गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी व्रत माहिती गणेश उत्सव का साजरा केला जातो जाणून घ्या धार्मिक सांस्कृतिक महत्व आणि निबंध. संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणजे काय ? Ganesh Chaturthi Sankashti Angaraki Chaturthi Information in Marathi Language
गणेश चतुर्थी संकष्टी अंगारकी चतुर्थी माहिती मराठी गणपती सणाची माहिती निबंध मराठी
Ganesh Chaturthi Sankashti Angaraki Chaturthi Information in Marathi Language
एकदंत, वक्रतुंड, गजवक्र, लंबोदर, धुम्रवर्ण अशा असंख्य नावाने आपण श्री गणेशाला संबोधतो. गणपती हे आपल्या सर्वांच लाडकं दैवत! गणपती बाप्पाला आपण मांगल्याचं प्रतीक तसेच आराध्य दैवत म्हणून प्रत्येक नवीन शुभ कार्याचा सुरवातीस पूजा करतो. त्यांना सर्व देवांमध्ये सर्वप्रथम पूजेचा मान आहे. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा व्रत आहे. या दिवशी गणेश भक्त उपवास धरतात. प्रत्येक महिन्यात एक किंवा दोन चतुर्थी नियमित असतात. त्यात महिन्यात एकदा संकष्ट चतुर्थी येते. संकष्ट चतुर्थी आणि अंगारक चतुर्थी या दोन प्रमुख चतुर्थी आहेत. त्यापैकी संकष्ट चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात येते परंतु अंगारक चतुर्थी ही सहा महिन्यातून एकदाच येते.
चतुर्थी कालमापनमधील अमावास्येनंतर आणि पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी येते.
गणेश चतुर्थी– भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला. या दिवशी आपण गणेशजयंती साजरी करतो.
विनायकी चतुर्थी– अमावास्येनंतर सुरू होणाऱ्या शुक्ल पक्षामधील चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात.
संकष्टी चतुर्थी– पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात.
चतुर्थी महिमा:-
शुक्ल आणि संकष्ट चतुर्थी
शुक्ल आणि संकष्ट चतुर्थी बद्दल पुराणात एक कथा सांगितली आहे. ती पाहूयात.
Sankashti Chaturthi Mahatmya story Vrat Katha in Marathi
संकष्टी चतुर्थी कथा महात्म्य
ब्रम्हदेव सृष्टी निर्माण करीत असताना त्यांना निर्मिती सुचेना, त्यामुळे ते बैचैन झाले. अचानक आकाशवाणी झाली की हे ब्रम्हदेवा, अभिमानाचा त्याग कर व जो मंत्र तू जपत आहेस,तो ओंकार लावून गणेश वंदन करून जप. ब्रम्हदेवाने तसे केले तेव्हा एक महाप्रकृती निर्माण झाली. तिला योगमाया म्हणतात. योगमायेला ब्रम्हदेवाने षडाक्षर मंत्र सांगितला. तिच्या तपश्चर्येमुळे गणेश प्रसन्न झाले आणि तिला वर दिला की तूझे नाव व्रतमाया होइल आणि तूझ्या पोटी मी जन्म घेईन. व्रतमाया पिता ब्रम्हदेव यांच्याकडे परत आली. तेव्हा कालमापनासाठी तुझा जन्म झाला आहे. असे तिला सांगितले. त्यासाठी तिने तीर्थरूप देह धारण केला. तो असा 4 तोंडे, 4 पाय, 4 हात, दक्षिण भाग गोरा, वामभाग काळा, दक्षिण भागास वरद अथवा शुक्ल चतुर्थी म्हणतात. तर वामांगास कृष्ण म्हणजेच संकष्ट चतुर्थी म्हणतात.
या व्रतमायेला मुखापासून प्रतिपदा, नसिकेपासून द्वितीया, वक्षस्थलापासून तृतीया, करंगळी पासून पंचमी, हृदयापासून षष्ठी, नेत्रापासून सप्तमी, बाहुंपासून अष्टमी, उदरापासून नवमी, कर्णापासून दशमी, कंठापासून एकादशी, पायांपासून द्वादशी, स्तनांपासून पौर्णिमा आणि जिव्हेपासून अमावस्या निर्माण होऊन कालगणनेला सुरवात झाली.
सर्व तिथ्यांसोबत दोन्ही चतुर्थ्यांनी मोठे अनुष्ठान केले. मध्यान्ह म्हणजेच दुपारच्यावेळी श्री गणेश शुक्ल चतुर्थीला प्रसन्न झाले व प्रहर रात्री कृष्ण चतुर्थीला प्रसन्न झाले. दोघींनिही श्री गणेशाची शाश्वत भक्ति मिळावी असा वर मागितला. गणेशांनी शुक्ल चतुर्थीला वर दिला की, “माझी भक्ति तुला पूर्ण लाभेल व माझे जन्म वेळोवेळी याच तिथिला होतील आणि तू शुक्ल चतुर्थी मध्यान्हथापिणी आणि वरदा चतुर्थी या नावाने प्रसिद्धि पावशील. “श्री गणेशांनी कृष्णचतुर्थीला वर दिला. “तुझे व्रत चंद्रोदय काली मान्य होईल. यादिवशी उपवास करून भक्ती करणाऱ्यांचे संकट मी निवारण करील. या योगे तुला संकष्ट चतुर्थी हे नाव मिळेल.
गर्भज,देहज,अंतिम्व वाम्यज या चार संकटातून मुक्त होण्यासाठी गणेशांनी संकष्ट चतुर्थीचे व्रत सांगितले.
अंगारकी चतुर्थी:-
मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीस अंगारक चतुर्थी म्हणतात.
Angarika Chaturthi Mahatmya story Vrat Katha in Marathi
अंगारकी चतुर्थी कथा महात्म्य
अवंति नगरात भारद्वाज मुनी होते. ते एका अप्सरेवर अनुरक्त झाले आणि त्यापासून त्यांना एक पुत्र झाला. तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता. 7 वर्षांचा झाल्यावर त्याने आपल्या मातेला पित्याबद्दल आणि आपल्या रंगाबद्दल विचारले. तेव्हा मातेने माहिती देऊन भारद्वाज मुनिंकड़े आणले. त्यांनी त्यास वेदविद्या आणि गणेश मंत्र शिकविला. त्याने मोठे तप केले. माघ वद्य चतुर्थीला चंद्रोदयाचे वेळी गणेशाने त्यास दर्शन दिले. मुलाने स्वर्गगती आणि अमृतपानाचा वर मागितला. गणेश त्याला भूमिपुत्र किंवा भौम असे संबोधुन म्हणाले, “तूझ्या इच्छा पूर्ण होतील. तु अंगाने लाल आहेस आणि वसुमतीचा पुत्र आहेस म्हणुन तुझे नाव अंगारक असे पडेल व तूझ्यामुळे अंगारकी चतुर्थी हे नाव रूढ़ होईल. “चतुर्थी ही गणेशाची प्रिय तिथी आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी गणेशोंपासनेतील प्रमुख तिथी मानतात. चतुर्थी म्हणजे चौथी स्थीती. अर्थात जागृती. स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया यातील तुरीयावस्था होय. ही अवस्था प्राप्त करणे हेच जीविताचे परमसाध्य मानले जाते. त्यादिवशी चंद्र पहायचा नाही कारण चंद्र मनाची संतति आहे. मन जेव्हा उन्मन होईल तेव्हाच तुरीयावस्था प्राप्त होईल.
Angarika Chaturthi Puja Vidhi in Marathi angaraki
अंगारकी चतुर्थी पूजा विधी-
श्री गेशाचे नामस्मरण करून दिवसभर निरंकार किंवा उपवासाला चालणारे पदार्थ खावेत. चद्रोदयानंतर पूजा करून उपवास सोडवा. धूप लाऊन पूजा करावी. मोदक आणि दुर्वा अर्पण करून पूजा करावी.
या मंत्राचा जप करावा.
गजाननं भूत गणादि सेवितं
कपित्थ जम्बूफलसार भक्षितम
उमासुतं शोक विनाशकारणं
नमामि विघ्नेश्वर पाद पंकाजम ॥
Sarvajanik Ganesh Utsav Festival Essay Nibandh in Marathi
माझा आवडता सण गणेशोत्सव निबंध मराठी सांस्कृतिक महत्व
सामाजिक ऐक्य टिकवन्यासाठी टिळकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व घरामध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. भारतामध्ये दर श्रावणात गणेशोत्सव साजरा केला जातो. या प्रसंगी शहरात ठिकठिकाणी गणेश मंडळांची स्थापना केली जाते. गणेश उत्सव हा सण दहा दिवस साजरा केला जातो. हा उत्सव भारत देशात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच विदेशात (काही ठिकाणी जेथे भारतीय आहेत.) मोठ्या आवडीने साजरा केला जातो.
दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणेश मूर्तीची पूजा-आरती केली जाते. सकाळी आणि संध्याकाळी बाप्पाची आरती झाल्यानंतर नैवैद्य दाखवून प्रसादाचे वाटप करण्यात येते. या उत्सव प्रसंगात बालचमुंची फार चंगळ असते. यावेळी अनेक गणेश मंडळात विविध स्पर्धा घेतल्या जातात. गणपती बसल्यावर शहरात गणपतीच्या देखाव्यांची आरस पाहण्यासाठी लोक गर्दी करत असतात. अश्याच पद्धतीने अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तींचे तलाव नद्या आणि समुद्रात विसर्जन केले जाते. हिंदू धर्माच्या तत्वानुसार हा दिवस भगवान गणेशाचा जन्मदिवस म्हणूस साजरा केला जातो. अश्या पद्धतीने गणपतीचा महिमा न संपनारी अपारंपार आहे.
-प्रियंका पुंड.
मित्रांनो Ganesh Chaturthi Sankashti Angaraki Chaturthi Information in Marathi Language Sarvajanik Ganesh Utsav Festival Essay Nibandh in Marathi Sankashti Angarika Chaturthi Mahatmya story Vrat Katha Puja Vidhi in Marathi ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया देऊन कळवा आणि अशा पद्धतीची सांस्कृतिक माहिती वाचण्यासाठी आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या वेबसाईटला पुन्हा भेट द्या.
“कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ!” जिथे दैनंदिन जिवनात उपयोला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
माझा आवडता सण गणेशोत्सव निबंध मराठी गणेश चतुर्थी संकष्टी अंगारकी चतुर्थी माहिती मराठी गणपती सणाची माहिती निबंध मराठी संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी कथा महात्म्य संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणजे काय
Leave a Reply