
Kasturba Gandhi information biography in Marathi language
स्वातंत्र्यलढ्यात बऱ्याच स्त्रियांनी पुढाकार घेऊन आपली स्पष्ट भूमिका बजावली त्यातील एक म्हणजे ‘कस्तुरबा गांधी’. थोर पुरुष महात्मा गांधीजी यांची पत्नी कस्तुरबा गांधी निष्ठावान व्यक्तिमत्त्वाच्या एक प्रभावशाली महिला होत्या. अशिक्षित असूनही, चांगले आणि वाईट ओळखण्याची विवेकी कस्तूबा यांच्याकडे होती. त्याकाळी ‘बा’ म्हणून प्रसिद्ध कस्तुरबा गांधींनी आपले संपूर्ण आयुष्य पती आणि देशासाठी व्यतीत केले. देशाच्या स्वातंत्र्य आणि सामाजिक उन्नतीस कस्तुरबा यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
मग चला जाणून घेऊया अश्या प्रख्यात आणि कर्तव्यशील महिलाची जीवन कथा.
Kasturba Gandhi information biography in Marathi language
कस्तुरबा गांधी माहिती निबंध मराठी
प्रारंभिक जीवन:
कस्तुरबा गांधी यांचा जन्म ११ एप्रिल १८६९ रोजी पोरबंदर नगर, काठियावाड येथे झाला. कस्तुरबांचे वडील ‘गोकुळदास मानकजी’ हे एक सामान्य व्यापारी होते. त्याकाळी अशी परंपरा होती की मुलींनी जास्त शिक्षण घेऊ नये तसेच त्यांचे तरुण वयातच लग्न ठरवले जात असे. कस्तुरबा यांचे वडील महात्मा गांधी यांच्या वडिलांचे निकटवर्तीय होते आणि दोघांनी पुढे आपापल्या मैत्रीचे नात्यात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबांनी मोहनदास करमचंद गांधी अर्थातच महात्मा गांधी यांच्याशी लग्न केले.
लग्नानंतर, कस्तुरबांच्या सुरुवातीचे घरगुती जीवन खूप कठीण राहिले. मोहनदास करमचंद गांधी कस्तुरबांच्या निरक्षरतेवर नाराज होते. गांधीजींना कस्तुरबांची संजना, सजावट आणि त्यांचे घराबाहेर पडण्यावर चीड होती. अश्या पद्धतीने सुरुवातीला मात्र कस्तुरबांना त्रास झाला मात्र, नंतर ते सामान्य झाले.
कस्तुरबा गांधी माहिती निबंध मराठी
गांधीजींसोबत जीवनप्रवास-
लग्नानंतर सुमारे १८८८ पर्यंत पती-पत्नी एकत्र राहत होते मात्र, जसे गांधीजी शिक्षणाकरिता इंग्लंडला गेले झाले तेव्हा कस्तुरबा एकट्या पडल्या. गांधीजींच्या अनुपस्थितीत, कस्तुरबांनी आपला मुलगा हिरालाल याला योग्यरीत्या शिक्षण दिले. इंग्लंडहुन आल्यावर गांधीजींना परत दक्षिण आफ्रिकेला जावं लागलं. १८९६ दरम्यान गांधीजी भारतात परतले आणि कस्तुरबांना आपल्यासह दक्षिण आफ्रिकेला घेऊन गेले. दक्षिण आफ्रिकेला जाण्यापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत कस्तुबांनी गांधीजींना अनुसरण केले. त्यांनी गांधींइतकेच आपले जीवन साधे आणि सुलभ केले होते. गांधींच्या सर्व कामात ‘बा’ पुढेच असायच्या. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी गांधीजींनी बरेच उपास ठेवले आणि या उपासाच्या वेळी कस्तुरबा नेहमीच त्यांची काळजी घेत असत.
दक्षिण आफ्रिकेतही कस्तुरबांनी गांधीजींचे चांगले समर्थन केले. तेथील भारतीयांच्या स्थितिविरोधात जेव्हा त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला तेव्हा त्यांना अटक करण्यात आले आणि नंतर त्यांनी तीन महिन्यांची कठोर शिक्षेसह तुरुंगात पाठवणियात आले. जेल मध्ये मिळणारं अन्न अखाद्य होते, म्हणून त्यांनी फक्त फळे खाण्याचे ठरविले, परंतु अधिकाऱ्यांनी कस्तुरबांची मागणी फेटाळली त्यानंतर कस्तुरबांनी उपवास करण्याचा निश्चय केला.
त्यानंतर पुढे १९१५ दरम्यान कस्तुरबा आणि महात्मा गांधी भारतात परतले आणि भारतात देखील कस्तुरबांनी गांधीजींची साथ सोडली नाही. प्रत्येक चरणात कस्तुरबांनी गांधीजींना समर्थन केले. काही आंदोलन दरम्यान गांधीजींना तुरुंगात जावे लागले त्याच क्षणी गांधीजींची जागा कस्तुरबांनी सांभाळली. चंपारण सत्याग्रहात कस्तुरबांनी गांधीजींसोबत तेथे जाऊन स्वच्छता, शिस्त, अभ्यास इत्यादी गोष्टी लोकांना सांगितल्या. त्यावेळी, त्यांनी खेड्यात औषधे वाटपही केले.
१९२२ मध्ये गांधीजींच्या अटकेनंतर त्यांनी धाडस दाखवून अनेक विधान केले सोबतच या अटकेच्या निशेषधार्थ परदेशी कपड्यांवर बंदी घातली. १९३० मध्ये देखील जेव्हा बापू दांडी आणि धरसाणा नंतर तुरुंगात गेले तेव्हा नियमितप्रमाणे कस्तुरबांनी त्यांची जागा सांभाळून लोकांचे मनोबल वाढवले. क्रांतिकारक कार्यांमुळे १९३२ ते १९३३ दरम्यान त्यांना तुरुंगात जावे लागले.
विस्कळीत आरोग्य आणि मृत्यू-
९ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिश सरकारने ‘भारत छोडो’ चळवळीच्या वेळी बापूंसह सर्व काँग्रेस नेत्यांना अटक केली. यानंतर, कस्तुरबांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे भाषण देण्याचे ठरविले, परंतु तेथे पोहोचल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना पुणे येथील आगा खान महालात पाठविण्यात आले. सरकारने महात्मा गांधींना देखील याच ठिकाणी ठेवले होते. अटकेनंतर कस्तुरबांची तब्येत ढासळली आणि त्यानंतर त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला.
जानेवारी १९४४ मध्ये कस्तुरबांना दोनदा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर पुढे त्यांच्या विनंतीनुसार सरकारने आयुर्वेदाच्या डॉक्टरांनीही व्यवस्था केली आणि काही काळ त्यांना आराम मिळाला परंतु, २२ फेब्रुवारी १९९४ रोजी पुन्हा हृदयविकाराच्या झटकेने बा यांचा मृत्यू झाला.
-नीरज भावसर.
मित्रांनो, Kasturba Gandhi information in Marathi language Kasturba Gandhi Essay in Marathi कस्तुरबा गांधी माहिती निबंध मराठी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Leave a Reply