डोळे लाल होणे आत जाणे डोळ्यातून सारखे पाणी येणे या समस्या आपल्या साध्या चुकांमुळे उद्भवतात. डोळ्यांची काळजी कशी घ्यावी घरगुती उपाय डोळे दुखणे घरगुती उपायजाणून घ्या.
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी घरगुती उपाय
Eye Care Tips in Marathi Language
पंच इंद्रियांपैकी किंवा ज्ञानइंद्रियांपैकी डोळे हा आकार आणि रूप जाणून घेण्यासाठी महत्वपूर्ण इंद्रिय आहे. जे अंध आहेत अशा व्यक्तींचा जीवनात निसर्गातील रंग नसतात. त्यांना सर्व सारखेच म्हणजे काळोख. ते आपल्या इतर ज्ञान इंद्रियांचा वापर करून गोष्टी समजून घेतात. एखाद्या गोष्टीची किंमत आपल्याला ती जवळ नसल्यावर किंवा आपण त्या वस्तूला कायमचे गमावल्यावर समजते. तसच सध्या लोक आपल्या डोळ्यांचा बाबतीत निष्काळजीपणा दाखवत आहेत आणि मग काही दिवसानंतर डोळ्यांची प्रकृती खालावल्यावर, दृष्टीदोष, तसेच इतर डोळ्यांचे आजार उद्भवल्यावर त्या वेळेस पश्चाताप करत बसतात.
डोळ्यांचे आजार होण्याची कारणे
- योग्य आहार नसणे. यात पोषण मुल्यांची, जीवनसत्वांची कमी. विटामिन अ, ब, आणि क ची कमतरता.
- सतत टीव्ही, कम्प्युटर, मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहणे.
- प्रदूषण, धूळ, वाऱ्यापासून डोळ्यांचे संरक्षण न केल्यामुळे.
- संसर्गजन्य रोग होण्यामुळे.
डोळ्यांचे आजार-
आज जगभरात तसेच भारतातही नेत्रारोगाचे अनेक रुग्ण आहेत. त्यामध्ये मोतीबिंदूचे प्रमाण सगळ्यात जास्त म्हणजे ६२ टक्के आहे तर लघुदृष्टी किवा दूरदृष्टी चे प्रमाण त्याखालोखाल म्हणजे २० टक्के आहे. बुबुळात फुल पडणे या आजाराने १ टक्के लोक बेजार आहेत. काचबिंदू या आजाराचेही ६ टक्के तर डोळ्यांच्या आतील आजारांचे ५ टक्के व इतर आजारांचे ६ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळतात. अशा प्रकारे प्रचंड प्रमाणात लोक डोळ्यांच्या आजारांनी ग्रस्त आहेत.
डोळ्यांचे आजार व उपाय
डोळे येणे, खुपऱ्या, रांजणवाडी, पापण्यांना उवा लागणे, लासरू, काचबिंदू, मोतीबिंदू, रातांधळेपणा, तिरळेपणा, आळशी डोळा, बुबुळाचे आजार, डोळ्यात जखमा होणे, दृष्टीदोष, डोळ्यात फुल पडणे यांसारखे अनेक आजार डोळ्याचं आरोग्य बिघडवतात.
संसर्गजन्य रोगांपासून डोळ्यांची काळजी कशी घ्याल
डोळे येणे आणि इतर संसर्गजन्य आजारांमध्ये घरात एखाद्या व्यक्तीला हा आजार झाल्यावर इतरांना तो आजार होण्याची शक्यता असते.
- डोळे आलेल्या व्यक्तीचा टॉवेल, रुमाल, इतरांनी वापरू नये.
- अशा व्यक्तींच्या टॉवेल, रुमाल ह्या वस्तू वेळोवेळी निर्जंतुक काराव्यात म्हणजे गरम पाण्याने धुवाव्यात.
- डोळ्यांचे संसर्गजन्य आजार झाल्यावर डॉक्टरांचा योग्य सल्ल्याने उपचार घ्यावेत.
- डोळ्यांना चष्मा लागत असल्यास चांगल्या नेत्रतज्ञाच्या सल्ल्याने घ्यावा.
- मोतीबिंदू झाल्यास त्यावर शास्राक्रिया करावी लागते
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी घरगुती उपाय
Eye Care Tips in Marathi Language
- डोळ्यांचा व्यायाम- शरीराला सदृढ बनवण्यासाठी जसे आपण व्यायाम करतो त्याचप्रमाणे डोळ्यांना सदृढ निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करावा.
- सकाळी सुर्योदयापूर्वी उठल्यावर मैदानात किंवा छतावर चटई हांतरून झोपावे, डोळे उघडे ठेऊन निळ्या आकाशाकडे पहावे. डोळे सर्व दिशांना फिरवावेत. हा व्यायाम रोज केल्याने डोळ्यांचा समस्या दूर होतील.
- सकाळी उठल्याबरोबर गार अथवा गरम पाण्याने आपले डोळे स्वच्छ धुवावेत.
- पापण्यांची चिपडे स्वच्छ करावीत.
- आहारात दुध, अंडी, हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट, पपई तसेच मोसमी फळे खावीत.
- डोळे दुखत असतील तर डोळ्यांची हलकी मसाज करा.
- डोळ्यातून सतत पाणी येत असल्यास कडूलिंबाच्या झाडाच्या पानांचा डोळ्यावर लेप लावा. त्याने डोळ्यातून येणार पाणी नक्कीच थांबतं.
Eye Problem Solution in Marathi Language
- डोळे दुखत असतांना डोळ्यावर काकडीचे तुकडे ठेवले तर डोळे दुखनं नक्की थांबतं.
- मोबाईल, कम्प्युटर यांचा मर्यादित वापर करावा.
- जास्त वेळ संगणकावर काम असल्यास मध्ये मध्ये थोडी विश्रांती घ्यायला हवी.
- डोळे थंड पाण्याने धुवावेत.
- डोळे दुखत असतील तर उन्हात जाने टाळा.
- रांजणवाडी आली असल्यास ती फोडून पु काढू नये. ती आपोआप जिरते. किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डोळे आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात जाऊ नये. तो संसर्गजन्य आजार आहे.
- इतरांनी वापरलेले काजळ, सुरमा वापरू नये.
- टाँवेल तसेच पदर वापरून डोळे स्वच्छ करू नयेत. कदाचित याने जंतूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
- धूळ व वारा यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी नेत्राताज्ञांच्या सल्ल्याने सनगॅागल्स वापरा.
- गाडी चालवताना हेल्मेट वापरा. (काच असलेले.)
वरील पद्धतीनी डोळ्यांची काळजी घेतल्यास आपले डोळे आपण नक्कीच निरोगी राहतील.
Eye Problem Solution in Marathi Language डोळ्यांची काळजी कशी घ्यावी घरगुती उपायDolyanchi Kalaji Kashi Ghyavi Gharguti Upay डोळे लाल होणे आत जाणे डोळ्यातून सारखे पाणी येणे डोळे दुखणे घरगुती उपाय तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊ नक्की कळवा.
आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा College Catta Katta या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या कारण “कॉलेज कट्टा म्हणजे तुमचा हक्काच माहितीच व्यासपीठ!’ जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Leave a Reply