Dr Stephen Hawking information Biography in Marathi Language स्टीफन हॉकिंग माहिती निबंध शोध विचार मराठी

इतिहास काही घटनांची आवर्जुन पुवरावृत्ती करत असतो. त्यातील काही घटना मानवी आयुष्यात प्रचंड बदल घडवणाऱ्या असतात. याप्रमाणेच ८ जानेवारी १९४२ रोजी एक घटना घडली. आधुनिक विज्ञानाचा जनक मानल्या जाणाऱ्या गॅलिलियोच्या मृत्यूनंतर व न्यूटनच्या जन्मतारखेच्या तब्बल तीनशे वर्षाने ब्रिटनच्या ऑक्सफर्डमध्ये विज्ञानाला एक वेगळी दिशा देणाऱ्या एका प्रतिभावान शास्रज्ञानाचा जन्म झाला. त्याचे नाव स्टिफन हॉकिंग.
स्टीफन हॉकिंग जन्म आणि बालपण-
स्टिफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १८४२ मध्ये इंग्लडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांचे वडील फ्रँक हॉकिंग हे जीवशास्राचे संशोधक होते तर आई इसोबेल ऑक्सफर्डची पदवीधर होती. तर स्टिफनला फिलिपा आणि मॅरी या दोन बहिणी तर डेविड हा दत्तक भाऊ होता. स्टिफन यांच्या जन्माच्या वेळी जग दुसऱ्या महायुध्दात होरपळून निघत होते. त्यातच हॉकिंग कुटूंबाची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे स्टिफन यांच्या जन्मानंतर हॉकिंग कुटूंब पुन्हा लंडनला रहायला गेले.
स्टीफन हॉकिंग शिक्षण–
१९५० मध्ये हॉकिंग कुटूंबाने लंडनहून सेंट अलबन्स येथे स्थलांतर केले. पुढे सेंट अलबन्समध्येच १९५० ते १९५३ या काळात स्टिफन हॉकिंग यांच्या शिक्षणाला सुरूवात झाली. या शाळेत असताना स्टिफन यांना वाचन, संगीत, गणित व भौतिकशास्त्र या विषयात रस निर्माण झाला. तर स्टिफन यांच्या हुशारीमुळे बालपणातच अनेक जण त्यांना आईनस्टाईन या टोपण नावाने ओळखत असत.
पुढे गणिताच्या शिक्षकांच्या प्रेरणेमुळे स्टिफन यांना गणित या विषयात उच्च शिक्षण घ्यावे असे वाटायला लागले होते. स्टिफन यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातच वैद्यकशास्र या विषयाला प्रवेश घ्यावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र पण ऑक्सफर्ड विद्यापीठात गणित या विषयाची पदवी नसल्याने स्टिफन यांनी वेगळा मार्ग निवडत विश्वविज्ञान या विषयाला प्रवेश घेतला. त्यासाठी त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली. पुढे १९६२ साली स्टिफन यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पुर्ण केले व उच्च शिक्षणासाठी त्यांनी केंब्रीज विद्यापीठात प्रवेश घेतला.
१९६६ मध्ये केंब्रीज विद्यापीठातून व्यावहारिक गणित व सैध्दांतिक भौतिकशास्त्र विषयात आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादावर तसेच विश्वविज्ञान या विषयांवरील संशोधन करत त्यावर पीच. एच.डी मिळवली.
स्टीफन हॉकिंग आजारपण आणि जगण्यासाठीचा संघर्ष
स्टिफन केंब्रीज विद्यापीठात शिकत असताना हिवाळी सुट्ट्यांसाठी आपल्या घरी आले होते. त्यातच एक दिवस स्टिफनला अचानक चक्कर आली आणि ते खाली पडले. सुरूवातीला डॉक्टरांनी अशक्तपणामुळे चक्कर आली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला. मात्र पुढे हा त्रास वाढतच गेला आणि स्टिफनची तब्बेत आणखी खराब होत गेली. त्यामुळे डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या आणि चाचण्यांच्या निष्कर्षानंतर स्टिफन यांना न्यूरॉन मोटार डिसीज हा आजार झाल्याचे निदान झाले. या आजारामध्ये हळूहळू शरीराचे स्नायूंवरील नियंत्रण संपते व शरीराचा एक एक अवयव काम करणे बंद करतात आणि यामध्ये शरीराच्या अवयवांपाठोपाठ श्वसन नलिकेचे कार्य बंद पडते व माणूस मरतो. त्यामुळे या आजारामुळे स्टिफन जास्तीत जास्त दोन वर्ष जगू शकतात असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर स्टिफन थोडे उदास झाले. त्यांना कशातच रस वाटेनासा झाला. मात्र अचानक हॉस्पिटलमध्ये एका असाध्य रोगाशी एक रूग्ण झगडताना पाहिला आणि त्यातून स्टिफन यांच्या मनात प्रेरणेची मशाल पेटली.
१९६३ मध्ये या आजारातच स्टिफन यांच्या पायांची हालचाल बंद झाली. दोन्ही पायांनी काम करणे बंद केले. त्यामुळे आता स्टिफन यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हील चेअरचा वापर करावा लागत होता. पुढे १९७० मध्ये स्टिफन यांच्या दोन्ही हातांनी काम करणे बंद केले. तेव्हा त्यांच्या व्हील चेअरला संगणक जोडण्यात आला. त्यामुळे आता स्टिफन फक्त बोटांचा वापर करून संगणकाच्या माध्यमातून त्यांना हवे ते काम करत असत.
हा सर्व संघर्ष कमी होता की काय म्हणूनच स्टिफन यांना १९८५ साली न्यूमोनिया आजाराने गाठले. तेव्हा त्यांच्या श्वसन नलिकेला छिद्र पाडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र या शस्त्रक्रियेमुळे स्टिफन यांना स्वतःचा आवाज गमवावा लागला. मात्र तरीही स्टिफन हॉंकिंग यांचा संघर्ष सुरूच होता.
स्टिफन यांचा आवाज गेल्यानंतर ते फक्त जीवंत शरीर बनून राहिले होते. ना चालू शकत होते ना बोलू शकत होते. मात्र तरीही त्यांचा मेंदू खूप ताकदीने काम करत होता. यावर स्टिफन हॉकिंग अनेक व्याख्यानात म्हणायचे की, मानसिक दुर्बलतेमुळे माणूस दुर्बल बनतो तर इच्छाशक्तीमुळे कणखर. त्यामुळे अशाच प्रबळ इच्छाशक्तीच्या जीवावर स्टिफन हॉकिंग वाटचाल करत होते.
Dr Stephen Hawking information Biography in Marathi Language स्टीफन हॉकिंग माहिती निबंध शोध विचार मराठी
पुढे १९९० साली स्टिफन यांच्या बोटांनीही काम करणे बंद केले. त्यामुळे आतापर्यंत बोटांच्या सहाय्याने संगणकावर काम करू शकणाऱ्या स्टिफन हॉकिंग यांच्यासमोर आता गहिरे संकट उभे राहिले. मात्र इच्छाशक्ती प्रबळ असेल तर अनेक मार्ग मिळतात याचा स्टिफन यांना संगणकतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांच्या रूपाने साक्षात्कार झाला. त्यांनी स्टिफन हॉकिंग यांच्यासाठी संगणकात एक नवी आज्ञावली लिहून ती संगणकात कार्यान्वित करून दिली. त्यामुळे स्टिफन यांना संगणकाच्या माध्यमातून बोलणे शक्य झाले. मात्र १९९६ साली नियतीने त्यांच्यावर आणखी एक घाव घातला. तेव्हा त्यांच्या ९२ टक्के शरीराने काम करणे बंद केले होते. मात्र तरीही मेंदू खूप वेगाने काम करत होता. आजारपण त्यांना आव्हान देत होते पण स्टिफन यांनी आपल्या शारीरिक अपंगत्वाला कधीच यशाच्या मार्गातील अडथळा बनू दिले नाही. त्यांनी आपल्या व्हीलचेअरलाच आपली ताकद मानली व विज्ञानाला वाहून घेतले.
स्टीफन हॉकिंग संशोधन आणि वाटचाल-
स्टिफन यांनी केंब्रीजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अनेक क्रांतीकारी संकल्पनान उजेडात आणून विज्ञानाला एक वेगळी कलाटणी दिली. त्यांनी १९६६ मध्ये व्यावहारिक गणित व सैध्दांतिक भौतिकशास्त्र विषयात आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादावर तसेच विश्वविज्ञान या विषयांवरील संशोधन करत त्यावर पीच.एच.डी मिळवली.
वाढता आजार आणि त्यासोबतच वैश्विक संशोधनाची इच्छा वाढत होती. त्याच काळात स्टिफन यांची रॉजर पेनरोझ या गणित विषयाच्या युवकाशी मैत्री झाली. पुढे स्टिफन व पेनरोझ यांनी मिळून संशोधन करत ताऱ्यांच्या पोटातील अणूइंधन संपल्यानंतर तो स्वतःच्या गुरूत्वाकर्षणाने स्वतःच्या केंद्राकडे ढासळू लागतो. तसेच अतिलहान आकारमानापर्यंत तो ढासळतो. त्यावेळी त्याची घनता अमर्याद होते व तो बिंदूवत होतो त्याला सिंग्यूलॅरीटीज असे म्हणतात. हा सिंग्यूलॅरीटीजचा सिध्दांत मांडला.
Dr stephen Hawking information Biography in Marathi Language स्टीफन हॉकिंग माहिती निबंध शोध विचार मराठी
पुढे याच सिंग्यूलॅरीटीजच्या संशोधनातून हॉकिंग यांना कृष्णविवराची संकल्पना सुचली. त्यासाठी त्यांनी आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिध्दांताचा आधार घेतला. त्यातूनच पुढे विश्वाला आरंभबिंदू असल्याचे स्टिफन हॉकिंग व रॉजर पेनरोझ यांनी सिध्द केले. त्यामुळेच त्यांना आद्य महास्फोटाचे भाकित करता आले व कृष्णविवरांच्या अस्तित्वाविषयी स्पष्टपणे विचार मांडता आले. विश्वनिर्मीतीच्या क्षणी निर्माण झालेल्या अतिसुक्ष्म कृष्णविवरांचे भाकितही हॉकिंग यांनी मांडले.
पुढे हॉकिंग यांनी एक क्रांतीकारी सिध्दांत मांडला. त्यामध्ये व्यापक सापेक्षतावाद व पुंजवाद यांचे संयुक्त उपयोजन केले. त्यात त्यांनी अवकाश आणि वेळ यांची सांगड घातली. त्यामुळे कृष्णविवरांच्या बाह्य सीमेवर पुंजवाद लागू करण्याचे गणनमापन करणारे स्टिफन हॉकिंग हे पहिले शास्रज्ञ होते.
कृष्णविवरे हे अदृश्य नसतात. तर कृष्णविवरे उर्जेला बाहेर टाकतात. हा सिध्दांत हॉकिंग यांनी मांडला त्यामुळे या सिध्दांताला हॉकिंग रेडिएशन असे नाव देण्यात आले.
स्टिफन हॉकिंग यांचा प्रॉपर्टीज ऑफ एक्स्पांडिंग युनिव्हर्स हा प्रबंध केंब्रीज विद्यापीठाने ऑनलाईन प्रसिध्द केला. तेव्हा हा प्रबंध इतक्या मोठ्या प्रमाणावर डाऊनलोड करण्यात आला की, केंब्रीज विद्यापीठाची वेबसाईट क्रॅश झाली.
स्टिफन यांनी अवकाश संशोधन, कालगणना, वेळेचा प्रवास, सापेक्षतावाद, गुरूत्वाकर्षण यासारख्या किचकट विषयांवर संशोधन केले.
स्टिफन हॉकिंग यांना एका व्याख्यानादरम्यान प्रश्न विचारला की, ब्रम्हाडातील अनेक गोष्टींची उकल तुम्ही केली मात्र तुम्हाला विश्वातील कोणती गोष्ट सर्वात गुढ वाटते? त्यावर उत्तर देताना त्यांनी स्री ही विश्वातील सर्वात गुढ गोष्ट असल्याचे म्हटले.
स्टीफन हॉकिंग वैवाहिक जीवन-
१९६२ साली स्टिफन हॉकिंग यांची जेन वाईल्ड यांच्याशी भेट झाली तर त्यांना न्यूरॉन मोटार हा आजार झाल्यानंतर त्यांनी जेन वाईल्ड यांना ऑक्टोबर १९६४ मध्ये लग्नासाठी मागणी घातली. त्यावेळी स्टिफन यांच्या हालचालीवर बंधने यायला सुरूवात झाली त्यामुळे त्यांच्या संसारात हे सर्वात मोठे आव्हान होते. पुढे १४ जुलै १९६५ रोजी स्टिफन यांनी सेंट अल्बन्स येथे लग्न केले. मात्र स्टिफन त्यावेळी म्हणायचे की, लग्नानंतर त्यांच्यावर येत असलेल्या शारीरिक बंधनांनंतरही त्यांना जगण्याचे कारण मिळाले.
पुढे जेन वाईल्ड या १९७७ साली स्टिफन यांच्यापासून वेगळ्या झाल्या त्यानंतर इलेनी मेसन यांच्याशी स्टिफन यांचा विवाह झाला. या दोन्ही पत्नींपासून स्टिफन यांना रॉबर्ट व तिमोथी हे दोन मुले तर लुसी ही एक मुलगी असे तीन अपत्य होते.
पुरस्कार-
• १९७४ – रॉयल सोसायटीची फेलो
• २००९ – अमेरीकेचा सर्वोच्च असणारा प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार
• १९८८ – इस्राईलच्या वूल्फ फौंडेशन तर्फे वूल्फ प्राईझ इन फिजिक्स हा पुरस्कार मिळाला.
• १९८१ – फ्रँकलिन पदकाने गौरवण्यात आले.
• २०१३- स्पेशल ब्रेकथ्रो प्राईज इन फंडामेंटल फिजिक्स
• २००६- ब्रिटनच्या रॉयल सोसायटीच्या वतीने कोप्ले पदक
• १९७९- अल्बर्ट आईन्स्टाईन पदक
• १९६६ – एडम्स प्राईज
• १९७५ – एडिंग्टन मेडल
• १९८५- रॉयल एस्ट्रोनॉमिक्स सोसायटीच्या वतीने सुवर्णपदक
• १९७६ – ह्यूग्ज मेडल
• १९७६ – डॅनी हॅनीमन प्राईज फॉर मॅथेमेटीकल फिजिक्स
• २००८- फॉन्सेका प्राईज
• १९८९- प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रियाज अवार्ड फॉर कॉन्कॉर्ड
• २०१९- ऑडि अवार्ड फॉर सायन्स फिक्शन
• १९८७ – डिरेक मेडल ऑफ द इन्स्टिट्यूशन ऑफ फिजिक्स
स्टिफन हॉकिंग यांची गाजलेली पुस्तके-
• अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम
• द ग्रँड डिजाइन
• माय ब्रीफ हिस्ट्री
• द युनिव्हर्स इन अ नटशेल
• ब्लॅक होलस् अँड बेबी युनिव्हर्स अँड ऑदर एसी
• ऑन द शोल्डर्स ऑफ जायन्टस
• गॉड क्रिएटेड द इन्टिगर्स : द मॅथेमॅटीकल बॅकग्राऊंडस् दॅट चेन्जड् हिस्ट्री
• द ड्रीम्स दॅट स्टफ इज मेड ऑफ : द मोस्ट अस्टोंडिंग पेपर्स ऑफ क्वांटम फिजिक्स अँड हाऊ दे शुक द सायन्टिफिक वर्ल्ड
• ब्रीफ एन्सर टू द बिग क्वेशनस्
चित्रपट-
२०१४ मध्ये स्टिफन हॉकिंग यांच्या आयुष्यावर आधारीत जेन हॉकिंग यांनी लिहिलेल्या कथेवर आधारीत व जेम्स मार्श यांनी दिग्दर्शिक केलेला द थिअरी ऑफ एव्हरीथिंग हा चित्रपट बनवण्यात आला आहे.
आयुष्याची अखेर-
न्यूरॉन मोटार या आजाराचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी स्टिफन हॉकिंग हे फक्त दोन ते आडीच वर्ष जगतील असे म्हटले होते. परंतू स्टिफन २, ५ नाही तर तब्बल ५५ वर्ष जगले व १४ मार्च २०१८ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
स्टिफन हॉकिंग सारख्या प्रतिभावान शास्रज्ञाचा मृत्यू आईन्स्टाईन यांच्या जन्मदिवशी झाला हा खूप मोठा योगायोग. हाच दिवस pi दिवस म्हणूनही ओळखला जातो.
मित्रांनो, Dr Stephen Hawking information Biography in Marathi Language स्टीफन हॉकिंग माहिती निबंध शोध विचार मराठी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कमेंट बॉक्स मध्ये कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Leave a Reply