
देशातल्या अग्रगण्य विद्यापीठातील एक विद्यापीठ जिथं अँडमिशन घेण्यासाठी एन्ट्रांस परीक्षा पास व्हावी लागते… तेथे शिक्षण घेतलेले व्यक्ती पुढे जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रात महत्वाचे योगदान देतात. अश्या विद्यापीठामध्ये सतत विद्यार्थी आंदोलन होतात याची कारणे तपासली पाहिजेत.
अनेकदा ह्या आंदोलनाची नारेबाजी निदर्शने ऊग्र देशविरोधी वाटतात. याचा प्रत्यय भारतभरातील नागरिकांनी कमी अधिक प्रमाणात समाज माध्यमांवर घेतला असेलच. पण या विद्यार्थ्यांना त्यांचा मुद्दा विचारल्यास आणि उग्र, देशविरोधी नारेबाजी बद्दल विचारल्यास ते विद्यार्थी म्हणतात की, जेएनयु विद्यार्थी आंदोलनाबद्दल असं मत तयार व्हायला माध्यमं मेडिया जबाबदार आहे. आम्ही देशातील प्रत्येकासाठी, त्यांच्या अधिकारासाठी, विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणासाठी (कारण शिक्षण हा मुलभूत अधिकार आहे.) लढा देत आहोत. आमची आंदोलन ही सरकार विरोधी नाहीतच. सरकारच्या शिक्षणविषयक धोरणांविषयी आहेत. वेगवेगळ्या मुद्यांवरून जेएनयु सतत धगधगत रहातं
या सगळ्या गोष्टींची चीकीस्ता करणारा लेख…
जे एन यु म्हणजे काय ?
जे एन यु अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ. स्थापना २२ एप्रिल १९६९, नवी दिल्ली येथे असणाऱ्या या विद्यापीठाचा समावेश देशभरातील प्रतिष्ठीत विद्यापीठात होतो. जगभरातील ७१ विद्यापीठांसोबत या विद्यापीठाचा सामंजस्य करार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे अनेकदा जेएनयु चर्चेत राहिले आहे.
जे एन यु मधील विद्यार्थी संघटना
जेएनयु मध्ये प्रत्येक राजकीय विचारधारेच्या विद्यार्थी संघटना आहेत.
जे एन यु विद्यार्थ्यांचा हेतु
या विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा हेतु अगदी साधा आणि स्पष्ट आहे. भेदभाव न करता समानता असावी. दुर्बल व गरीब व्यक्तिंवर अत्याचार न होवोत, सर्वांसाठी समान हक्क आणि प्रतिनिधित्व. या विद्यार्थ्याना अशी एक न्याय प्रणाली हवी आहे, जेथे प्रत्येक व्यक्तिच्या मताला, विचारांना स्थान असावे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी, भाषणातुन विचार मांडण्यासाठी, खुल्या चर्चेतुन मतांची देवाण घेवाण होण्यासाठी येथील विद्यार्थी लढत आहेत. नागरीकांच्या वाढी सोबतच राष्ट्राची वाढ झाली पाहिजे, गरीब श्रीमंत यातील दरी नाहीशी झाली पाहिजे. लोकांच्या जीवनमानात वाढ झाली पाहिजे. फक्त जी.डी.पी. वैयक्तिक राहणीमानाचे प्रतिबिंब असु शकत नाही, असे यांचे ठाम मत आहे.
मुक्त विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था जिथे विद्यार्थी विवादास्पद चर्चा करु शकतात, वादविवाद करु शकतात आणि वाद घालुन झालेल्या वादावर तोडगा काढु शकतात. असे मुक्त व्यासपीठाचा या विद्यार्थ्यांचा मुळ हेतू आहे.
कन्हैया कुमार (परिचय)
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष आहे. तो “भारतीय कम्युनिस्ट पक्ष” ह्यांच्या अ.भा.विद्यार्थी फेडरेशनचा एक नेता आहे. फेब्रुवारी २०१६, भारताच्या विरूध्द नारेबाजी केल्याच्या आरोपात त्यांच्यावर ‘राजद्रोहाचा’ गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटक ही करण्यात आली. जी अफजल गुरुच्या फाशी विरोधात होती. २ मार्च २०१६ रोजी पुराव्या अभावी त्याचा जामीन करुन मुक्ता करण्यात आली होती. याच संतापापोटी कन्हैया कुमार यांनी हे प्रक्षोभक पाउल उचले होते. यांच्या या पाउलामुळे अगोदर कन्हैया कुमार यांच्या विरोधात देशभरात संतापाची लाट पसरली होती परंतु यामागील कारणे जेव्हा स्पष्ट झाली तेव्हा हीच संतापाची लाट कन्हैया कुमार यांच्या सोबत कमी जास्त फरकाने उभी राहिली. आपल्या प्रक्षोभक विधानामुळे नेहमीच चर्चेत असणार कन्हैया कुमार एका वेगळ्या विचारधारेतून विद्यार्थ्याच्या काही संघटनेचे ही प्रतिनिधीत्व करतात आणि सरकारच्या विरोधात आपली ठाम मते मांडतात. जे एन यु हे कन्हैया कुमार यांच्या राजकीय आखाड्याचे कर्मस्थान आहे.
जे एन यु वादामागील खरे सत्य
९ फेब्रुवारी २०१६ रोजी सकाळी ८ वाजता अफजल गुरुला फाशीची शिक्षा देण्यात आली. अफजल गुरु आणि मकबुल भट्ट या दहशतवाद्यांच्या स्मरणार्थ शहीद दिन म्हणून “पाकिस्तान दिर्घायुष्य व भारत परत जा” ‘आम्हाला काश्मिरचे स्वातंत्र्य हवे आहे’. आम्ही भारताचा विनाश होइ पर्यत भारताच्या विरोधात उभे राहु अशा प्रक्षोभक घोषणा दिल्या. हे घोषणा देणार विद्यार्थी विद्यापीठ कॅम्पस मधील डाव्या पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे होते. कॅम्पस मधे असणारी एबीव्हीपी ही उजवी विंग या संपूर्ण कार्यक्रमाच्या विरोधात होती. याचाच विपर्यास या दोन गटातील भांडणात होउन याचे व्हिडीओ फुटेज प्रसारमाध्यमांपर्यत पोहचले. देशभरात ही बातमी स्वरुपातील फुटेज पोहचले आणि सरकारवरील दबाव वाढला. अफजल गुरु स्मरणार्थ कार्यक्रमात सर्व सहभागी असलेल्या लोकांवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी पोलीसाना आदेश देण्यात आले. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांची यादी तयार करुन त्यांना पोलीसांनी अटक केली, त्यातील एक नाव होते कन्हैया कुमार…
त्यावेळी जेएनयुचे शिक्षक आणि विद्यार्थीचा एक गट कन्हैया कुमार यांची बाजु घेत होता आणि ते या घटनांना काश्मिरी विद्यार्थीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणुन औचित्य देत होते. हा गट कॅम्पस मधील वसतीगृहावर पोलीसांनी टाकलेल्या छाप्याचा निषेध करत होते आणि मागणी करत होते आपला नेता कन्हैया कुमार यांच्या सुटकेची….
जे एन यु हल्ला : ५ जानेवारी
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ५ जानेवारी २०२० ला रात्री हल्ला करण्यात आला. हा हिसांचार कोणत्याही लोकशाही समाजावर डाग असल्याचे वर्णन तज्ञाकडुन करण्यात आले. विद्यापीठाच्या बाहेरुन आलेल्या गुंडानी विद्यार्थी-शिक्षक, पत्रकार, काही कार्यकर्ते आणि इतर नागरीक यांना जबरदस्त मारहाण केली. गुंडानी विद्यापीठातील तरुण मुलींना टार्गेट केले आणि त्यांना अमानुष मारहाण केली. जेएनयुएसच्या अध्यक्षा आयशा घोष यांना लाथाबुक्याने तुडवुन त्यांचे डोके फुटे पर्यत मारले गेले. घडलेला सर्व प्रकार मात्र राजकीय पक्षांना एकमेकांवर चिखलफेक करण्यास एक मुद्दा देउन गेला. परंतु असे भ्याड हल्ले हे समाजात अराजकता पसरविण्यास पुरेसे खतपाणी घालण्याचे काम करत आहेत. अशा घटनानी देशाचे तुकडे पडतील, समाजाला तडे जातील, विद्यापीठे आणि महाविद्यालय रक्ताने माखतील, विद्यार्थ्यांना मारहाण करुन त्यातुन पेटलेल्या होळीत आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम काही राजकीय पक्ष करत असल्याचे तज्ञाचे म्हणने आहे. संपुर्ण पणे दहशतीच्या वातावरणात विद्यापीठात वातावरण पसरले असुन याची सुरुवात काही वर्षापूर्वी कन्हैया कुमार व त्यांच्या दोन साथीदारांना देशद्रोहाच्या आरोपा खाली अटक झाली तेव्हा पासुन सुरु झाली परंतु या बाबत अजुन ही आरोपपत्र दाखल झाले नाही. तेव्हा पासून जे एन यु नेहमीच भयपुर्ण वातावरणात दहशतीत आहे. ५ जानेवारीचा हल्ला हा विद्यापीठातील सर्वात मोठा हल्ला मानला जातो आहे, परंतु हा हल्ला हा पहिलाच हल्ला आहे असे नाही, यापूर्वी ही छोट्या मोठ्या हल्ल्याना विद्यापीठ हे सामोरे गेले आहे. भितीच्या सावटाखाली असणारे विद्यापीठाचे अस्तित्व तथाकथित राष्ट्रवादीनी ‘देशद्रोही’ चे केंद्र म्हणुन दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या लोकशाही मंचाला कमी लेखत असुन त्यांच्यावर दबावतंत्राचा वेळप्रसंगी वापर करत असल्याचे बोलले जाते आहे.
सरकार काय विचार करीत आहे :
केंद्रीय गृहराज्य मंत्री राजनाथ सिंह यांनी विद्यापीठाच्या आवारात कोणत्याही देशविरोधी घटनेला प्रशासन खपवुन घेणार नाही, असे स्पष्ट केले. अशा घटनावर कठोर कारवाई करण्यात येइल, लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा या हल्ल्या मागे खुप मोठा हात असुन, अशा परिस्थितीत देशाला समजुन घेण्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. भारत देश स्वता: विरूध्द कोणतेही अपमानजनक कृत्य खपवुन घेणार नसुन घडलेल्या घटनेचा तिव्र शब्दात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी निषेध केला. दरम्यान हाफिज सय्यद यांनी भारत सरकार ज्या पध्दतीने या सर्व गोंधळासाठी त्यांना दोषी धरत आहे त्याची प्रणिती सध्य असणारे सरकार आपल्या अकार्यक्षम वृत्तीचे प्रदर्शनच घडवत असल्याचे मत मांडले.खासदार महेश गिरी यांनी केल्या निषेधा विरोधात केलेल्या तक्रारी नंतर कन्हैया कुमार आणि ईतर अज्ञात विद्यार्थ्याना अटकेची भुमिका ही मोठी असल्याचे बोलले जाते.
दरम्यान वसंत कुंज उत्तर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हेगारी कट रचल्या प्रकरणी आयपीसीच्या कलम १२० बी आणि देशद्रोहाचा कलम १२४ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक मात्र नक्की शैक्षणिक क्षेत्र आणि त्याचे केंद्रस्थान असणाऱ्या संस्था आता राजकीय आखाड्यांचे रंगरुप घेउ लागले आहेत. देशाचे उज्ज्वल भविष्य उद्याच्या नवभारतात काय भुमिका बजावेल हे निश्चित मात्र येणारा काळच ठरणार आहे.
जेएनयु मधील विद्यार्थी संघटनेंचे आंदोलनांचे नेमके मुद्दे काय आहेत हे खरतर समजायला तयार नाही कारण एका बाजूला साम्यावादी विचारांशी निगडीत या संघटनेतील विद्यर्थ्यांची विचारधारा वाटते पण दुसऱ्या बाजूला या आंदोलनांमध्ये होणाऱ्या निदर्शनांमध्ये घोशनांमध्ये प्रचंड तफावत जाणवते. याचे उदाहरण स्वरूप भारत तेरे टूकडे होंगे, फ्री काश्मीर, पाकिस्तान बद्दल वाटणारी आत्मीयता, अफजल गुरूच्या फाशीला विरोध अश्या देशविरोधी वक्तव्यांमुळे या जेएनयु मधील विद्यार्थी संघटना मुद्या पासून भरकटलेल्या किंवा राष्ट्रविरोधी वाटतात.
पण याच बरोबर कन्हैया कुमार यांच्या मतानुसारजेएनयु विद्यार्थी आंदोलना बद्दल अशी मतं तयार व्हायला माध्यमं मेडिया जबाबदार आहेत. आणि खरच जर आम्ही देशविरोधी कृत्य केले असते मी आज जेल मध्ये असतो. असं कन्हैया कुमार स्पष्टीकरण देतात.
–ॲड.एम.डी.भागवत BSL.L.L.B
कॉलेज कट्टा. शब्दांकन–रितेश साळुंके
Leave a Reply