Diwali Pollution in Marathi दिवाळी फटाके
दिवाळी फटाके
दिवाळी सणाला भारतीय सणांमध्ये उच्च स्थान आहे. दिवाळी सन हा भारतातच नाही तर भारतीय वंशाची जे लोक भारताबाहेर वास्तव्य करत आहेत, ते देखील दिवाळी सन मोठया आनंदाने साजरा करतात. दिवाळी सन अनेक पद्धतीने साजरा केला जातो. त्यातच पहिले गेले तर नवनवीन मिष्टान्न तयार करून, फटाके फोडून हा सन साजरा करतात. दिवाळीच्या सणाला आपल्याला दूध देणाऱ्या गायींची पूजा करतात. अशा या सणाला एक ना अनेक परम्परा आहेत.
आता आजचा कळीचा मुद्दा हा आहे की दिवाळी सन साजरा करताना हा कदाचित फटाके फोडण्यास महाराष्ट्रातही बंदी येण्याच्या मार्गावर आहे. कारण भारत देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात आता फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षीच WHO च्या आकडेवारी नुसार दिल्ली शहरास सर्वात प्रदूषित शहर म्हटले होते. मग त्याचेच पडसाद म्हणून आता दिल्ली शहरात फटाके विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. आणि त्यातूनच आता पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाराष्ट्रातही दिवाळीच्या वेळी वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण तसेच वायू प्रदूषण टाळण्याचा मुद्दा पुढे ठेवत, महाराष्ट्रातही फटाके विक्री आणि वाजविण्यावर बंदी घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना विचारणा केली आहे,त्यातूनच जर ते मान्य केले तर मग आपल्याला विना फटाक्यांच्या आतिषबाजी शिवाय यावर्षीच्या दिवाळी साजरी करावी लागणार आहे. परंतु दिवाळीचे महाराष्ट्रातील लोकांच्या मनातील महत्व समजून घेतले तर असा निर्णय कदाचीतच मुख्यमंत्री घेतील!
Diwali Pollution in Marathi आता आपल्याला हेही पाहायला मिळेल की मुख्यमंत्री साहेब पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना जे पर्यावरणाच्या दृष्टीने मानव जातीच्या तसेच इतर प्राणिमात्रांना होणार असलेला त्रास समजून त्यांनी हे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. आता या निर्णयाचे काय होईल ते होईल परंतु तसे पाहायला गेले तर खरच आपल्या घरातील अनेक अबाल-वृद्धांना या कर्ण-कर्कश आवाजाचा त्रास तर होतच असतो. परन्तु हे समजण्यासाठी आपल्या घरात किमान लहान किंवा मग एखादी वृद्ध व्यक्ती असायला हवी मगच आपल्याला या निर्णयांचे महत्व पटते. कारण आपली मानसिकताच तशी आहे की, आपल्या घरात कोणाला याचा त्रास होईल का मगच आपण या गोष्टींना पाठिंबा दर्शवतो.
सहजच विचार करण्याची गोष्ट आहे की, आपण दिवाळी सणाला फटाके किती वाजवतो. त्यातून निर्माण होणार धूर किती आहे. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो? त्याचबरोबर सन साजरा करत असताना फटाके फोडत असताना किती जण या फटाक्यामुळे भाजण्याचे प्रकार आपण दरवर्षी ऐकतच आहोत. सन साजरा करत असतानाही काही गोष्टींची जाणीव आपण ठेवली पाहिजे. घरांवरील विद्युत रोषणाई करत असतानाही सावधानता बाळगली पाहिजेच! लहान मुलांना त्यापासून दूर ठेवण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यातच सध्या सुरु असलेल्या लोडशेडींगलाही सामोरे जावे लागणारच आहे. म्हणून तुम्हाला ही दिवाळी आनंदात जाण्यासाठी शुभेच्छा….
– सागर गोरखे.
Leave a Reply