Heart Attack Upay in Marathi Heart Attack Prevention in Marathi हार्ट अटॅक Heart Attack Information in Marathi language Precaution for Heart attack in Marathi
आज हार्ट अटॅक म्हणजे हृदय रोग म्हटले की आज आपल्या शरिरावर काटा उभा राहतो. कारण हार्ट अटॅक हा पुर्वी ठराविक वयातील व्यक्तिंना तसेच लठ्ठ व्यक्तींनाच येतो असे बोलले आणि ऐकले जायचे मात्र आजची परिस्थिती काहीतरी वेगळीच पहावयास मिळते आहे. हे सर्व होण्यासाठी त्याची कारणेही तशीच वेगवेगळी आहेत.
Heart Attack Upay in Marathi Heart Attack Prevention in Marathi
- आज आपण खात असलेले भेसळयुक्त अन्न हे खूप मोठे कारण आहे. हा विकार आपल्या नव्या जीवनशैलीतून निर्माण झाला आहे.
- सततची दगदग, ताण-तणाव, काळजी, कामाची पद्धत यामुळे हृदयरोग उफाळला जातो. त्यास कशा प्रकारे प्रतिबंध घालावा? हा एक मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे.
- मात्र जापनीज शास्त्रज्ञांनी प्रदीर्घ संशोधनानंतर असा निष्कर्ष काढला आहे की, सकाळी उठल्यानंतर नेहमीचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी पिल्यास हृदय विकारापासून सुटका होऊ शकते.
- आपल्या दैनंदिन जीवनात अशा प्रकारचा लहानसा बदल केल्यास यापासून सुटका मिळविणे शक्य होते.
- ग्रीन टी बरोबरच अधूनमधून कधीतरी कॉफी घेतल्यास आपण हृदयविकाराला एक हात लांब ठेवू शकतो, असा या प्रयोगाचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
योशिहिरो कोकुबो यांच्या नेतृत्वाखाली जपानच्या राष्ट्रीय हृदय रोग केंद्रात करण्यात आलेल्या प्रयोगामध्ये ग्रीन टीचा हा नवा उपयोग अनुभवानिशी सिद्ध झाला आहे. लोक ग्रीन टी आणि कॉफी जितके जास्त प्राशन करतील तेवढे हृदयरोगाचे प्रमाण कमी होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. ही पेये स्वस्त असल्याने ती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आहेत. तसेच ती पेये लोकप्रियदेखील आहेत. जगाच्या कोणत्याही भागात ती उपलब्ध होऊ शकतात. तसेच ही पेये कोणत्याही खेडेगावात सहज मिळू शकतात. कोकुबो यांच्या प्रयोगात असे सिद्ध झाले असले तरी चहा आणि कॉफीचा हा परिणाम नेमका कसा होतो तसेच ती प्रक्रिया कशी घडते हे मात्र उमगलेले नाही.
Heart Attack Upay in Marathi Heart Attack Prevention in Marathi
त्याचबरोबर स्ट्रॉबेरी आणि ब्ल्यू बेरी या फळांमुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. असे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अभ्यासात आढळून आले आहे. या दोन फळांमुळे हृदय विकारापासून सुटका होऊ शकते. या दोन फळांचा हा परिणाम सर्वसाधारणत: जाणवतोच, परंतु तो महिलांच्या बाबतीत अधिक प्रभावी असल्याचे दिसते. अमेरिकेतील 25 ते 42 या वयोगटातील 93 हजार 600 महिलांची पाहणी केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या महिलांची फळे खाण्याची सवय, फळे खाण्याचे प्रमाण आणि फळांचा प्रकार यांचे तब्बल 18 वर्षे निरीक्षण करण्यात आले. सर्व प्रकारची फळे खाऊनदेखील ज्या महिलांच्या खाण्यामध्ये आठवड्यातून तीन वेळा ही दोन फळे खाण्यात येतात, त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 32 टक्के कमी होते.
शरीराची जाडी, आपण करत असलेल्या कामाची पद्धत, आपल्या शरिराच्या होणार्या दैनंदिन हालचाली, आपण करत असलेला व्यायाम, आपला दैनंदिन आहार, व्यसन यावरून तर हृदयविकाराची शक्यता कमी-जास्त होते.
हार्ट अटँकची लक्षणे हार्ट अटैक के लक्षण मराठी
Symptoms of heart attack in Marathi
- साधारणता छातीचा मध्यभागी वेदना होतात तीव्र वेदना होतात आणि त्याचबरोबर श्वास घेण्यास त्रास होतो.
- पोटाचा मध्यभागी, पाठीचा मणक्यात देखील वेदना होऊ शकतात.
- पुढे डाव्या हाताला व डाव्या जबड्याला देखील या वेदना होतात.
- खूप घाम येणे मळमळ होणे ही लक्षणे काही रुग्णामध्ये दिसून येतात. कधी कधी रक्तदाब कमी होऊन देखील रुग्णाचा मृत्यू होतो.
- चक्कर येणे अस्वस्थता याप्रकारची लक्षणे दिसून येतात.
- इस्पितळात इसीजी द्वारे डॉक्टर हृदयाचे ठोके मोजतात त्याचप्रमाणे रक्तदाब स्पिग्मोमँनोमीटरने मोजतात.
- यावरून डॉक्टर हार्ट अटँकचे निदान होते.
Heart Attack solution in Marathi हृदय विकार उपाय
ग्रीन टी आणि कॉफी या दोन पेयांचे सेवन केल्याने हार्ट अटँक होत नाही हे जरी सिद्ध झाले असले तरी हार्ट अटँक टाळण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सवई आणि जीवनशैली बदलणे खूप गरजेचे आहे.
हार्ट अटँक मुख्यता कोलस्ट्रोल, धुम्रपान करणे, मधुमेह, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची व्यायामाचा आभाव, या सगळ्या कारणांमुळे उद्भवतो.
मग हे आजार कशामुळे होतात त्या सवईंना आळा घालणे खूप गरजेचे आहे.
सकाळी उशिरा उठणे
सकाळी उशिरा उठल्यामुळे व्यक्ती कामाला जायला घाई करते, यामुळे कधी कधी उशिरा जेवण मग मध्ये वडापाव चहा पिणे या सगळ्यामधून पचनव्यवस्था खराब होते.
तेलकट, मैद्याचे पदार्थ खाणे
यामुळे शरीरात कोलेस्ट्रोल वाढते. कोलेस्ट्रोल रक्तवाहिन्यात साचल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होत नाही.
लठ्ठपणा
खूप खाणे सतत चरत राहणे भूक नसतानाही खाणे चमचमीत, मैद्याचे पदार्थ जास्त खाणे पाव, बेकरी पदार्थ ई
यामुळे लठ्ठपणा उद्भवतो आणि त्याअनुशांगे हार्ट अटँकला चालना मिळते
ताण तणाव
सतत धगधग चिंता चिडचिड करणे या सगळ्यामुळे पुढे हार्ट अटँकचा धोका वाढतो.
हार्ट अटँक न होण्यासाठी नियमित व्यायाम करावा
यात साधे साधे व्यायाम चालणे, रंनिग करणे यामधून शरीराचा चांगला व्यायाम होतो.
योगा –
हृदय रोग आयुर्वेदिक उपचार
योगा आणि योगासने हे आपल्या पूर्वजांनी दिलेला अनमोल ठेवा आहे. याचे महत्व परप्रांतीयांना समजले पण आजही आपण योगा आणि योगासने करत नाहीत
-सागर गोरखे.
Leave a Reply