Magel Tyala Shettale Information in Marathi मागेल त्याला शेततळे योजना माहिती मराठी Maharashtra Government Scheme For Farm Pond
Magel Tyala Shettale Information in Marathi मागेल त्याला शेततळे योजना माहिती मराठी shettale scheme
मागेल त्याला शेततळे ही शासकीय योजना आहे, या योजनेचा लाभ खरतर सगळ्याच शेतकऱ्यांनी घ्यायला हवा पण तसं होत नाही. कारणे भरपूर आहेत कधी कधी माहिती गरजू व्यक्तीपर्यंत पोहचत नाही किंवा योजना न समजल्यामुळे खूप अवघड वाटते यामुळे शेतकरी प्रयत्न सोडून देतो.
चला मित्रांनो, आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा college catta वर “मागेल त्याला शेततळे” या शासकीय कृषी योजने बद्दल माहिती समजून घेऊयात.
महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग शासन निर्णय क्र “शेततळे-2016/प्र.क्र.1(74)/रोहयो-5” ही योजना दिनांक 17 फेब्रुवारी 2016 ला सुरु झाली.
मागेल त्याला शेततळे योजना अनुदान या शासकीय योजनेचा हेतू
महाराष्ट्रातील शेतकऱ्याला, अन्नदात्याला पाण्याचा समस्या खूप आहेत त्याला पिक घेण्यासाठी पाणी उपलब्ध नसतेच पुरेसा पाऊस पडला नाही तर त्याला पिण्याला पाणी देखील उपलब्ध नसते. प्रसंगी त्याला 5-10 किलोमीटर लांबून पाणी आणावे लागते.
मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्याचा पाण्याची समस्या सुटावी, त्याला भरगोस उत्पन्न मिळावे. म्हणजे शेतकर्याचे जीवनमान उंचावेल हाच या योजनेचा हेतू.
मागेल त्याला शेततळे योजनेचा पात्रता-अटी
- या योजनेस पात्र होण्यासाठी शेतकऱ्याकडे किमान 0.60 हेक्टर जमीन शेतकऱ्याचा नावावर असावी. जास्तीत जास्त कितीही असली तरी चालेल.
- लाभार्थी शेतकर्याची शेतजमीन तांत्रिकदृष्ट्या शेततळ्या करिता पात्र असणे गरजेचे आहे. जेणेकरून पावसाचे पाणी शेततळ्या मध्ये भरने किंवा पुनर्भरण करणे शक्य होईल.
- अर्जदाराने अगोदर सामुहिक शेततळ्यात किंवा भात खाचरा सोबत तयार होणारी बोड या शासकीय योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
- दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) शेतकरी कुटुंबामध्ये आत्महत्या केलेली आहे अशा शेतकऱ्यांना किंवा त्यांचा वारसांना या योजनेत जेष्ट्ठता यादित सूट देऊन सुट देण्यात येईल व लवकर प्राधान्यक्रम दिला जाईल.
- इतर सर्व प्रकारचा अर्जदारांना प्रथम अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.
महत्वाचा मुद्दा
Magel Tyala Shettale Information in Marathi मागेल त्याला शेततळे योजना माहिती मराठी Maharashtra Government Scheme For Farm Pond magel tyala shettale mahiti in marathi
या योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदाराचे गाव मागील 5 वर्षात एक वर्ष तरी 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी पाउस झालेला असावा अशा गावांची यादी किंवा आपले गाव यात आहे का ही माहिती तुम्ही कृषी विभागातून मिळवू शकता.
शेततळ्यास पात्र होण्यासाठी शासनाने ठरवून दिलेले आकारमान व अनुदान
- किमान मर्यादा 15x15x3 मीटर
- कमाल मर्यादा 30x30x3 मीटर
या मर्यादे मधीलच शेततळे अनुदानासाठी पात्र राहतील.
shettale subsidy
मागेल त्याला शेततळे या योजनेची अनुदानित देय रक्कम कमाल 50000 रूपाये आहे यापेक्षा जास्त खर्च झाल्यास तो शेतकऱ्याला करावा लागेल.
एकत्र गट करून शेततळे बांधण्यासाठी नियम व आटी
- जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांना एकत्र येऊन सामुदायिक रित्या या अनुदानाचा फायदा घेता येईल.
- यासाठी आकारमानाचा अटी वरीलप्रमाणेच राहतील.
- तसेच त्यांना मिळणारे अनुदान आणि पाण्याचा वापर करण्यासाठी 100 रुपयांचा स्टँम्पवर करार करून तो अर्जासोबत सादर करावा.
अर्ज सदर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- जातीचा दाखला
- जमिनीचा ७/१२ चा उतारा
- ८ -अ उतरा.
- आत्महत्याग्रस्त्त कुटुंबाच्या वारस असाल तर दाखला तलाठ्याकडून मिळवावा.
- दारिद्र्य रेषेचा दाखला
- आधार कार्ड
अर्ज करण्याची पद्धत online application for farm pond in Maharashtra मागेल त्याला शेततळे साठी अर्ज कसा भरावा
- अर्ज करण्यासाठी https://egs.mahaonline.gov.in/ जाऊन शेततळ्यासाठी अर्ज करा यावर क्लिक करा.
- पुढे लॉगीन पेज ओपन होईल तेथे लॉगीनचा पर्याय असेल. त्याखाली नवीन युजर नोंदणी करा यावर क्लिक करा.
- पुढे नमूद केलेली माहिती भरावी.
शेतकरी मित्रहो, शेततळ्यामुळे तुमचा पाण्याचा प्रश्न दूर होतो. तसेच शेततळे हे कल्पतरू सारखे आहे. यातील पाण्याचा वापर करून शेतात भरगोस उत्पन्न, फळबागा, बरोबरच तुम्ही शेततळ्यात मच्ची पालन देखील करून उत्पन्न मिळवू शकता.
farm pond scheme Maharashtra farm pond plastic paper
शेततळ्यासाठी कोणता पेपर वापरावा शेततळे कागद अनुदान
सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेततळ्याला वापरला जाणारा कागद, पेपर i s o मानांकित असावा.
शेतकरी मित्रांनो शेततळ्यासाठी पेपर विकत घेताना विशेष काळजी घ्या. कारण पेपर जर हलक्या प्रतीचा कमकुवत असेल, चांगल्या नामांकित कंपनीचा नसेल तर तो लवकर खराब होतो. त्यामुळे पेपरची जाडी किती मायक्रोन, त्याला वाँऱंटी किती वर्षांची आहे हे आवर्जून विचारा.
खड्डा घेताना खड्यात दगड धोंडे नसावेत त्याचप्रमाणे खड्डाचा पृस्टभाग सपाट असावा. जेणेकरून जेणेकरून शेततळ्याचा पेपर फाटणार नाही.
शेततळे कागद किंमत shettale plastic paper price
त्याची जाडी कमीत कमी 500 मायक्रोन असावी. 500 मायक्रोन पेपरचा रेट 85 स्केअर मीटर एवढा आहे.
शेततळ्याला शक्यतो कंमपौंड करा म्हणजे कुत्री मांजरे व इतर श्वापदांपासून शेततळ्याचे संरक्षण होईल.
Magel Tyala Shettale Information in Marathi मागेल त्याला शेततळे योजना माहिती मराठी बद्दल माहिती कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रियेद्वारे आवश्य कळवा तसेच शेततळ्या बद्दल कुठलीही माहिती हवी असेल, अडचण असेल तर संपर्क करा.
कृपया, ISO प्रमाणित कंपनीचे नावे सांगा .
सर शेततळे पेपर अनुदानसाठी अर्ज कसा करावा ?
सर शेत तळे पेपर अनुदानआर्ज कसा करावा माहिती देण्यात यावी हि विनंती
कागद अनुदान अर्ज कसा करायचा ते कळवा