आयर्न लेडी भारत देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आज.
उर्जस्वी नेता इंदिरा गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. इंदिरा गांधींविषयी सांगण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. इंदिरा गांधी माहिती मराठीत.
भारताच्या पहिल्या आणि आत्ता पर्यंतच्य एकमात्र महिला पंतप्रधान . भारतरत्न१९७१.
१९९९ च्या मिलेनियम ऑफ दि वुमेन.
३१ ऑक्टोंबर १९८४ साली बेअंत सिह आणि सतवंत सिह सुरक्षारक्षकांनी मिळून त्यांची हत्या केली.
त्या दिवशी इंदिरा गांधी चालत होत्या अचानक त्यांच्यावर सुरक्षारक्ष बेअंत सिह याने फायरिंग केली ती गोळी
इंदिराजींच्या पोटात लागली. त्यांनी बचाव करण्यासाठी चेहरा हाताने लपवायला लागल्या तेवढ्यात बेअंत ने पुन्हा दोन
गोळ्या झाडल्या. त्या त्यांच्या छाती आणि कमरेत घुसल्या. तिथून पाच फुट अंतरावर सतवंत सिह त्याच्या
automatic टाँमसन कार्बाईन गन बरोबर उभा होता. इंदिरा गांधी खाली पडताना बघून तो घाबरला. आपल्या जागेवरून
हलला सुद्धा नाही. तेवढ्यात बेअंत ओरडला ” गोली चलावो ” सतवंत लगेचच बंदुकीतून २५ च्या २५ गोळ्या झाडल्या.
इंदिराजींना हॉस्पिटल मध्ये घेऊन जाताना त्याचं रक्ताने माखलेले मस्तक सोनिया गांधीच्या मांडीवर होतं. सोनियाचा
गाऊन रक्ताने भिजला होता.
गुप्तचरांनी आगोदरच सावधगिरीचा इशारा दिला होता कि आपल्या गटातील सुरक्षारक्षकांपैकी सिख लोकांना काढून
टाका पण यावर इंदिराजीनी सडेतोर उत्तर दिलं होतं ” आरान्ट वी सेकुलर ” आपण धर्मनिरपेक्ष नाहीत काय?.
तरीपण हे ठरवण्यात आलं कि दोन सिख सुरक्षारक्षक जवळ-जवळ उभे करू नयेत पण ३१ ऑक्टोंबरला सतवंत सिह ने
पोट खराब आहे नाटक करून मला toilet जवळ उभे राहूद्या. असं सांगून ते दोघे जवळ उभे राहिले. अश्या प्रकारे बेअंत
आणि सतवंत सिह ने मिळून आँपरेशन ब्लूस्टारचा बदला इंदिरा गांधीची हत्या करून घेतला. इंदिरा गांधी माहिती मराठीत.
Leave a Reply