इस्रो ही फक्त संस्था नाही तर तो भारताच्या शिरपेचात रोवलेला एक तुरा आहे. कारण प्रगत देशांना जी गोष्ट साध्य करण्यात प्रचंड खर्च आला. ते इस्रो ने अगदी कमी खर्चात करून दाखवले. ISRO Information in Marathi इस्रो संस्था माहिती मराठी

इस्रो Indian Space Research Organisation,
इस्रो ही फक्त संस्था नाही तर तो भारताच्या शिरपेचात रोवलेला एक तुरा आहे. त्याला कारणही तसेच आहे भारत स्वतंत्र झाला तेव्हा काय होते आपल्याकडे गरीबी, विखुरलेला भारत,बेरोजगारी, किती तरी प्रमाणात अशिक्षित लोक. या सगळ्या महत्वाच्या समस्या आपल्या देशासमोर भेड़सावत असताना नेहरुंसमोर प्रश्न होता कि लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवीने गरजेचे होते आणि अशाही परिस्थिति मध्ये भारतात अंतराळ संशोधन संस्था स्थापन करणे म्हणजे धाडसाचे काम आणि यावर त्यावेळी टिका करणारेही भरपूर होते…
पण नेहरुंसारख्या दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यासमोर विक्रम साराभाई यांनी इस्रोच्या स्थापनेचा प्रस्थाव ठेवला. याला विरोध होणार हे माहीत असूनही नेहरुंना माहीत होते जागतीक पटलावर भारताचे अस्तित्व ठेवायचे असेल तर विज्ञानातील प्रगती करण्याशिवाय भारताला पर्याय नव्हता हे नेहरुंनी ओळखले. आणि साराभाईंना इस्रोच्या स्थापनेला हिरवा कंदील दिला. पण त्यानंतर भारत-चीन युद्ध आणि पुढे नंतर नेहरुंचा मृत्यु त्यामुळे इस्रोचे काम थोडे अडखळले त्यानंतर पंतप्रधान झालेल्या शास्री यांनी इस्रोला पाठींबा दिला.
Indian space research organisation information in Marathi
१९६९ मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विक्रम साराभाई यांनी इस्रोची Indian Space Research Organisation “ISRO” स्थापना केली. विक्रम साराभाई यांनाच भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाते. रशिया, अमेरिका ही दोन विज्ञानप्रगत बलाढ्य राष्ट्रे. त्यांची आर्थिक कुवतही मोठी. अवकाश संशोधन शाखेचे महत्त्व त्यांनी केव्हाच ओळखले.
मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांचे इस्रो मधील योगादान
थुंबा येथील रॉकेट लाँन्चींग स्टेशन बनवताना त्यांनी इंजिनिअर म्हणून जबाबदारी सांभाळली
Kalam was also the project director of India’s first Satellite Launch Vehicle (SLV-III)
एस एल व्ही ३ हे साटेलाईट लाँच करताना प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली
जगातील अंतराळ संशोधनातील स्पर्धा आणि भारत
ISRO satellite information in Marathi
- या शाखेच्या संशोधनाचा प्रारंभ करण्याचा मान आहे रशियाचा. ४ ऑक्टोबर १९५७ रोजी ८३ किलो वजनाचा ‘स्पुटनिक – १’ हा कृत्रिम उपग्रह अंतराळात पाठवून रशियाने मुहूर्तमेढ रोवली.
- अमेरिकेने त्यांचा पहिला ८ किलो वजनाचा कृत्रिम उपग्रह, ‘एक्प्लोअर – १’ हा ३१ जानेवारी १९५८ रोजी अंतराळात धाडला. रशियापेक्षा चार महिने उशिराने.
- आपण ३६० किलो वजनाचा ‘आर्यभट्ट’ हा पहिला उपग्रह १९ एप्रिल १९७५ रोजी प्रक्षेपित केला. आपणाला हे यश रशिया, अमेरिका यांच्यानंतर १७ वर्षांनी मिळाले. या यशातील दुसरा फरक हा की, रशिया, अमेरिकेने त्यांचे उपग्रह, त्यांच्या स्वत:च्या प्रक्षेपकातून म्हणजेच, अग्निबाणातून पाठवले. भारताला मात्र ‘आर्यभट्ट’ पाठविण्यासाठी रशियाचे सहकार्य घ्यावे लागले. रशियाच्या अग्निबाणातून त्याला अवकाशात धाडावे लागले. त्यावेळी आपणाला अग्निबाणाचे तंत्रज्ञान अवगत नव्हते. आपला उपग्रह आपल्या अग्निबाणातून पाठविण्याची सफलता उशिरा लाभली.
- १० जुलै १९८० रोजी एसएलव्ही या स्वदेशी अग्निबाणातून श्रीहरीकोटा प्रक्षेपण तळावरून ८० किलो वजनाचा ‘रोहिणी’ उपग्रह आपण धाडला. रशिया, अमेरिकेच्या तुलनेत हे यश २३ वर्षे उशिरा लाभले. यानंतर गेल्या सदतीस-अडतीस वर्षांत मात्र आपल्या शास्रज्ञ-तंत्रज्ञांनी या शाखेचे महत्त्व ओळखून सर्व लक्ष अवकाश संशोधन शाखेवर केंद्रित केले. त्यानंतर भारताने जी घौडदौड केली, ती चकित करणारी, नेत्रदीपक आहे.
- १९८० नंतर आजवर भारताने शेकडो उपग्रह अवकाशात धाडले. अनेक प्रकारच्या अग्निबाणांचा विकास केला. राकेश शर्मा या पहिल्या अंतराळवीरांनी अवकाशात झेप घेतली. राकेश शर्मा यांना तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी विचारले की अंतराळातुन भारत कसा दिसतो तेव्हा राकेश शर्मा म्हणाले ” सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा” अस उत्तर हे सगळ्या भारतीयांना उर भरून आणणारे आहे.
- मंगळाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी इस्रोने ‘मार्स ऑर्बिटर मिशन’ हे मंगळयान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी पीएसएलव्ही अग्निबाणातून मंगळाकडे पाठविले. ६ कोटी ५० लाख किलोमीटर अंतर प्रवास करून मंगळयानाने २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. तेव्हा भारत पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणारा जगातील पहिला देश ठरला. जे प्रगत देशांना ही जमले नाही ते भारताने पहिल्याच प्रयत्नात करून दाखवले.
- इस्रो ने १५ फेब्रुवारी २०१७ रोजी पीएसएलव्ही या भारतीय बनावटीच्या अग्निबाणातून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १०४ उपग्रह प्रक्षेपित करण्याची अजब कामगिरी फत्ते केली. या प्रकल्पाने भारतीय शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. या १०४ उपग्रहांपैकी भारताचे तीन तर अन्य देशांचे १०१ उपग्रह होते. परदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे देशाला भरीव परकीय चलन मिळाले, हे आणखी विशेष!
‘अग्निबाण’ तंत्रज्ञानाच्या अभावातील रुखरुख भारतीय शास्त्रज्ञांना स्वस्थ बसू देत नव्हती. ‘इस्रो’ने जिद्द बाळगली. खूप मेहनत घेतली आणि अग्निबाण क्षेत्रातील तंत्रज्ञान अवगत केले. अत्याधुनिक अग्निबाणात क्लिष्ट तंत्रज्ञानावर आधारित क्रायोजनिक इंजिन बसवावे लागते. क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञानातील सफलता आपणाला लाभली. १५ जून २०१७ रोजी क्रायोजेनिक इंजिन बसविलेल्या चार टन पेलोड क्षमतेचा महाकाय जीएसएलव्ही (जीओसिंक्रनस सॅटेलाइट लाँचिंग व्हेइकल) अग्निबाण अवकाशात यशस्वीरित्या झेपावला.
चंद्राच्या कुतूहलापोटी चांद्रयान-१ हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारताने हाती घेतला. तो २२ ऑक्टोबर २००८ रोजी पूर्णत्वास नेला. या दिवशी भारताने पीएसएलव्ही अग्निबाणातून ‘चांद्रयान-१’ हे यान चंद्राच्या रोखाने पाठविले. प्रकल्प यशस्वी झाला. यानाने आजवर ७० हजार छायचित्रे पाठवली. यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये इस्रो ने ‘चंद्रयान २’ ही मोहिम केली. काही प्रमाणात या मोहीमेला अपयश आले हे आपण सर्वानि बघितलेल आहे पण तरीही लवकरच अजुन एक मोहिम घेण्यासाठी इस्रो सज्ज आहे.
अशी आपली अंतराळ मोहीम नवनवी शिखरे गाठत आहे. गेल्या काही वर्षांत वैज्ञानिकांनी आणि तंत्रज्ञांनी हा चमत्कार घडवून दाखविला आहे.
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
ISRO Information in Marathi इस्रो संस्था माहिती मराठी ISRO satellite information in Marathi indian space research organisation information in marathi
Leave a Reply