बघा आय टी आर भरून तुम्ही या सुविधांचा लाभ घेऊ शकता. आय टी आर भरणे का गरजेचे आहे जाणून घ्या. Income Tax Return information in Marathi
इन्कम टॅक्स रिटर्न आयटी रिटर्न म्हणजे काय

इन्कम टॅक्स भरणे हे आपल्या कर्तव्यच आहे असे मला वाटते. याच पैशातुन सरकार अनेक जनतेची कामे करू शकते.
प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) भरणे आवश्यक आहे का, असा प्रश्न सर्वसाधारणपणे अनेकांना पडतो. माझ्या मते हे आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला कर्ज घेणे, व्हिसा काढणे या व अशा अनेक कारणांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र हा एक तुमच्या उत्पन्नाचा ठोस पुरावा मानला जातो. प्राप्तिकर विभागाने विवरणपत्र दाखल करणे अत्यंत सोपे केले आहे. ज्यांचे उत्पन्न पगार/पेन्शन आणि व्याज या स्वरूपाचे आहे आणि ज्यांच्याकडे फक्त एकच घर आहे, तसेच ज्यांचे करपात्र उत्पन्न ५० लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींचा विचार करूया.
इन्कम टॅक्स माहिती आयकर नियम मराठी आयकर कपात माहिती
भारतामध्ये आज घडीला(०६/०८/२०२१)
२५०००० च्या वार्षिक उत्पन्न – ० शून्य टक्के
२५०००० – ५००००० वार्षिक उत्पन्न – ५ %
Above Rs. 10,00,000 – 30%
सिनियर सिटीझनसाठी
Up to Rs. 3,00,000 च्या वार्षिक उत्पन्न – ० शून्य टक्के
Rs. 3,00,000 to Rs. 5,00,000 5%
Rs. 5,00,000 to Rs. 10,00,000 20%
Above Rs. 10,00,000 – 30%
आपण प्रथमच ई-विवरणपत्र भरणार असल्यास, आपल्याला incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर आपले खाते उघडावे लागेल. यासाठी आपल्याला एक ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. आपला ‘पॅन’ आणि इतर माहिती टाकून आपण खाते उघडू शकता. खाते पडताळणी (verification) साठी आपल्या मोबाइल आणि ई-मेल वर दोन स्वतंत्र OTP येतील. हे दोन्ही OTP टाकून आपण पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
सर्वप्रथम आपल्या सर्व बँक खात्यांची पासबुक/खातेउतारे, करकपातीची (TDS) प्रमाणपत्रे, ज्या गुंतवणुकीची/खर्चाची वजावट घ्यायची आहे, त्याची कागदपत्रे, गृहकर्जावरील व्याजाची वजावट घ्यायची असल्यास त्याचे प्रमाणपत्र आणि इतर काही उत्पन्न घोषित करायचे असल्यास त्याची कागदपत्रे तयार ठेवावीत. तसेच आपल्या ई-फायलिंग खात्यामध्ये जाऊन annual tax statement (26AS) डाउनलोड करून घ्यावे. तसेच करकपात न झालेले (15G/ 15H फॉर्म दिल्यामुळे) उत्पन्न दाखवले असेल, तर त्याचीही नोंद घ्यावी. या व्यतिरिक्त या वर्षीपासून आपल्या काही इतर व्यवहारांची माहितीही यात दिली गेली आहे. उदा. मालमत्ता विक्रीवरील करकपात, मोठ्या गुंतवणुकीचे व्यवहार आदी व्यवहार दिसत असतील आणि त्यातून करपात्र उत्पन्न निर्माण होत असल्यास आपल्याला ITR-१ नमुन्यात विवरणपत्र भरता येणार आहे का, याची पुनर्तपासणी करावी आणि मगच योग्य पर्याय निवडावा.
ऑनलाइन विवरणपत्र भरताना ते तुम्हीच भरत आहात, याची खातरजमा करण्यासाठी e-verification आवश्यक आहे. पूर्वी हे आपल्या सहीमुळे शक्य होते. मात्र, ऑनलाइनच्या जमान्यात आता या सहीची जागा ही e-verification ने घेतली आहे. आपण आपले विवरणपत्र e-verify केले, तर आपल्याला पुढे कोणतेही कागदपत्र प्राप्तिकर विभागाकडे पाठवायची आवश्यकता नाही. यासाठी आपल्याला खालील पर्याय उपलब्ध आहेत-
आधार OTP: यात आपल्या आधारकार्डशी संलग्न असलेल्या मोबाइलवर OTP पाठविला जाईल. तो टाकून आपण आपले विवरणपत्र e-verify करू शकता. हा सर्वांत सोपा आणि जास्त वापरला जाणारा पर्याय आहे.
नेटबँकिंगद्वारे : यासाठी आपल्याकडे नेटबँकिंग सुविधा असणे आवश्यक आहे. आपले विवरणपत्र आपण e-verify न करता अपलोड करु शकता आणि नंतर आपल्या नेटबँकिंग खात्यात log-in करून Income-tax efiling चा पर्याय निवडा. आपल्या e-verify न केलेल्या विवरणपत्राची माहिती दिसेल, त्यापुढील e-verify पर्याय निवडून आपल्या बँक खात्याशी संलग्न असलेल्या मोबाइलवर आलेला OTP टाकून e-verification पूर्ण करा.
एटीएम मशिनद्वारे : हो! आपण आपले विवरणपत्र ‘एटीएम’द्वारे देखील e-verify करू शकता. काही निवडक बँकांच्या ‘एटीएम’वर ही सुविधा उपलब्ध आहे.
बँक किंवा डी-मॅट खात्याच्या आधारे : काही निवडक बँका आणि NSDL आणि CDSL कडील डी-मॅट खात्याच्या आधारेही e-verification पूर्ण करता येते.
आपण ऑनलाइन फायलिंगचा पर्याय निवडला असल्यास, आपली प्राप्तिकर विभागाकडे उपलब्ध असलेली बरीच माहिती (करकपात आणि आगाऊ करसुद्धा!) आपोआप भरली जाईल. यात बदल करण्याचा पर्याय आपल्याला उपलब्ध असेल. मात्र, यात बदल करण्याआधी तो खरोखरच आवश्यक आहे किंवा नाही, याची खातरजमा करून घ्या. अन्यथा नंतर निर्माण होणाऱ्या प्रश्नांना आपल्याला तोंड द्यावे लागेल. माहिती भरत असताना वेळोवेळी आपली माहिती ‘सेव्ह’ करायला विसरू नका. तसेच अखेरीस ‘सबमिट’ करण्यापूर्वी आपले उत्पन्न आणि करदायित्व/परतावा तपासून घ्या आणि पूर्ण खात्री झाल्यावरच ‘सबमिट’ करा.
आपण एक्सेल किंवा जावा प्रणाली वापरून विवरणपत्र भरणार असल्यास, pre-filled xml फाईल उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या खात्यामध्ये log-in करून My Account विभागातून आपण ही xml डाउनलोड करून घेऊ शकता व आपल्या प्रणालीमध्ये प्राप्तिकर विभागाकडे उपलब्ध असलेली आपली माहिती आपोआप भरू शकता. यात आपला ‘पॅन’, नाव, जन्मतारीख, पत्ता याबरोबरच करकपातीची आणि आगाऊ कराची माहितीही भरली जाईल. म्हणजेच ही माहिती भरण्याचे आपले कष्ट वाचतील आणि शिवाय माहिती भरताना होणाऱ्या चुकाही आपण टाळू शकाल!
यानंतर आपल्याला जी अतिरिक्त माहिती भरायची आहे किंवा जे बदल करायचे असतील, ते आपण करू शकता. माहिती पूर्ण भरून झाल्यावर आपल्याला आपण भरलेल्या माहितीत काही तांत्रिक चुका नाहीत ना, हे देखील तपासता येते आणि ही तपासणी पूर्ण झाल्यावरच आपली विवरणपत्राची xml फाईल तयार होते. म्हणजेच आपण भरलेले विवरणपत्र बहुतांशी बरोबरच असणार, याची आपण खात्री बाळगू शकता. आपली xml फाईल तयार झाल्यावर आपल्याला ती अपलोड करावी लागणार आहे.
अशा प्रकारे आपण आपला टॅक्स चा परतावा करू शकतो. अत्यंत किचकट अशी प्रक्रिया असल्या कारणाने होणाऱ्या चुका टाळण्यासाठी महितीतिल व्यक्ति कडूनच ही प्रक्रिया पूर्ण करून घेतलेली बरी.
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
Income Tax Return information in Marathi
ITR information in Marathi
इन्कम टॅक्स माहिती
Leave a Reply