खेड्याच्या अर्थकारणाला समृध्द बनवणारा व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन. खेड्यातील शेतकऱ्याचा घरी पाहिलं तर एक गोष्ट ती म्हणजे जास्तीत जास्त घरासमोर कोंबड्यांची खुराडे. म्हणजेच पूर्वीपासून चालत आलेला हा व्यवसाय आता मोठ रूप घेऊ पाहत आहे आणि त्याचं नाव आहे कुक्कुटपालन. खरतर हा व्यवसाय खुल्या किंवा बंदिस्त पद्धतीनेही केलं जातो. Kukut Palan Kombadi palan Information Mahiti in Marathi Language.
Kukut Palan Kombadi palan Information Mahiti in Marathi Language
कुक्कुट पालन व्यवसाय माहिती मार्गदर्शन मराठी
Poultry Farming Information in Marathi Language
कुक्कुटपालन का करावे?
कुक्कुटपालन हा व्यवसाय जरी शेतीपूरक असला तरी त्यातून तो स्वतःच वेगळ असं अस्तित्व निर्माण करत आहे. सध्याचा विचार केला तर चिकन, अंडी यांना भारतातच नाही तर जगभरातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे या व्यवसायातून मांस, अंडी व शेतीची सुपीकता वाढावी यासाठी वापरले जाणारे कोंबडी खत यातून आपण मोठ्या प्रमाणावर नफा कमवू शकतो. या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवसाय अत्यंत कमी जागेत करता येतो. तसेच कुक्कुटपालन करण्यासाठी आपलं शासनही मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे त्यामुळे आपल्यावरच आर्थिक ताणही कमी होतो.
कुक्कुट पालन व्यवसाय माहिती मार्गदर्शन मराठी
Poultry Farming Information in Marathi Language
कुक्कुटपालन कसं कराव?
कुक्कुटपालन करण्यासाठी शेड व्यवस्थापन, जातींची निवड, पिलांची व वाढीला लागलेल्या कोंबड्यांची काळजी या साऱ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत.
Kukkut palan Shed Information Mahiti In Marathi
शेड व्यवस्थापन-
कुक्कुटपालन करण्यासाठी उभारलेल शेड साधारणतः पूर्व- पश्चिम असाव जेणेकरून सूर्याच्या किरणांमुळे पक्षी दगावणार नाहीत. त्यासोबतच शेड बांधतांना शेडची लांबी ७० फुट व रुंदी ३० फुट असावी. शेडची आतील बाजू १२ फुट उंच तर बाजूची उंची १० फुट असावी. (या शेडमध्ये साधारणतः २००० पक्षी बसू शकतात.) शेडचा पत्रा दोन्ही बाजूने उतरता असावा. बाजूच्या भिंतीवर जाळी लावावी. तसेच ऊन व पाऊस यांपासून पिलाचं संरक्षण व्हाव म्हणून खाद्याच्या पोत्यांचे पडदे तयार करावेत. पक्षांना थंडी पासून संरक्षण मिळावे म्हणून.
कुक्कुट पालन करण्यासाठी कोंबडीचा जातीची निवड-
कडकनाथ–
कडकनाथ कोंबडीला आयुर्वेदिक कोंबडी असही म्हटलं जात. या कोंबडीचे मांस काळ्या रंगाचे असते. त्यामुळे तिला कालामासी असही म्हटलं जात. या जातीच्या एक दिवसाच्या पिलाचा रंग निळसर ते काळा असतो. व पाठीवर गडद अनियमित पत्ते असतात. या जातीचे मांस काळे व पाहायला अयोग्य वाटत असले तरी ते चविष्ट व औषधी असल्याचे मानले जाते. आदिवासी लोक कडकनाथ कोंबडीच रक्त जुनाट आजारांवर औषध म्हणून वापरतात. ही कोंबडी मांस अंडी, प्रथिन आणि लोह यांनी समृद्ध असल्याच मानल जात. कडकनाथ वर्षाला साधारणपणे १०५ अंडी देते. आज बाजारात कडकनाथ कोंबडीला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे कडकनाथ कोंबडीचे पालन हा उत्तम पर्याय आहे. या कोंबडीचा मांसाला अंड्याला चांगला भावही मिळतो.
उपकारी–
या कोंबड्यांना भटक्या कोंबड्या असही म्हटलं जात. यांची रोगप्रतिकार शक्ती चांगकी असते. व त्या कोणत्याही हवामानाशी जुळवून घेतात. या कोंबड्या आपण परसदारीत पाळू शकतो. या वर्षाला १६५ ते १८० अंडी देतात. त्यामुळे या कोंबडीलाही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
गिरीराज, वनराज, कॅरी, निर्भिक, सुवर्णधारा या कोंबड्या अंडी उत्पादनासाठी वापरल्या जातात. यांपासून लाखोंचा नफा कमावता येतो.
याचप्रमाणे रुस्टर, गिरीराज कोंबडीची देखील तुम्ही निवड करू शकता.
व्हाईट लेगहॉर्न किंवा बॉयलर-
बॉयलर या जातीची कोंबडी अंडी व मांस यासाठी पाळली जाते. बॉयलरच्या उत्पादनासाठी अनेक खासगी कंपन्या आता शेतकऱ्यांशी करार करत आहेत कारण बॉयलर हा पक्षी अत्यंत कमी दिवसात म्हणजेच 42 ते ४५ दिवसांत उत्पादन देतो. या पक्षाचे मांस लुसलुशीत व १.५ ते २ किलो वजन देते. त्यामुळे बॉयलर कोंबडी भरपूर नफा मिळवून देण्यास मदत करते.
कुक्कुट पालन आहार व्यवस्थापन-
कुक्कुटपालन व्यवसायातील यशापयश हे खाद्य व्यवस्थापनावर अवलंबून असते. एकंदर एकूण खर्चापैकी ७० टक्के खर्च हा खाद्यावर होत असतो त्यामुळे या व्यवसायात खाद्याच व्यवस्थापन करण अत्यंत गरजेच असत. बाजारात अनेक कंपन्यांची खाद्य उपलब्ध आहेत परंतु त्यातील घटकांचा योग्य अभ्यास करून, जाणकारांच्या सल्ल्याने व आपणास परवडेल अशा प्रकारे खाद्याची खरेदी करावी.
तसेच पहिल्या ० ते ४ आठवड्यापर्यंत २९ ते 22 टक्के प्रथिने असणार खाद्य द्याव तर ४-८ आठवड्यादरम्यान १९-२० टक्के प्रथिने द्यावीत. तर काही वेळेस मकाचा भरडा, गह्वाचा कोंडा आपण कोंबड्यांना खायला घालू शकतो. त्यासोबतच सोयाबीनचे शाकाहारी खाद्य आपण कोंबड्यांना देऊ शकतो. दिवसातून दोन वेळा आपण त्यांना खाद्य द्यायला हवे तरच आपण योग्य वजन मिळवू शकू. खाद्य देतांना ते ओलसर असणारं नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. त्यात फाँस्फारस, कॅल्शियम, मीठ, सूक्ष्म खनिजांचे मिश्रण, जीवनसत्वांचे मिश्रण व औषधांचे मिश्रण असावे. तर विटामिन बी व इतर जीवनसत्वे तज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावेत.
पाणी व्यवस्थापन-
दररोज पाण्याची भांडी स्वच्छ व ताज्या पाण्याने भरवित. पाण्याची भांडी उंच विटांच्या कट्ट्यावर ठेवावीत व विटांस चुना लावावा. पाणी हे आतमध्ये सांडणार नाही याची काळजी घ्यावी.
पक्षांचे आजार
बर्ड फ्लू-
कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आणणारा गंभीर आजार म्हणजे बर्ड फ्लू. या पक्षांनाही माणसांप्रमाणे फ्लू होतो. हा आजार बदक, पोल्ट्री, व जंगली पक्षांनाही होतो. हा आजार जितका पक्षांना घातक आहे तितकाच माणसांनाही घातक आहे. या रोगामुळे २००३ साली कोंबड्या व बदक मोठ्या प्रमाणावर मारले होते. या रोगामुळे मानुसही दगावला जातो. अजूनही बर्ड फ्लू वर लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे हा रोग आल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होते पण २००८ नंतर हा रोग आल्याच ऐकिवात नाही.
- कोन्क्सिदिओन्सिस, जंत, उवा, गोचीड, रक्ती हगवण, पांढरी हगवण इ. रोगांचा प्रादुर्भाव होतो.
कुक्कुटपालन लसीकरण
कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये आपल्या पक्षांची खूप काळजी घ्यावी लागते. तसेच सर्व लसी तज्ज्ञांच्या सहाय्याने घ्यावेत.
- पिल्लू एक दिवसच असतांना मरेन्क्स ही लस पायाच्या स्नायुतून टोचवावी.
- पिल्लू ५-७ दिवसाच असतांना रानीखेत रोगावरच्या लासोटा लस नाकातून एक थेंब द्यावा.
- पक्षांना ४ आठवडे पूर्ण झाल्यानंतर संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नाकातून दोन थेंब द्यावी.
- ५ आठवडे पूर्ण झाल्यानंतर लासोटा लस पिण्याच्या पाण्यातून द्यावी.
- ६ आठवडे पूर्ण झाल्यानंतर देवीची लस पंखाखालून द्यावी.
- तज्ज्ञांच्या सल्ल्याने पक्षांना लसीकरण करावे.
काळजी
- पक्षांना देण्याची रोगप्रतिबंधक लस नेहमी रेफ्रिजरेटर मध्ये ठेवावी.
- एकदा वापरलेली लस पुन्हा वापरू नये कारण तिची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते.
- वापरून झालेल्या लसी, भांडी यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.
- लस टोचण्याअगोदर तीन दिवस पक्षांना Antibiotics द्यावीत.
- उन्हाळ्यात लस टोचणी करतांना शक्यतो रात्री करावी.
- लसीकरण फक्त सशक्त पक्षांनाच करावे.
- पाण्यातून लस देताना ती समप्रमाणात विरघळली असल्याची खात्री करूनच द्यावी.
- रोगाने मेलेले पक्षी जाळून टाकावेत.
कुक्कुटपालनाच अर्थकारण
२००० पक्षांच्या पालनातून सरासरी 60 रुपये प्रती किलो असा दर मिळाला तरी किमान प्रती पक्षाचा सरासरी वजन १००० ग्राम असेल तर १२०००० रुपये उत्पन्न मिळते व खत विकून किमान 3000 रुपये व त्यातून मजूर, खाद्य, औषधे यांचा खर्च ८४००० झाला तरी बॉयलर कोंबडी पासून किमान ४५ दिवसांत ३९००० रुपयांचं विक्रमी उत्पादन मिळते. त्यामुळे कुक्कुटपालन हा व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारा ठरत आहे.
कुक्कुट पालन कर्ज योजना महाराष्ट्र
कुक्कुटपालन प्रकल्पासाठी नाबार्ड अंतर्गत खुल्या प्रवर्गासाठी 25 टक्के तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ३३.३ टक्के प्रोत्साहनपर अनुदान सरकारकडून दिल जातं. तसेच हा व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेकडून कर्जही उपलब्ध करून दिल जातं.
मित्रांनो कुक्कुट पालनाबद्दल Kukut Palan Kombadi palan Information Mahiti in Marathi Language कुक्कुट पालन व्यवसाय माहिती मार्गदर्शन मराठी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा.
रेशीम शेती कशी करावी वाचण्यासाठी क्लिक करा.
Kukkutpalan Shed Information Mahiti In Marathi कुक्कुट पालन कर्ज योजना महाराष्ट्र कुक्कुटपालन लसीकरण
I am interested business