
Jayalalitha Information in Marathi language
जयललिता जयराम ह्या तामिळनाडू राज्याच्या माजी मुख्यमंत्री व अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कझागम पक्षाच्या सरचिटणीस होत्या. राजनीतिक जीवनात प्रवेश करण्याआधी जयललिता यांनी बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये देखील आपली चांगलीच छाप सोडली आहे. दिग्गज कलाकारांसोबत हीट फिल्म्स करून त्यांनी लाखों-करोडों प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निष्ठापूर्वक कायम केली. बॉलीवूड व्यतिरिक्त जयललितांनी तामिळ, तेलगू, कन्नड या भाषेत सुद्धा फिल्म्स केल्या होत्या.
सण १९८९ मध्ये तामिळनाडू विधानसभेत विपक्ष नेता म्हणून नियुक्त झालेल्या जयललिता ह्या प्रथम महिला होत्या. १९९१ मध्ये त्या पहिल्या वेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. अतूट कामगिरी आणि जनतेच्या विश्वासामुळे २०११ मध्ये त्या तिसऱ्या वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाल्या. त्यांनी राज्यात अनेक कल्याणकारी प्रकल्प सुरु केले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी जल साठवण प्रकल्प आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकास योजनांसारखी विकासकामे केली.
फिल्मी करियर बद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी १९६५ ते १९७२ दरम्यान फिल्म्स एम.जी.रामचंद्रन सोबत केल्या तसेच १९८२ पुढे त्यांनी राजनीतिक जीवनात प्रवेश साधला. राजनीतिक करियर मध्ये देखील त्या एम.जी.रामचंद्रन सोबतच होत्या. १९८४ मध्ये त्यांना तामिळनाडू राज्यसभाचे सदस्य म्हणून नियुक्त केले गेले. १९८७ मध्ये रामचंद्रन यांच्या निधनानंतर जयललिता यांनी स्वतःला रामचंद्रन यांच्या उत्तराधिकारी घोषित केला. इतकंच काय तर जयललिता ह्या आपल्या राजकीय जीवनात अनेक वेळा भ्रष्टाचाराच्या प्रकरणातही वादात राहिल्या.
प्रारंभिक जीवन-
कोमलवल्ली, ज्यांना जयललिता म्हणून देखील ओळखले जाते, त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ रोजी म्हैसूर येथे वेदवल्ली आणि जयराम यांच्या घरात झाला. त्यांचे कुटुंब म्हैसूर च्या राजघराण्याशी संबंधित आहे. त्यांचे आजोबा म्हैसूर दरबारात एक रॉयल डॉक्टर होते आणि त्यांनी आपल्या कुटुंबाच्या नावाच्या सुरुवातीस ‘जय’ हा शब्द म्हैसूरच्या राजा जयचमारराजेंद्र वडेयराशी सामाजिक संबंध असल्याचे लोकांना कळविण्यासाठी दिले. दोन वर्षांच्या असतांना जयललिता यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनतर त्या आपली आई आणि आजीसह बंगलोर राहण्यास चालल्या गेल्या. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या चेन्नई येथे गेल्या. जयललिता यांनी वकिली करण्याचा निर्णय घेतला होता परंतु पारिवारिक समस्येमुळे त्या ते करू नाही शकल्या. त्यांनतर त्यांच्या आईने त्यांना फिल्म मध्ये काम करण्याचे सुचवले आणि वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी जयललिता एक दिग्गज अभिनेत्री म्हणून समोर आल्या.
फिल्मी करियर-
जयललिता यांनी आपल्या फिल्मी करियर मध्ये प्रवेश शंकर वी गिरी यांच्या इंग्रजी फिल्म ‘ एपिसल ’ सोबत केली. ह्या फिल्म मध्ये जयललितांचे अभिनय लोकांना भावले नाही. त्यांनतर त्यांनी कन्नड फिल्म ‘चिन्नाडा गोम्बे’ मध्ये काम केले आणि ती फिल्म लोकांना खूप आवडली. त्यांनतर जयललितांनी तामिळ फिल्म केली. काही वर्षातच जयललितांना दक्षिण फिल्म्स मध्ये प्रसिद्धी प्राप्त झाली आणि त्यांच्या अभिनयमुळे त्या एक प्रतिष्ठित कलाकार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. सिनेमाच्या पडद्यावर जयललिता आणि एम.जी. रामचंद्रन यांची जोडी खूप प्रसिद्ध झाली आणि प्रेक्षकांनाही ही जोडी खूपच आवडली. फिल्मी करियरच्या शेवटच्या वर्षात त्यांनी जयशंकर, रविचंद्रन आणि शिवाजी गणेशन या नामवंत कलाकारांसोबत काम केले. १९६८ मध्ये त्यांनी धर्मेंद्र सोबत ‘इज्जत’ या फिल्म मध्ये काम केले होते. १९८२ मध्ये जयललितांनी राजकारणात प्रवेश करून आपले नवे जीवन सुरु केले.
राजनीतिक जीवन-
अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कझागम चे संस्थापक एम.जी.रामचंद्रन यांनी जयललितांना प्रचार सचिव म्हणून नियुक्त केले आणि चार वर्षानंतर १९८४ मध्ये त्यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून घोषीत केले. जेव्हा एम.जी.रामचंद्रन तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले तेव्हा अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कझागम चे सर्व कारभार जयललितांनी सांभाळले. रामचंद्रन यांच्या मृत्यू नंतर अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कझागम च्या कार्यकर्त्यांनी जानकी रामचंद्रन अर्थातच एम.जी. रामचंद्रन च्या पत्नीला सर्व जबाबदाऱ्या देण्यास सांगितल्या त्या वेळेस अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कझागम चे दोन गट निर्माण झाले. एक गट जानकी रामचंद्रन यांना समर्थन करत होते तर दुसरे जयललितांना. वाद-विवादांनन्तर परत एकदा पक्ष संघठित झाला आणि जयललितांना प्रमुख म्हणून घोषित केले. १९९१, २००२ आणि २०११ मध्ये जयललितांनी स्वताच्या बळावर तामिळनाडू विधानसभा जिंकली होती व त्या तीन वेळा राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या.
निधन
६ डिसेंबर २०१६ रोजी जयललितांनी आपल्या जीवनातील शेवटचा श्वास घेतला आणि त्यांनी आपला फिल्मी आणि राजनीतिक प्रवास यशस्वीरीत्या पार पडला.
-नीरज भावसर
मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारची माहिती वाचायला आवडत असेल तर तुमच्या आवडत्या संकेतस्थळाला सब्सक्राईब करा. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Leave a Reply