अष्टपैलू कलाकार दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती

Girish Karnad Information Biography in Marathi language
अष्टपैलू कलाकार दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती
कलाक्षेत्रातील किंवा रंगमंचावर प्रभावित असेल असे म्हणजे गिरीश कर्नाड यांचा जन्म 19 मे 1938 माथेरान इथे कोकणी कुटुंबात झाला. गिरीश कर्नाड हे एक भारतीय अभिनेता, चित्रपट-दिग्दर्शक, कानडी लेखक, नाटककार आणि रोडस् स्कॉलर होते. त्याच प्रमाणे त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये व बॉलीवूड मध्ये खूप प्रभावीपणे काम केले. त्यांचे पूर्ण नाव गिरीश रघुनाथ कर्नाड असं होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यामध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण लिंकन कॉलेजमध्ये ऑक्सफर्ड येथे झाले. त्यांनी शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये हंगामी प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केलं. जेव्हा त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले तेव्हा त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशात बरेच नाव कमावले. गिरिश कर्नाड हे व्यक्तिमत्व खूप प्रतिभाशाली होते. त्यांनी गणितामध्ये बीए फर्स्ट क्लास मिळवल्यानंतर तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 1962 मध्ये त्यांची ऑक्सफर्ड युनियन अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.
त्यांचा पहिला चित्रपट वंशवृक्ष ज्यामध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून नाव कमावले जो एस एल भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. त्या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले.नब्बलियू निनादे मगने, ओंदनोंदू, कालादल्ली असे काही कन्नड चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. तसेच हिंदी चित्रपटातील उत्सव आणि गोधूलि हे चित्रपट खूप नावाजले गेले.
गिरीश कर्नाड यांच्या कामाचा सन्मान म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. १९७६-७८ कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष ते होते. तसेच १९८८-९३ ह्या काळात नाटक अकादमीचे सभापती म्हणून त्यांनी काम केले. नाट्यक्षेत्रातील भव्य योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने गिरीश कर्नाड यांना डॉक्टरेट व युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया या विद्यापीठाने डि.लीट पदवीने सन्मानित केले. भूमीवरील गिरीश कर्नाड हे एक सर्वांगीण अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांची कला ही त्यांची ओळख होती. ययाती हे गिरीश कर्नाड यांचे पहिले नाटक. ज्यामध्ये त्यांनी भारतीय वंशपरंपरा कुटुंब व्यवस्था व त्याची मानसिकता यांचा आढावा घेतलेला आहे. वंशपरंपरेने मिळालेले राज्य, संपत्ती ही एक जबाबदारी नसून ओझ ठरते. त्याचप्रमाणे नवी पिढी त्यामध्ये कशी चेपली जाते हे त्यांनी सांगितले आहे. अभिनेता गिरीश कर्नाड यांची युनेस्को आंतरराष्ट्रीय थिएटर ह्या संस्थेने वर्ल्ड थिएटर च्या राजदूत म्हणून नेमणूक केली. पॅरिस-आधारित एक दर्जन कलाकारांना म्हणून हा सन्मान देण्यात येतो. कर्नाड यांनी स्त्री बाबतीत असलेली चौकट मोडत तिचे पात्र स्वतःच्या नाटकांमध्ये विस्तारवादी दाखवले आहे.
गिरीश कर्नाड यांनी ‘आडाडता आयुष्य'(खेळता खेळता आयुष्य) हे कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिले. याचा अनुवाद उमा कुलकर्णी यांनी मराठीमध्ये केला आहे.
Girish Karnad Information Biography in Marathi language
सन्मान व प्राप्त पुरस्कार:-
कालिदास सन्मान पुरस्कार
तन्वीर सन्मान पुरस्कार (२०१२)
नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार(१९९२)
पद्मभूषण (१९९२)
पद्मश्री (१९७४)
भूमिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट कनक पुरंदरसाठी सुवर्ण कमल (१९८९)
पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे संचालकपद (१९७४-७५)
’वंशवृक्ष’साठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार(१९७२)
’संस्कार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक (१९७०)
संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी पुरस्कार(१९७२)
साहित्य अकादमी पुरस्कार (१९९४)
होमी भाभा फेलोशिप (१९७०-७२)
ज्ञानपीठ पुरस्कार (१९९८)
राजोत्सव पुरस्कार
गाजलेली नाटके:-
अग्नी मत्तू मळे (मूळ कानडी नाटक, मराठी अनुवाद, ‘अग्नी आणि पाऊस’, अनुवादक – सरोज देशपांडे)
काटेसावरी (नाटक, मूळ कानडी, मराठी अनुवादक – सरोज देशपांडे)
टिपू सुलतानचे स्वप्न (मूळ कानडी, मराठी अनुवादक – उमा कुलकर्णी)
तलेदंड (नाटक, मूळ कानडी, मराठी अनुवादक – उमा कुलकर्णी)
तुघलक (कानडीत लिहिलेले) (लेखन आणि दिग्दर्शन)
नागमंडल (मूळ कानडी नाटक, लेखन व दिग्दर्शन; मराठी अनुवादक – उमा कुलकर्णी)
बलि (मूळ कानडी नाटक, मराठी अनुवादक – सरोज देशपांडे)
भंगलेले बिंब पुष्पसाज (मूळ कानडी नाटक , मराठी अनुवाद – सरोज देशपांडे)
ययाती (नाटक, मूळ कानडी, मराठीत अनुवाद श्री.र. भिडे आणि शिवाय उमा कुलकर्णी)
हयवदन (नाटक, मूळ कानडी,लेखन व दिग्दर्शन, मराठी अनुवादक – सरोज देशपांडे
यातील बरीच नाटके अनेक भाषांमध्ये अनुवादित आहेत. जी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सादर झालेली आहेत.
गिरीश कर्नाड अभिनीत/दिग्दर्शित चित्रपट:-
अष्टपैलू कलाकार दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती
इक्बाल (हिंदी, अभिनय)
उत्सव (हिंदी भाषेत, दिग्दर्शन)
उंबरठा (मराठी, अभिनय)
एक था टायगर (हिंदी, अभिनय)
ओंदनोंदू कालादल्ली (कानडी, दिग्दर्शन)
कनक पुरंदर (कानडी)
काडू (कानडी, दिग्दर्शन))
कानुरू हेग्गदिती (कानडी)
गोधुलि (हिंदी, पटकथा)
टायगर जिंदा है (हिंदी, भूमिका-राॅ चीफ)
तब्बलियू नीनादे मगने (कानडी)
निशांत (हिंदी, अभिनय)
पुकार (हिंदी, अभिनय)
मंथन (हिंदी, अभिनय)
लाईफ गोज ऑन (हिंदी, अभिनय)
वंशवृक्ष (कानडी, दिग्दर्शन)
सरगम (मराठी, अभिनय) (अप्रकाशित)
संस्कार (हिंदी, अभिनय)
अशा भारतीय रंगमंचावरील अलौकिक रत्नाचा अस्त 10 जून 2019 ८१ व्या वयात बंगळुरू, कर्नाटक येथे झाला. आयुष्याने ही त्यांना भरभरून साथ व त्यांचे अलौकिक कौशल्य टिकून राहिले.
-गौरी डांगे.
Girish Karnad Information Biography in Marathi language
अष्टपैलू कलाकार दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती
Leave a Reply