भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सत्याग्रह, अहिंसा या मार्गाचा अवलंब करणारे आणि देशाची एकता टिकवण्यासाठी ज्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले अशा महत्मा गांधीजी ‘बापू’ बद्दल महत्वपूर्ण माहिती. Mahatma Gandhi Information Biography History in Marathi language
Mahatma Gandhi Information Biography History in Marathi language
2 October Mahatma Gandhi Jayanti Speech Nibandh Marathi language
महात्मा गांधी एक अस नाव ज्या नावाला भारतातच काय पण संपूर्ण जगात परिचयाची अजिबात आवश्यकता नाही.
महात्मा गांधी यांचे विचार आणि शैक्षणिक कार्य
सत्य आणि अहिंसा या व्यतिरिक्त कोणत्याच शस्त्राचा वापर न करता इंग्रजांना झुकवून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारा हा ‘अवलिया’ म्हणजे महात्मा गांधी. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला 1920-1947 पर्यंतचा काळ हा गांधीयुग म्हणून ओळखला जातो.
महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर या गावी झाला. त्यांचे वडील पोरबंदर व राजकोट संस्थानात दिवाण म्हणून नोकरी करत होते आणि गांधीजींची आई पुतलीबाई खूप धार्मिक होत्या. गांधीजींवर श्रावणबाळ, राजा हरीचंद्राचा खूप प्रभाव होता. गांधींची शालेय जीवनात सामान्य विद्यार्थी होते .
माझा आवडता नेता महात्मा गांधी माहिती निबंध भाषण मराठी
मे 1883 मध्ये गांधीजींचा कस्तुरबाशी विवाह झाला त्यावेळी गांधीजींचे वय 13 वर्ष तर कस्तुरबाईंचे वय 14 वर्ष होते. 1887 साली ते बॉम्बे युनिव्हर्सिटीची मॅट्रिक परीक्षा पास झाले त्यांनतर ते समलदास कॉलेज भावनानगर मध्ये गेले. पुढे ऑगस्ट 1888 मध्ये ते लंडन मध्ये इनर टेम्पल मध्ये वकिलीचा अभ्यास करण्यासाठी गेले. जून 19891 मध्ये वकिलीचा अभ्यास पूर्ण करून परत भारतात आले. मुंबई मध्ये कायद्याची प्रॅक्टिस करायची त्यांची योजना सफल झाली नाही कारण ते खूप लाजाळू होते.
महत्मा गांधी यांचे दक्षीण आफ्रिकेतील कार्य
1993 साली त्यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या दादा अब्दुल्ला आणि कंपनी नावाच्या भारतीय कंपनी सोबत एका वर्षाचा करार केला ते त्या कंपनीचे वकील म्हणून दक्षिण आफ्रिकेत गेले होते. दक्षिण आफ्रिकेत त्यांना काळ्या लोकांसोबत केल्या जाणाऱ्या भेदभावाला सामोरे जावे लागले भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक त्यांनी अनुभवली. पहिल्या वर्गाचे तिकीट असताना सुद्धा त्यांना पिटरमारित्झबर्गमध्ये तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसायला लावले. का तर ते फक्त भारतीय होते म्हणून.
भारतियांबद्दलची वंशभेद आणि असमानतेची वागणूक अनुभवल्यावर त्यांनी त्याविरोधात लढा देण्याचं आणि समाजात वेगळे स्थान निर्माण करण्याच ठरवले. त्यांचा करार एका वर्षाचा असताना सुद्धा ते तब्बल 22 वर्ष दक्षिण आफ्रिकेत देशात राहिले. तिथे त्यांनी वेगवेगळे लढे उभे केले भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता त्याविरुद्ध गांधीजींनी आवाज उठवला. हा लढा जरी अयशस्वी झाला तरी तेथील भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाकडे त्यांनी लक्ष वेधले. 1894 मध्ये त्यांनी नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली याद्वारे त्यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या भारतीयांना एका पक्षाखाली आणले. 1906 साली ट्रान्सवाल सरकारने एका नवीन कायद्याची घोषणा केली या कायद्याने तेथील प्रत्येक भारतीयाला आपली नोंदणी करणे आवश्यक होते या कायद्याला विरोध करण्यासाठी बोलावलेल्या सभेत 11 सप्टेंबर 1906 ला अहिंसात्मक सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला.
Mahatma Gandhi Information Biography History in Marathi language
2 October Mahatma Gandhi Jayanti Speech Nibandh Marathi language
महात्मा गांधी स्वातंत्र्य संग्राम सत्याग्रह इतिहास

दक्षिण आफ्रिकेतले आपले कार्य आटपून महात्मा गांधी 9 जानेवारी 1915 रोजी भारतात आले. भारतात आल्या नंतर 5 वर्ष त्यांनी भारतीय परिस्तिथी अनुभवली प्रत्येक खेड्यात फिरले. त्या दरम्यान त्यांचा संबंध गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी आला गोखले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते होते अत्यंत शांत संयमी स्वभावाच्या गोखल्यांच्या गांधीजींवर प्रभाव पडला. गोखले गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात.
गांधीजींनी आपला पहिला सत्याग्रह आश्रम 1915 साली साबरमती येथे स्थापन केला. पुढे 1920 साली लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि गांधीजी देशातले प्रमुख नेते बनले आणि तेव्हापासून भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातले (1920-1947 स्वातंत्र्य मिळेपर्यंत) गांधीयुग चालू झाले.
गांधीजींनी टिळकांचे जहालवादी धोरण बाजूला सारून आपले सत्याग्रहाचे धोरण स्वीकारले.
गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह केला तो म्हणजे एप्रिल 1917 मध्ये बिहार मध्ये चंपारण्य सत्याग्रह केला. चंपारण्य बिहार मधील जमीनदार जे प्रामुख्याने ब्रिटिश होते ते तेथील गरीब शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने निळ उत्पादन करून घेत होते आणि त्याबदल्यात त्यांना मोबदला पण देत नव्हते. या शेतकऱ्यांची परिस्तिथी अत्यंत दयनीय झाली होती. त्यात दुष्काळ. तिकडे इंग्रज अधिकाऱ्यांच लक्ष नव्हते. एप्रिल 1917 मध्ये राजकुमार शुक्ल नावाच्या स्थानिक नेत्याने गांधीजींना शेतकऱ्यांची परिस्तिथी बघण्यासाठी आमंत्रित केले. तेव्हा गांधीजींनी त्याविरोधात लढा उभा केला. 1918 मध्ये कायदा करून तीन कथीया पद्धत रद्द करण्यात आली आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. या सत्याग्रहादरम्यान गांधीजींना सरकारकडून चंपारण्य सोडून जायची नोटीस आली होती पण अटक झाली नाही.
त्यानंतर 1918 मध्ये गांधीजींनी गुजरात मधील खेडा या दुष्काळग्रस्त खेड्यातील शेतकऱ्यांसाठी दुसरा सत्याग्रह केला. खेडा सत्याग्रह दरम्यान गांधीजींना सरदार वल्लभभाई पटेल, डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या सारख्या कार्यकर्त्यांची साथ मिळाली. ते गांधीजींच्या विचारांचे पाईक झाले. दिवसेंदिवस भारतीय जनतेत गांधीजींची लोकप्रियता वाढत होती गांधीजी देशातील प्रमुख नेते बनले होते.
13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बागेत झालेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ गांधीजींनी त्यांना मिळालेल्या कैसर-ए-हिंद या पदवीचा त्याग केला.
10 मार्च 1920 रोजी गांधीजींनी असहकार चळवळीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. भारतात इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन चालू झाले. या आंदोलनादरम्यान 5 फेब्रुवारी 1922 रोजी उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरिचौरा या गावी जमावाने पोलीस चौकी जाळली आणि 22 पोलिसवाले मरण पावले गांधीजी या घटनेने अस्वस्थ झाले त्यांनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी चळवळ मागे घेतली. पुढे 10 मार्च 1922 ला गांधीजींना अटक होऊन 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली.
गांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमापासून दांडी यात्रेला सुरुवात केली हे आंदोलन म्हणजे इंग्रज सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर लावलेल्या कराच्या विरोधात आंदोलन होते. 390 किलोमीटर प्रवास करून गांधीजी आणि त्यांचे सहकारी दांडीला पोहचले आणि 6 एप्रिल 1930 रोजी संध्याकाळी मीठ उचलून मिठाचा सत्याग्रह केला.
दुसऱ्या महायुद्धा दरम्यान गांधीजींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी “भारत छोडो” आंदोलनाचा नारा दिला आणि 9 ऑगस्ट पासून आंदोलन चालू झाले. भारताला ब्रिटिशांपासून पूर्ण स्वातंत्र्य हेच या आंदोलनाच लक्ष होते. आंदोलन यशवी झाले आणि भारताला स्वतंत्र मिळाले पण ते भारताचे तुकडे होऊनच. पाकिस्तान वेगळा झाला. जिन्ना यांच्या पाकिस्तानच्या मागणीला गांधीजींचा पूर्ण विरोध होता त्यांना एकसंघ भारत स्वतंत्र पाहिजे होता. तुकडे झालेला भारत त्यांना नको होता.
अखेर तो दिवस उजाडला ” 15 ऑगस्ट 1947″ याच दिवशी भारतातल्या प्रत्येक नागरिकाने स्वतंत्र म्हणून श्वास घेतला. सम्पूर्ण देश आनंदात होता त्या दिवशी गांधीजींनी 24 तासांचा उपवास ठेवला होता ज्यांनी ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांच्यासाठी हा उपवास होता.
30 जानेवारी 1948 रोजी बिर्ला हाऊस मध्ये प्रार्थना सभेत असताना गांधीजींवर 3 गोळ्या झाडून गांधीजींची हत्या करण्यात आली. तो दिवस फक्त भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी काळा दिवस होता. संपूर्ण जगात शांततेचा आणि अहिंसेचा प्रसार करणारे असे हे शांतिदुत आपल्याला सगळ्यांना सोडून निघून गेले होते. गांधीजींनी “हे राम” म्हणत प्राण सोडले.
अश्या या शांतिदुताला भारतीय लोक प्रेमाने “बापू” बोलतात. रवींद्रनाथ टोगोरांनी सर्वप्रथम बापूंना “महात्मा” अस समबोधलं होतं. “महात्मा” याचा संस्कृत अर्थ होतो “महान आत्मा” आणि हे विशेषण जर कोणाला योग्य शोभत असेल तर ते फक्त बापूच होते ज्यांनी त्यांचे सम्पूर्ण आयुष्य देशासाठी दिले.
1944 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा बापूजींना “राष्ट्रपिता” या नावाने संबोधले. पोरबंदर या गावचा मोहनदास आज पूर्ण भारताचा पिता झाला होता केवढी मोठी ही उपाधी. 1937-1948 या काळात गांधीजींना नोबेल परितोषिकासाठी 5 वेळा मानांकन मिळाले होते. TIME MAGZENE च्या 20 व्या शतकातील PERSON OF THE YEAR मध्ये गांधीजींना स्थान होते.
गांधीजींनी स्वदेशीचा नारा दिला. त्यांनी चरख्याचा वापर केला. गांधीजींना स्वच्छता खूप प्रिय होती आणि त्यांना वेळेचे खूप महत्व वाटत होते. गांधीजींचा जन्मदिवस जगात “अहिंसा दिन” म्हणून साजरा करतात.
“देदी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल
हें साबरमती के संत तुने कर दिया कमाल”
अक्षय जाधव.
कडूस राजगुरूनगर.
Mahatma Gandhi Information Biography History in Marathi language pdf 2 October Mahatma Gandhi Jayanti Speech Nibandh Marathi language माझा आवडता नेता महात्मा गांधी माहिती निबंध भाषण मराठी महात्मा गांधी यांचे विचार आणि शैक्षणिक कार्य mohandas karamchand gandhi
माहिती कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Mahtma gandhi Autobiography in Marathi
Mast Akshay Jadhav..