
न्या.महादेव गोविंद रानडे
‘मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर’ आणि हिंदी शास्त्राचे पाया रचनाकार या नावाने ओळखले जाणारे न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे उर्फ माधवराव रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ साली नाशिक येथील निफाड येथे झाला. अत्यंत विद्वान आणि थोर पुरुषाच्या चरित्र जीवनशैलीचा आढावा…
महादेव गोविंद रानडे हे ब्रिटिश कालीन भारतातील एक मोठे समाजसेवक होते. न्या.रानडे यांचा पहिला विवाह १८५१ साली वयाच्या १२ व्या वर्षी वाईतील दांडेकरांच्या रमा या कन्येसोबत झाला. पहिली पत्नी रमा आजारपणातच १८७३ साली वारल्या. रानडेंच्या वडीलानी त्याच वर्षी नोव्हेंबरच्या ३० तारखेला अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या ११ वर्षाच्या यमुना चिपळूणकर जी एक बालविधवा होती तिच्या सोबत महादेव उर्फ माधवरावांचा विवाह लावुन दिला. लग्नानंतर माधवरावांनी आपल्या या दुसऱ्या पत्नीचे नाव रमा हेच ठेवले. माधवरावांची त्या काळात बोलके सुधारक म्हणुन सनातन्यांकडुन संभावना झाली. विधवाविवाहाची हाती आलेली संधी आपण दवडली म्हणून ते लोक दुखी झाले. पुढे माधवरावांनी रमाबाई यांना शिकवले.१८८२ साली रानडे यांनी पुण्यात फिमेल स्कुल स्थापन करुन केले जे आज ही “हुजूरपागा” या नावाने प्रचिलित आहे.
म.गो. रानडे यांचे वडील कंपनी सरकारच्या पदरी कारकुन होते.म्हणुन रानडेंचे शिक्षण हे कोल्हापूरला झाले. त्यांच्या शालेय जीवनात विनायक जनार्दन किर्तने यांची मैत्री लाभली आणि ती मैत्री पुढील काळात वाढली. १८५६ नंतर रानडे – किर्तने ही जोडी मुंबईत शिकण्यासाठी आली. १८५८ मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. रानडेंचे ईग्रजी आणि संस्कृत भाषेतील मधील वाचन वाढले.लॅटिनचाही अभ्यास त्यांनी याच दरम्यान केला. मॅट्रिकच्या परिक्षेसाठी त्यांनी’मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष’ या विषयावर निबंध लिहिला. पुढील काळात त्याच विषयावर त्यांनी पुस्तक लिहिले. १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर १८६२ साली जे विद्यापीठाचे चार पदवीधर झाले त्यापैकी एक नाव म्हणजे महादेव गोविंद रानडे. इतिहास व अर्थशास्त्र हे विषय घेउन त्यांनी ऑनर्ससह पदवी प्राप्त केली.
१८७१ मध्ये ते lawyer झाले. १८७१ साली मुंबईत फौजदारी न्यायाधीश पदी काम केल्या नंतर नोव्हेंबर १८७१ मध्येच त्यांची पुणे न्याय पालिकेत सबऑडमिनेट न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. जानेवारी१८७८ साली त्यांची नाशिकला सदर अमीन म्हणुन नेमणुक करण्यात आली.
सामाजिक कार्य-
१८६१ साली स्थापन करण्यात आलेल्या विधवा विवाह मंडळाचे न्या. रानडे हे संस्थापक सदस्य होते. याच काळात बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरु म्हणुन ते सर्वत्र परिचित झाले. म्हणूनच त्यांना ‘ महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक’ असे म्हटले जाते. रानडेनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला. १८६५ साली विष्णुशास्त्री पंडीत आणि ईतर सहकार्याच्या मदतीने “विधवा विवाहोत्तेजक” या मंडळाची स्थापना केली. यामंडळाने पुण्यात १८६९ साली वेणूबाई परांजपे यांचा पांडुरंग करमकर यांच्याशी पहिला विधवा विवाह लावला. परंतु रानडेंना याचीअंमलबजावणी घरातच करता आली नाही. विधवा बहीणीचा विवाह त्यांनी समाज आणि वडीलांच्या भितीने लावला नाही, असे यामागील कारण सांगितले जाते. तेव्हा फुलेनी त्याच्यावर टिका करताना म्हटले,”रावसाहेब, मग सुधारकाचे ढोंग सोडुन द्या.” सामाजिक सुधारणा कि राजकीय सुधारणा या वादातुन पुढे टिळकांनी देखील रानडेंची सभेतुन हकालपट्टी केली. यानंतर रानडेनी डेक्कन सभेची स्थापना केली. रानडेंनी प्रार्थना समाजाच्या कार्याला चालना दिली. प्रार्थना समाजाचा एक आधारस्तंभ ही एक रानडेंची ओळख होय.
१८७७ मध्ये पडलेला दुष्काळ हा नैसर्गिक नसुन लोकांची ग्राहक शक्ती कमतरते मुळे आहे सिद्ध करुन ब्रिटिश सरकारी कृत्रिम धान्य टंचाईकडे त्यांनी लक्ष वेधले. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात लढा देणाऱ्या ‘राष्ट्रीय कॉग्रेस’ या संघटनेच्या स्थापनेत देखील रानडे यांचा मोठा सहभाग होता. राष्ट्रीय कॉग्रेसचे पहिले अधिवेशन आयोजकात ही ते सक्रिय होते. १८९० साली त्यांनी औद्योगिक परिषदेचा उपक्रम सुरु केला. भारताच्या औद्योगिक विकासाला त्या माध्यमातून प्रेरणा मिळाली. त्यांनी हिंदि अर्थशास्त्राचा पाया रचला. देशातील अर्थ विकासासाठी आळस सोडला पाहिजे असे सांगितले. त्यांनी नेहमीच संयुक्त कुटुंब पध्दतीस विरोध केला. धार्मिकता आणि अंधश्रद्धा यावरुन नेहमी कडाडून टिका करणारे रानडे वैयक्तिक पुराणमतवादी होते. “पंच हौद” प्रकरणात आपल्या मनाची मजबुत बाजु घेण्या ऐवजी त्यांनी प्रायश्चित्त घेणे स्विकारले होते.
रानडेंच्या मते काळानुरूप समाज आणि त्याची व्यवस्था बदलत असते, परिवर्तन होत राहणे हे काळाची गरज आहे,परिवर्तनाला विरोध न करता त्याला खुल्या मनाने स्विकारले पाहिजे,
Mahadev Govind Ranade Information in Marathi Language
न्यायमुर्ती रानडे हे स्वत:उत्तम संशोधक- विश्लेषक होते. हे त्यांच्या ‘द राइज ऑफ मराठा पॉवर’ या ग्रंथावरून दिसुन येते. १८९७ साली शासकीय केंद्रीय व प्रांतिक खर्चाचे मोजमाप समितीवर त्यांची नियुक्ती झाली. या समितीवर काम करत असताना त्यांनी ब्रिटिश सरकारला काही सुधारणा सांगितल्या व बहुमोल सल्ले दिले. यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना “कॅम्पोनियन ऑफ द इयर ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर” या पुरस्काराने सन्मानित केले. अशा या उत्क्रांतिवाद, समाज कल्याणकारी, न्यायप्रविष्ठ तत्ववेत्ता असलेला हा महापुरुष १६ जानेवारी १९०१ साली अनंतात विलिन झाला. ते समाजाला, न्यायवर्गाला आणि नवीन विचारांच्या नवपिढीला पोरक करुन कायमचे निघून गेले
Adv.M.D.Bhagwat
BSL. L.L.B. शब्दांकन- रितेश साळुंके
Mahadev Govind Ranade Information in Marathi Language
Leave a Reply