra Singh Dhoni Essay Nibandh in Marathi
Mahendra Singh Dhoni Nibandh in Marathi
महेंद्रसिंग धोनी माहिती मराठी मध्ये
महेंद्रसिंग धोनी यांच्या विषयी माहिती
महेंद्रसिंग धोनीची संपूर्ण माहिती
महेंद्रसिंग धोनी या खेळाडूंची माहिती
महेंद्रसिंग धोनी या खेळाडूंची संपूर्ण माहिती निबंध मराठी
Indian cricketer Mahendra singh dhoni information in marathi
भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी या खेळाडूंची माहिती
Cricket player information Biography in marathi
Leave a Reply