Filmmaker Dadasaheb phalke information Biography in Marathi language

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणजे दादासाहेब फाळके उर्फ धुंडिराज गोविंद फाळके ह्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र येथे झाला. ॲक्शन असं म्हणून जसा सिनेमा सुरू व्हावा तसाच काहीसा जीवनपट दादासाहेब फाळकेंचा होता. त्यामध्ये त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई फाळके हरणांची खुप मोठी भूमिका होती. 1937 पर्यंतच्या त्यांच्या एकोणीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 95 चित्रपट व 26 लघुपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या वडिलांचे नाव दाजीशास्त्री फाळके होतं जे प्रसिद्ध संस्कृत तज्ञ म्हणून प्रचलित होते. द्वारकाबाई फाळके या त्यांच्या माऊली, ज्यांनी कायम नवनवीन कला आत्मसात करण्याचं ज्ञान दादासाहेबांना उपजतच दिलं असावं. 1913 साली त्यांचा पहिला मूकपट-चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ हा भारतीय चित्रपट सृष्टीतील आद्य चित्रपट ठरला. त्यांनी दिग्दर्शक, निर्माता अशा क्षेत्रांमध्ये स्वतःची कारकीर्द गाजवली.
Filmmaker Dadasaheb phalke information Biography in Marathi language भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके माहिती मराठी
इ.स. १८८५ साली त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्रवेश घेऊन विविध कलांचे ज्ञान प्राप्त केले. जे.जे. कॉलेजमधून उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी बडोदा येथील कलाभवन येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला ,छायाचित्रणकला इत्यादी गोष्टी शिकले. ज्याचा फायदा त्यांना त्यांच्या छायाचित्रकार व्यवसायात झाला. त्यांनी गोध्रा गावात छायाचित्रकार या व्यवसायाला सुरुवात केली.परंतु ब्युबाॅनिक प्लेगाच्या उद्रेकात त्यांची पहिली पत्नी व मुलगा दगावले तेव्हा त्यांना ते गाव सोडावे लागले. ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या चाळीस जादुगारांपैकी ‘जर्मन काल हर्ट्झ’ या एकाशी त्यांची ओळख झाली. ज्या ओळखीचा बराचसा फायदा दादासाहेबांना भविष्यात झाला.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेमध्ये दादासाहेब फाळके यांना ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पण लवकरच नोकरीच्या बंधनांना कंटाळून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला व छपाईचा व्यवसाय सुरू केला. दादासाहेब फाळके ना त्यांच्यातील सुप्त कला शांत बसू देत नव्हती. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्मा सोबतही काम केले. पुढे स्वतःचा छापखाना काढला. त्यासाठी म्हणजेच छपाईची नवी तंत्रे व यंत्रे अभ्यासायला त्यांनी जर्मनीची वारी करायचे ठरवले. ‘ लाइफ ऑफ ख्रिस्त’ (Life of Christ) हा मूकपट पाहिल्यावर त्यांचे लक्ष हलत्या चित्रांचा व्यवसायाकडे वळाले. आणि 3 मे 1913 या तारखेला ‘राजा हरिश्चंद्र’ हरिश्चंद्र राजा च्या जीवनावर आधारित मुकपट मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहात प्रेक्षकांना पहिल्यांदा दाखवण्यात आला.
Filmmaker Dadasaheb phalke information Biography in Marathi language भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके माहिती मराठी
दादासाहेब फाळके यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणजेच गिरीजा उर्फ सरस्वतीबाई फाळके यांचा पहिल्या चित्रपटात मोलाचा सहभाग होता. ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या चित्रपटासाठी तारामती ची भूमिका सरस्वतीबाई करणार होत्या. पण इतर कामांमुळे त्यांनी नकार दिला.त्यांनी निर्मिती खर्चासाठी स्वतःचे सोन्याचे दागिने विकले. त्या फिल्म डेव्हलपिंग,मिक्सिंग आणि फिल्मवर रसायनांचा उपयोग करण्याचे शिकल्या. त्याचप्रमाणे फिल्मचे परफोरेटिंग (फिल्मवर दोन्ही कडांना भोके पाडणे), एडिटिंग (फिल्म चे तुकडे जोडणे) इत्यादी गोष्टी त्या करीत. शूटिंगच्या वेळी कॅमेरा असिस्टंट, स्पॉट बॉय, सूर्याच्या उन्हासाठी रिफ्लेक्टर धरून उभे राहणे आदी कामेही त्याच करीत. फिल्म निर्मितीसाठी कामावर ठेवलेल्या लोकांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची व आरामाची सोय ही त्यांची जबाबदारी होती. ६०-७० लोकांचा स्वयंपाक त्या करीत. व त्यांचे कपडेही धुवीत.
सर्व झोपल्यावर सरस्वतीबाई फिल्मच्या कथानकावर अडचणी दूर करण्यासाठी गटचर्चा करीत.(ब्रेन स्टाॅर्मिंग). आज त्यांच्या नावाने उत्कृष्ट कलाकारांना ‘सरस्वतीबाई फाळके’ हा पुरस्कार दिला जातो. तसेच मुंबईतील फिल्म सिटीला दादासाहेब फाळके चित्रनगरी असे म्हणतात. धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांच्या जीवनपटाचा अखेर नाशिक येथे 16 फेब्रुवारी 1944 ला झाला.
दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र‘ (इसवीसन 1913) या मूकपटानंतर ‘मोहिनी भस्मासुर‘ (इसवी सन 1913) हा मूकपट काढला.
इतर मूकपट खालील प्रमाणे:-
३. सावित्री सत्यवान (इ.स.१९१४)
४. श्रीकृष्ण जन्म (इ.स. १९१८)
५. कालिया मर्दन (इ.स. १९१९)
६. सेतुबंधन (इ.स. १९३२)
७. गंगावतरण (इ.स. १९३७)
दादासाहेब फाळके जीवनावरील पुस्तके:-
दादासाहेब फाळके – इसाक मुजावर
* दादासाहेब फाळके काळ आणि कर्तृत्व – जया दडकर.
* ध्येयस्थ विश्वास दादासाहेब फाळके – ज्योति निसळ.
* भारतीय चरित्रमाला : दादासाहेब फाळके – बापू वाटवे . * भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके – रमेश सहस्त्रबुद्धे.
• त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनावर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी ‘ हा चित्रपट सुद्धा उपलब्ध आहे. •
– गौरी डांगे.
Filmmaker Dadasaheb phalke information Biography in Marathi language भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके माहिती मराठी
Leave a Reply