ज्योती-क्रांती को-ऑप.क्रेडिट सोसायटीने ‘अर्थ’शी संबंधित व्यवहार करतांनाच ‘नव्याचा ध्यास’ घेतला म्हणूनच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने ‘कॉलेजकट्टा’ वेब साईटच्या माध्यमाद्वारे आपण समाजाचं देणं लागतो ह्या भावनेनं वेगवेगळे विषय तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत, ह्यापुढेही येणारच आहोत.

ध्यास नव्याचा…
पस्तीस, चाळीस वर्षांपूर्वी मराठी चित्रपटांचा विषय राजकारण, तमाशा एवढाच संकुचित होता असं मला वाटतं. श्वास चित्रपटापासून मराठी चित्रपटांचे विषय आपण पाहिलेच असतील-उदाहरणार्थ देऊळ, ऑनलाइन बिनलाइन, विहीर, वळू, देऊळबंद, कॉफी बरंच काही… आणखीही अनेक चित्रपट. चाकोरी बाहेरचा विचार म्हणजेच नवं काही. नव्याचा ध्यास घेतलेली व्यक्ती खूप काही मिळवु शकते आणि देऊ सुद्धा शकते हे माझा लक्षात आलंय. नव्याचा ध्यास घेतला तरच आपण नवं, वेगळं असं काही देऊ शकतो. यशस्वी माणसं वेगळं करत नाहीत तर वेगळा विचार करून, नव्याचा ध्यास घेऊन वेगळ्या पद्धतीने विचार आणि कृती करतात. मळलेल्या पाय वाटेवरून कोणीही चालतं पण नवी पायवाट निर्माण करायची असं एखाद्यालाच वाटतं. नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘मांझी:द माऊंटन मन’ हा चित्रपट पहा म्हणजे नव्याचा ध्यास काय असतो हे समजेल. नव्याचा ध्यास घेतलेला मांझी मनात आणतो म्हणूनच एकटा परिश्रम घेऊन डोंगर फोडून रस्ता तयार करतो. असा ध्यास नव्याचा घेतलेल्यांची समाजाला आवश्यकता आहे. *बिल गेट्स यांनी नव्याचा ध्यास घेतला नसता तर? धीरूभाई अंबानींनी फक्त पेट्रोल पंपावरच नोकरी केली असती तर? धीरूभाईंनी नव्याचा असं घेतला नसता तर? रोजचं जगणं जेव्हा मोनोटोनस होतं तेव्हा आपल्याला नवं काही हवं असतं पण नवं काही हवं असतं तेव्हा आपण नवं काही निर्माण करण्याचा ध्यास घेतोका? *पूर्वीच्या काळी ट्रंक कॉल बुक करावा लागायचा आता काही सेकंदांत आपण जगातल्या एखाद्या व्यक्तीशी बोलू शकतो हे कशाने शक्य झालं? नव्याचा ध्यासामुळेचना? नव्याचा ध्यास फक्त काही व्यक्तींनीच घ्यावा असं काही नसतं. जोपर्यंत तुम्ही स्वतः नव्याचा ध्यास घेत नाहीत तोपर्यंत काहीच साध्य होणार नाही जरा हटके सोचो ना यार! हटके चा अर्थ वेगळा असला तरी नव्याने केलेला विचारही हटकेच असतोना? आपण काही गोष्टी गृहीत धरतो डॉक्टरच्या मुलाने डॉक्टरंच व्हावं असं. कदाचित त्या मुलाकडून नवीन असं काही वेगळं होऊ शकतंना. नक्कीच. मळलेल्या वाटेवरूनच वर्षानुवर्षे चालायचं, उगाच कशाला नव्याचा ध्यास घ्यायचा असा विचार करुन चालणार नाही. आई अशिक्षित असुनही तिचा मुलगा प्रथमश्रेणी अधिकारी झाला असेल तर ते नव्याचा ध्यास घेतल्याशिवाय का? *नव्याचा ध्यास म्हणजेच स्वतःला आजमावणं, वेगळा विचार आणि क्रुती करणं. मनन, चिंतन, आत्मपरिक्षण करणं. नव्याचा ध्यास आपल्याला खूssssप काही शिकवणारा, बुध्दीला आव्हान देणारा, स्वतःचा शोध घेणारा असणार आहे. आपली शारिरीक, मानसिक क्षमता वाढवणारा असणार आहे हे अगदी शंभर टक्के निश्चित.
लेखक-सुनील वनाजी राऊत,
कॉलेज कट्टा
Leave a Reply