Great womens Indian History Doctor Rakhmaba डॉक्टर रखमाबाई
आज गूगलने डॉक्टर रुखमाबाई राउत यांचा जन्मदिनी डूडल बनवून त्यांचा सन्मान केला यानिमित्ताने त्यांचा कामाची प्रचीती त्या डूडल वरून येते. आज रुखमाबाई राउत यांचा 153 वा जन्मदिवस आहे.
रुखमाबाई राउत या ब्रिटिश भारतामधल्या सुरुवातीच्या अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांपैकी एक होत्या. जेव्हा की त्या काळत महिलांना पुरुषांप्रमाणे सर्व हक्क नव्हतेच.
रुखमाबाई राउत यांचा जन्म मुंबई मध्ये 22 नोवेंबर 1864 साली झाला. त्यांचं लंग्न वयाच्या फक्त 11 वर्षी ‘दादाजी भिकाजी’ वय वर्ष 19, यांचासोबत झालं. त्यावेळेस भारतात बाल विवाहाची प्रथा अस्तित्वात होती.
15 व्या वर्षी लग्न झाल्यावर एका वर्षानंतर रुखमाबाईच्या आईने एका मुलीला जन्म दिला पुढे तिचे नाव रुखमाबाई
ठेवण्यात आले आणि त्यानंतर वयाच्या 17 वर्षी रुखमाबाईच्या आई विधवा झाल्या. रूखमाबाई विवाहानंतर सासर घरी न राहता रूखमाबाईने माहेरी राहून घरातच शिक्षण चालू ठेवले. रुखमाबाई यांनी शिक्षणाच्या आवडीपोटी दादाजी बरोबर विवाह बंधनात न राहण्याचा निर्णय घेतला. Great womens Indian History
पुढे दादाजीने मार्च 1884 मध्ये पत्नी वर पतीच्या वैवाहिक अधिकार परत मिळवण्यासाठी बॉम्बे हाईकोर्टात याचिका दाखल केली, कि रुखमाबाईने त्यांचाबरोबर राहावं. माननीय कोर्टाने रूखमाबाई यांना अधिकारांचा पालन करा किंवा जेल जाण्यासाठी तयार रहा असे सांगितले. रुखमाबाईनी नकार दिला व सांगितले की त्या या लग्नाला मानत नाहीत कारण की लहान वयात त्या लग्नाला स्वतःची सहमती देउ शकल्या नव्हत्या. कोनत्याच कोर्टात याआगोदर अशाप्रकारचा तर्क कोणी केला नव्हता. पुढे रमाबाई रानडे आणि बेहरामजी मालाबारी यांचासह अनेक सामाजसुधारकांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. शेवटी, दादाजी ने लग्न मोडण्यासाठी एक मुद्राच्या रूपात पैसे घेतले. यानंतर रुखमाबाई यांनी डॉक्टर बनण्यासाठी प्रशिक्षिण घेतले. पुढे त्यांनी डॉक्टरी जगतात 35 वर्षे योगदान दिले. डॉक्टरी पेशात यशानंतर त्यांनी संघर्षाचा प्रवास चालूच ठेवला बाल विवाह या प्रथेच्या विरुद्ध लिहून समाजमाधील या प्रथेचा नाश करण्याचा प्रयत्न केला. रुखमाबाई या सक्रिय सामाज सुधारक होत्या. त्यांचा मृत्यु वयाचा 91 वर्षी 25 सप्टेंबर 1955 साली झाला. Great womens Indian History डॉक्टर रखमाबाई यांचाबद्दल माहिती.
Leave a Reply