International Yoga Day Information in Marathi Language Jagtik Yoga Din Information in Marathi
शरीराबरोबरच मनाचे आरोग्य सुधृढ व्हावे, मानसिक चैतन्य, इच्छाशक्ती, स्वतःचा शोध घेता यावा यासाठी योग साधना केली जाते.
Jagtik Yog Din Mahiti in Marathi International Yoga Day Essay in Marathi World Yoga Day Essay in Marathi Language Essay on Importance of Yoga in Marathi Language
२१ व्या शतकात माणूस भौतिक सुखांच्या मागे धावत आहे. या धावपळीमध्ये त्याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य ढासळत आहे. मानवी शरीर आणि मनावर अनेक रोगांची अतिक्रमणे वाढायला लागली आहेत. या साऱ्यांपासून मानवाची सुटका व्हावी व संपूर्ण मानवजातीच्या सुखासाठी प्राचीन भारतीय काळापासून चालत आलेली योग विद्येची परंपरा उपयोगात येऊन मानवी जीवन संपन्न व्हाव म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना पुढे आली. जगात शांतता निर्माण करण्यासाठी योग हा खूप महत्वाचा ठरू शकतो.
International Yoga Day Information in Marathi Language Jagtik Yoga Din Information in Marathi
जागतिक योग दिनाचा इतिहास जागतिक योग दिन का साजरा करतात ?
International Yoga Day History in Marathi Language
प्राचीन काळापासून वैदिक परंपरेनुसार भारतात योगाभ्यास केला जातो. भारतात योगाला अनन्यसाधारण महत्व आहे. पतंजली मुनींच्या काळापासून योग हा भारतात रुजत आहे. २० व्या शतकात स्वामी विवेकानंदांनी भारतात तसेच जगभर भ्रमंती करून योगाचा प्रचार व प्रसार केला. सध्या भारतात रामदेव बाबा , आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून योगाचा प्रसार होत आहे. तोच वारसा पुढे चालवून योगाचा जगभर प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींनी हा प्रस्ताव मांडला. यावर ऑक्टोंबर महिन्यात चर्चा झाली. या प्रस्तावामध्ये योगाचे फायदे, त्याचे मानवी मन व शरीरावरील परिणाम या साऱ्या गोष्टींचे विस्तृत विवेचन करण्यात आले आहेत. त्यानंतर काही देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हा प्रस्ताव मान्यतेसाठी महासभेपुढे ठेवला. या प्रस्तावाला तब्बल तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मंजुरी मिळाली. त्यावेळी अफलातून म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधी लाभले आहेत. प्रथमच एखाद्या प्रस्तावाला एवढय़ा देशांचे सहप्रतिनिधी लाभले. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. या प्रस्तावावर सदस्य राष्ट्रांच्या सह्या झाल्यावर २१ जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
योग दिवस साजरा करण्यासाठी २१ जून का?
२१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे. म्हणून हा मोठा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यासोबतच योग हि भारतातील ५००० वर्षे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. म्हणून २१ जून हा दिवस सर्वानुमते जागतिक योग दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरले.
योग का करावा? योग करण्याचे फायदे
आपलं मन व आरोग्य स्वास्थ्य ठेवण्यासाठी योग करावा. आपण जे अन्न खातो त्याचं योग्य पचन व्हाव, पोटाच कार्य योग्य पद्धतीने चालवं, हात, पाय , पोट, मान, पाठ, यातील स्नायू बळकट व्हावेत तसेच हृदयविकार व इतर रोगांपासून मुक्ती मिळावी. स्वास्थ्य आरोग्य जगता याव म्हणून योग करावा. मन व मेंदूला कार्यक्षम बनवण्यासाठी योग करावा. योग हा माणसाला पूर्णत्वाकडे घेऊन जातो त्यामुळे मनाला शांती मिळते व सतत ताजेतवाने राहावं म्हणून प्रत्येकाने योग केला पाहिजे.
योगासने
योगासने ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. ह्या वेगवेगळ्या योगासनांचा शरीराचा वेगवेगळ्या भागांना फायदा होतो. अंदाजे एकूण 84 योगासने आहेत.
सूर्यनमस्कार
सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही एका विशिष्ट क्रमाने खाली दिलेले मंत्र उच्चारून १० किंवा १२ योगासने करावेत. सूर्यनमस्कार करण्यातून आपल्या शरीराला सूर्याप्रमाणे शक्ती मिळते म्हणून सुर्यनमस्काराराला आसणामध्ये महत्वाचे स्थान आहे.
सूर्यनमस्कार करण्याचे फायदे
- नियमित सूर्यनमस्कार केल्याने शरीर चपळ, लवचिक आणि त्याचप्रमाणे स्नायू बळकट होतात.
- सूर्यनमस्कार केल्याने सर्वांगाचा व्यावाय होतो.
मंत्र
१) ॐ मित्राय नमः
२) ॐ रवये नमः
३) ॐ सूर्याय नमः
४) ॐ भानवे नमः
५) ॐ खगाय नमः
६) ॐ पूष्णे नमः
७) ॐ हिरण्यगर्भाय नमः
८) ॐ मरीचये नमः
९) ॐ आदित्याय नमः
१०) ॐ सवित्रे नमः
११) ॐ अर्काय नमः
१२) ॐ भास्कराय नमः
ही जागतिक योग दिनाबद्दल माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा.
-भरत मोहळकर.
International Yoga Day Information in Marathi Language Jagtik Yoga Din Information in Marathi Jagtik Yog Din Mahiti in Marathi International Yoga Day Essay in Marathi World Yoga Day Essay in Marathi Language Essay on Importance of Yoga in Marathi Language जागतिक योग दिन माहिती मराठी आंतरराष्ट्रीय योग दिवस मराठी माहिती योग दिवस निबंध मराठी जागतिक योग दिन निबंध मराठी जागतिक योग दिन का साजरा करतात Yoga day essay in marathi language.
Leave a Reply