निरोगी रहायचं आहे तर मग कडूनिंबाची एक काडी दररोज चघळा!!! तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल आणि तुम्हाला महागड्या औषध गोळ्या खाण्याची वेळ येणार नाही. हे कडूनिंबाचे औषधी गुणधर्म जाणून घ्या आणि अमलात आणा नक्की फायदा होईल. Kadunimb Tree Information Neem Tree Uses in Marathi Language
Kadunimb Tree Information Neem Tree Uses in Marathi Language
कडूनिंब औषधी उपयोग मराठी माहिती
कडूनिंब, नीम, लिंब,
शास्त्रीय नाव- Azadirachta Indica
कडूनिंबाचं नाव ऐकताचं आपल्याला ते नकोसं वाटतं; पण त्याचं आपण संपूर्ण महत्त्व जाणून घेतलं तर ते खूप गुणकारी ठरतं.
कडूनिंब हे नैसर्गिकरीत्या उगवणारे झाड आहे. त्याचप्रमाणे या झाडाची पाने, फुले, फळे, बिया, साल, मुळे सर्वच कडू असतात; म्हणून त्याला आपण कडूनिंब म्हणतो. त्याचबरोबर आपल्या अंगणात जर तुळशीबरोबर कडूनिंबाचे झाड असेल तर हवा प्रसन्न, थंड राहते आणि वातावरण शांत राहते. हा वृक्ष मोठा वाढतो आणि मोठ्या आकारामुळे घनदाट सावली देतो.
Neem Tree Information in Marathi language Neem Plant Information Uses in Marathi language
Kadunimb Tree Information Neem Tree Uses in Marathi Language
कडूनिंबाचे धार्मिक सांस्कृतिक महत्व
नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही आपल्याला कडूनिंबाचे धार्मिक महत्त्व समजतं. ते म्हणजे की, गुढीपाडवा या सणाच्या दिवशी. ह्या दिवशी गुढी उभारली जाते आणि त्या गुढीवर कडूनिंबाच्या झाडाची डहाळी वापरली जाते. तसेच ती पाने शुभ मानली जातात. त्याचबरोबर देवाला नैवेद्य वाढून त्याचा आस्वाद घेण्यापूर्वी कडूनिंबाच्या फुलांची मिरपूड, मीठ, गूळ, चिंच यांच पाणी करून ते पाणी प्यावे अशी प्रथा मानली जाते.
कडूनिंब औषधी उपयोग मराठी माहिती
कडूलिंबा मुळे आजार बरे होऊ शकतात का?
झाडपाल्याचे औषध हेच आधीच्या काळात रामबाण समजले जायचे. त्यासाठी गावात एखादा प्रसिद्ध वैद्य असायचा आणि मग त्या औषधांच्या मात्रा ठरवल्या जायच्या. कडुलिंबा पासून आयुर्वेदाला अनेक औषधी सापडली. या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा वापर औषध म्हणून होऊ शकतो.
कडुलिंब औषधी वनस्पती माहिती
Kadunimb Juice Benefits in Marathi
- कडूलिंबाचा काडीने दात घासल्यास दात जंतुविरहित होतात आणि किडत नाहीत. दातांना बळकटी येते.
- कडूनिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही.
- कडुलिंब तेल उपयोग मराठी- कडूनिंबाच्या फळांचा रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात; त्याचबरोबर केसांची वाढ उत्तम होते.
- कडूनिंबाच्या रसामुळे मधुमेह रोग नियंत्रित करता येतो. कडूनिंबाची पान जखमेवर कुटून लावल्याने जखम लवकर बरी होते.
- कडूनिंबाची पाने, खोड हे पित्तनाशक आहे. रोज सकाळी कडूनिंबाचा कड्या चघळल्यास पित्त कमी होते.
- कडूनिंब इतरही बऱ्याच आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते.
- कडूनिंब हे जंतुनाशक तसेच रक्त शुद्ध करते, थकवा दूर करण्यासाठी, मुत्र विकारावर, ताप कमी करण्यासाठी कडूनिंबाचा रसाचा उपयोग केला जातो.
- कडूनिंब हे खोकला, कफ या आजारांवर गुणकारी आहे.
- कडूनिंबाची एक काडी रोज खाल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- कडुलिंबाचा पाला उपयोग- पोटात जंत झाल्यास कडूनिंबाचा पानाचा रस आणि थोडासा गुळ एकत्र मिश्रण करून खाल्याने पोटातील जंत नाहीसे होतात.
- कडूनिंबाचा झाडावर बसलेल्या मधामाशाचा पोळ्याचा मध हा आयुर्वेदिक असतो.
मित्रांनो आपल्या घरा शेजारी असलेल्या कडूनिंबावर परदेशात, जिथे कडूनिंब उगवत देखील नाही अशा ठिकाणी संशोधन झाले आणि त्यांनी कडूनिंबापासून किटकनाशके बनवली आणि आज ते आपण वापरत आहोत. कडूनिंबाचे हे औषधी गुणधर्म माहित झाल्यानंतर तुम्ही रोज कडूनिंबाची एक काडी चघळून निरोगी राह्ताल म्हणजे तुम्हाला महागड्या औषध गोळ्या खाण्याची वेळ येणार नाही.
Kadunimb Tree Information Neem Tree Uses in Marathi Language “कडूनिंब औषधी उपयोग मराठी माहिती” तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा.
-तेजल महाजन.
कडूनिंब औषधी उपयोग मराठी माहिती कडुलिंब औषधी वनस्पती माहिती कडुलिंबाचा पाला उपयोग कडुलिंब तेल उपयोग मराठी
Leave a Reply