
आज क्रिकेट जरी भारतीयांच्या गल्ली-गल्ली पोहोचलेलं असलं तरी तो काळ वेगळा होता कपिल देव यांच्या काळात भारतीय क्रिकेट संघ क्रिकेट जगतात बच्चा होता. पण या नवख्या क्रिकेट टीमनेच भारताच्या पहिल्या विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण केलं. त्या नवख्या टीमचे कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल जाणून घेऊयात.
परिचय
क्रिकेट विश्वात असे एक नाव आहे कपिल देव ज्यांना क्रिकेटमध्ये उच्च स्थान आणि सन्मान आहे. या महान खेळाडूचा जन्म ६ जानेवारी १९५९ चंदीगड येथे झाला. वडिलांचे नाव रामलाला निखंज तर आईचे नाव राजकन्या होते. कपिल देव यांचे प्राथमिक शिक्षण डी. ए. व्ही. शाळेतुन सुरु झाले आणि पदवीसाठी सेंट एडवर्ड महाविद्यालयला ते गेले. खेळातील त्यांची आवड आणि कौशल्य पाहुन त्यांना देशप्रेमी आझाद क्रिकेट प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले.
कौटुंबिक माहिती
जेव्हा भारत आणि पाक विभक्त होत होते, त्यावेळी त्यांचे कुटुंब रावळपिंडी ( पाकिस्तान ) येथुन फाजिल्का ( भारत ) येथे स्थलांतरित झाले. येथीच कपिल यांचे वडील रामलाल निखंज यांनी लाकडाचा व्यवसाय सुरु केला. व्यवसाय करत असताना कौटुंबिक भार उचल्यासोबतच त्यांनी संस्काराचे धडे ही दिले. १९८० मध्ये कपिल देव यांनी रोमी भाटिया नावाच्या युवतीशी लग्न केले. १७ वर्षानंतर त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव अमिया देव.
कपिल देव- क्रिकेट कारकिर्द
कपिल देव यांच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात १९७५ पासून झाली. जेव्हा ते हरियाणाकडुन पंजाब विरूध्द खेळले. या सामन्यात त्यांनी हरियाणा संघास घवघवीत यश प्राप्त करुन दिले. तेव्हा पंजाब हा संघ ६३ धावांवरच ढेपाळला होता. १९७६- ७७ मध्ये जम्मू-काश्मीर विरूध्द खेळलेल्या सामन्यात ८ विकेटस घेत त्यांनी ३६ धावा केल्या. त्याच वर्षी बंगाल विरूध्द त्यांनी ७ विकेटस घेत २० धावा केल्या. या दोन्ही सामान्यात त्यांच्या कौशल्याची प्रतिभा दिसु लागली.
यानंतर त्यांनी १९७८ मध्ये त्यांनी कसोटी सामने खेळण्यास सुरुवात केली. पाकिस्तान विरूध्द त्यांनी पहिला कसोटी सामना खेळला. या सामन्यात त्यांनी १३ धावा करत एक विकेट घेतली होती.
देव यांनी १९७९-८० मध्ये दिल्ली विरूध्द शानदार फलंदाजी करुन १३० धावांची खेळी केली. हे त्यांच्या कारकिर्दीतील पहिले शतक होते. यानंतर हे सिध्द झाले की, कपिल देव केवळ गोलंदाजीद्वारेच नव्हे तर फलंदाजीद्वारे ही भारताला जिंकु शकतात. त्यांच्या दोन्ही कौशल्यामुळे ते आता पर्यत सर्वोत्तम ” अष्टपैलू ” मानले जातात.
१९८३ क्रिकेट विश्वचषक
मागील विश्वचषकात भारताची कामगिरी पाहिल्यानंतर, भारत विश्वकप जिंकु शकेल, अशी कोणालाही आशा नव्हती. कपिल देव जेव्हा विश्वचषकात खेळु लागले तेव्हा त्यांची सरासरी २५.९४ सामान्य गोलंदाजाप्रमाणेच खेळीची रेटिंग होती. उपांत्य फेरीपर्यंत पोहचविण्यासाठी झिम्बाब्वे विरूध्दचा सामना जिंकणे भारताला आवश्यक होते. त्या सामन्या दरम्यान भारत पराभवाच्याच दिशेने वाटचाल करीत होता परंतु कपिल देव यांनी त्यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकला. या सामन्या दरम्यान त्यांनी झिम्बाब्वेच्या खेळाडुंची धुलाई करत १७५ धावा केल्या. १३८ चेंडुत ह्या धावा देवानी केल्या. २२ चौकार आणि ६ षटकारांची अतिषबाजी त्यांनी केली. एवढेच नव्हे तर याच सामन्यात त्यांनी झिम्बाब्वेचे शानदार गोलंदाजीने ५ बळी घेतले.
त्यानंतर कपिल यांना ‘मर्सिडीज कार’ पुरस्कार स्वरुपात मिळाली. हा डाव त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि महत्त्वाचा होता. ज्याने त्यांनी सर्वांच्या नजरेत उत्कृष्ट केले. १९८३ च्या विश्वचषक स्पर्धे दरम्यान बीबीसीच्या संपामुळे हा सामना प्रसारित होऊ शकला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता आला नाही.
१९८३ विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला अंतिम सामन्यात वेस्ट ईंडिजला पराभुत करावे लागले. कपिक देव यांच्या नेतृत्वात १९८३ मध्ये इंग्लंडमध्ये हा विश्वचषक जिंकुन भारताने ईतिहास घडविला पण हा इतिहास इतक्या सहजा सहजी घडला नाही त्यासाठी कपिल देव यांच्या टीमने प्रचंड मेहनत त्याचबरोबर जी जिद्द दाखवली ती खरच प्रेरानादाई आहे. कारण वेस्ट इंडीसची क्रिकेट टीम ही खऱ्या अर्थाने तगडी टीम होती. १९८३ च्या पूर्वीचे दोन विश्वचषक वेस्ट इंडीस ने जिंकले होते. हा त्यांचा हॅट्रिकचा चान्स होता. क्रिकेट जगतातील जाणकार प्रेमी वेस्ट इंडीस सहजासहजी हा सामना जिंकणार असं भाकीत करत होते. भारतीय संघाच्या नेत्रदीपक कामगिरीमुळेच भारतही क्रिकेट विश्वाचा स्टार म्हणून उदय झाला.
कपिल देव यांच्या जीवनातील रोमांचक तथ्य
कपिल देव यांनी २००६ मध्ये कॅप्टन इलेव्हन या नावाने व्यवसाय करण्यासाठी दोन रेस्टॉरंट उघडले. एक चंदीगड आणि दुसरे पटना येथे असुन त्याचा कारभार ते स्वता: पहातात. कपिल यांना पुस्तक लिहिण्यात फार रस आहे म्हणुन त्यांनी आतापर्यंत तीन आत्मचरित्रे लिहिले आहेत. त्यात गॉडस डिक्री, क्रिकेट माय स्टाईल आणि स्ट्रेट फ्रॉम माय हार्ट या तीनचा समावेश आहे.
कपिल देव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
भारतीय सिनेसृष्टीचे प्रसिध्द दिग्दर्शक कबीर खान यांनी कपिल देव यांचे बायोपिक तयार करण्याचे काम सुरु केले आहे. देव यांना जेव्हा विचारणा झाली की तुमच्या भुमिकेसाठी कोण असावे असे तुम्हाला वाटते ? तेव्हा त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता रनवीर सिंग या अभिनेत्याचे नाव घेतले.
फँटम प्रॉडक्शन आणि अनुराग बासु यांच्याबरोबरच इतर लोकांनीही या चित्रपटासाठी आपले पैसे निर्मितीसाठी लावले आहेत. ज्यामध्ये कपिल देव यांच्या भुमिकेत रणवीर सिंग दिसणार आहेत.
पुरस्काराने सन्मानित
१९८३ विश्वकप विजेते, भारतीय अष्टपैलू कपिल देव यांना १९७९-८० मध्ये अर्जुन पुरस्काराने, १९८२ साली पद्मश्री तर १९८३ साली ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ या पुरस्कारानी गौरवण्यात आले. तसेच १९९१ मध्ये पद्मभूषण तर २००२ मध्ये विस्डेन शतकातील खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
अशा या महान खेळाडुची कमी भारतीय संघास नेहमीच जाणवत राहिल तसेच पहिल्या विश्व चषकाचे मानकरी म्हणून त्यांनी जो मान भारताला मिळुन दिला त्याबद्दल कपिल देव यांचे नाव सोनेरी अक्षरात भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात कोरलेले राहिल.
ॲड.एम.डी.भागवत
–कॉलेज कट्टा.
Nice Information