
Good Friday History information in Marathi
गुड फ्रायडे:-ईस्टरच्या आधीचा पवित्र शुक्रवार
कॅथोलिक, ईस्टर्न ऑर्थोडॉक्स, लुथेरन अंग्लिकन मेथोडिस्ट, ओरिएंटल ऑर्थोडॉक्स आणि इतर सुधारित परंपरा व अनेक ख्रिश्चन संप्रदाय या दिवशी कडक उपवास व चर्च सेवांसह गुड फ्रायडे पाळतात.
Good Friday History information in Marathi
गुड फ्रायडे (अर्थ):- ‘गॉड फ्रायडे’ या शब्दांचा अपभ्रंश ‘गुड फ्रायडे’ असा झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे ‘गुड बाय'(good bye) चा भाषांतर अनुसार ‘ईश्वर आपल्या बरोबर असू द्या'(God be with you.) याचे भाषांतर वापरले गेले आहे.
Good Friday story in Marathi
इतिहास:- गुड फ्रायडे हा दिवस ईस्टर संडे चा आधीच्या पहिल्या शुक्रवारी मानला जातो. या दिवशी येशूला धर्माचा अपमान केल्याबद्दल pontius pilate ने सुळावर चढवण्याची मागणी केली.(crucifixion) रोमने येशूच्या विचारांची निंदा केली. येशूने याच दिवशी क्रॉसवर (वधस्तंभावर) खिळांनी खिळवून घ्यायला मान्यता दिली. काटेरी मुकूट चढवून त्याला वधस्तंभावर खिळवले गेले. त्यानंतर येशूने ‘तुझ्याकडे येत आहे देवा!’ अशी आर्त किंकाळी फोडून प्राण सोडला. तेव्हा लगेचच कॅलव्हरी मध्ये सर्वत्र अंधार पसरला. थडगी उघडी पडली, मंदिरांचे पडदे फाटले. आणि पृथ्वीवरून एक दिव्य प्रकाशाचा स्रोत आकाशात झेपावला. त्यामुळे सर्वांना कळून चुकले की तो खरोखरच देवपुत्र होता. येशूच्या शिष्यांना अत्यंत शोक झाला. त्यांनी येशुचा देह मागितला. त्याच्या शरीरात सुरा भोसकून पाणी व रक्त बाहेर आलेलं पाहिल्यावर त्याने प्राण त्याग केल्याची त्यांची खात्री झाली.अत्यंत दुःखाने त्यांनी त्यांच्या शरीरावर सुगंधी लेप लावून पवित्र थडग्यात पुरले गेले. तीन दिवसानंतर पुन्हा तिथे आल्यावर येशु तिथे नव्हता हे त्यांच्या लक्षात आल्यावर तो पुन्हा जिवंत झाला आहे असे समजले गेले.
संकल्पना:- या दिवशी ख्रिश्चन लोक कडक उपवास करतात. ज्याला ‘ब्लॅक फास्ट’असेही म्हटले जाते. ज्या दिवशी कोणीही भोजन देऊ शकत नाही किंवा खाऊ शकत नाही.जर कोणी खूपच अशक्त किंवा वृद्ध व्यक्ती असेल तर त्याला सूर्यास्तानंतर भाकर व पाणी दिले जाते. काही ठिकाणी या दिवशी गरम क्रॉस बन्स बनवून खाण्याची पद्धत आहे. हा एक किंचित गोड असलेल्या ब्रेडचा प्रकार आहे. ही 500 वर्षांपूर्वीची एक जुनी इंग्रजी परंपरा आहे.
क्रॉस वरील सात अंतिम शब्दांवर आधारित तीन तासांची भक्ती दुपारपासून सुरू होते. व संध्याकाळी तीन वाजता समाप्त होते. चर्चने (गुड फ्रायडे) अधिकृतपणे ठरवलेली सार्वजनिक प्रार्थना व पूजाविधीमध्ये तीन भाग असतात:- वर्ल्ड लिटर्जी, क्रॉसची व्हेनरेशन, होली कम्युनियन.
विविध रूपे:- गुड फ्रायडे ह्या दिवसाला विविध प्रांतात विविध नावाने ओळखले जाते. डच भाषेत गुड फ्रायडे ला ‘गोएड व्रिजदान’ ; फ्रान्समध्ये ‘गोएडक्रीड’ ; जर्मनीत ‘करफ्रेटाग'(शोक शुक्रवार) किंवा होहेर फ्रिटाग(होली फ्रायडे) असे म्हणतात. फ्रेंच मध्ये वेंद्राडी संत (पवित्र शुक्रवार) आणि अरबी भाषेत ‘ग्रेट फ्रायडे’ असे म्हणतात. यावरूनच येशूचा धर्म प्रसाराची व्यापकता लक्षात येते.पवित्र दिवस किंवा शोक शुक्रवार म्हणून गुड फ्रायडे ला असलेला महत्व इतरत्र भागांमध्ये सुद्धा प्रभावीपणे आहे.
क्रॉस वरील सात अंतिम शब्द:-
1. ” Father, forgive them, for they know not what they do.”
2. ” Today shalt thou be with me in paradise.”
3. ” Woman, behold thy son!”
4. ” My God , my God , why hast thou forsaken me?”
5. ” I thirst.”
6. ” It is finished.”
7. ” Father , into Thy hands I commend my spirit.”
-गौरी डांगे
मित्रांनो, Good Friday History information in Marathi Good Friday story in Marathi ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Leave a Reply