Dhirubhai Ambani information Biography in Marathi Language प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी विषयी माहिती मराठी
प्रसिद्ध उद्योजक धीरूभाई अंबानी यांची रियल स्टोरी. स्वप्न मोठे पहाच पण प्रयत्न मोठे करा. वाचा.

उद्योगपती धीरूभाई अंबानी रियल स्टोरी जीवनी यांचे विचार
आपण सगळ्यांनी यांच्या विषयी एक गोष्ट ऐकलीच असेल की ३०० रुपयावर पेट्रोल पंपावर काम करणारा माणूस स्वप्न बघतो की एक दिवस मी पेट्रोल पंपाचा मालक होणार आणि ते स्वप्न सत्यात उतरवितो. “मोठे स्वप्न पहा कारण मोठे स्वप्न पाहणाऱ्यांचीच स्वप्ने खरी होतात” हे धीरूभाई अंबानी यांचे वाक्य. या वाक्यातुन आणि धीरूभाई अंबानी यांच्या उदाहरनातूनच आजचा युवक उद्योगपती होण्याच स्वप्न बघत आलाय आणि आजही बघतोय मला नाही वाटत शुन्यातुन सुरुवात करून आपलं साम्राज्य निर्माण करणाऱ्या दुसऱ्या कोणत्याच माणसाचे उदाहरण आजच्या युवकाला भेटेल. आपण फक्त म्हणतो. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली आहे का इतक्या मोठ्या उंचीवर जाण्याआधी धीरूभाई यांनी आपल्या वडीलांसोबत लहानपणी भजी आणि अजुन बारीक सारिक गोष्टी विकन्याच काम केल आहे तरी उदयोगपती होण्याच स्वप्न पाहणे सोडले नाही.
एक आकडा देतो धीरूभाई अंबानी हे असे व्यक्ति ज्यांनी ३०० रूपयाच्या पगारावर सुरुवात केली पण त्यांच्या शेवटच्या वेळी त्यांची संपत्ती ६२ हजार कोटींपेक्षा जास्त होती. यामध्ये त्यांचे समर्पण, परिश्रम आणि प्रामाणिकपणा यांचा मोठा वाटा होता हेच आजच्या तरुणांनी लक्षात घेतले पाहिजे तरच उद्योगात आपल्याला यश मिळू शकते हे लक्षात घेतले पाहिजे आपण. गरीब कुटूंबात जन्माला आलेल्या धिरूभाईंनी मोठा उद्योगपती होण्याचं स्वप्नं पाहिलं आणि आपल्या दृढसंकल्प आणि परिश्रमाच्या बळावर त्या स्वप्नाला सत्यात उतरवलं.
गुजरात मधील जुनागढ़ जवळ चोरवाड़ या छोटयाश्या गावी एका सामान्य शिक्षकाच्या घरात 28 डिसेंबर 1932 ला धिरूभाईंचा जन्म झाला. धिरूभाईंची आई जमनाबेन एक सामान्य गृहीणी होती तर वडिल गोवर्धनभाई अंबानी एक सामान्य शिक्षक होते. इतक्या मोठया कुटुंबाचे पालन पोषण करणे त्यांच्या करीता बरेच आव्हानात्मक होते. मिळणाऱ्या उत्पन्नातुन परिवाराचा घरखर्च सांभाळणेच त्यांच्या करता कठीण होते अश्यात चार बहिण-भावंडांमध्ये धिरूभाईंचे शिक्षण होणे फार कठिण होते. अश्या परिस्थीतीत धिरूभाई अंबानी यांना आपले शालेय शिक्षण अर्धवट सोडुन आपल्या कौटुंबिक जबाबदारीकरता वडिलांसमवेत भजे आणि इतर लहान-सहान गोश्टी विकण्याकरता धडपड करावी लागली.
कुटुंबाचा आधार होण्यासाठी त्यांनी सुरुवातीला फळे आणि नाष्टा विकन्याचा व्यवसाय सुरु केला पण त्यात त्यांना पाहिजे तेवढा फायदा झाला नाही. यातून आपण एक गोष्ट शिकली पाहिजे की त्यांनी बसून न राहता कोणतेही काम करण्याची कधीच लाज बाळगली नाही. आजचा तरुण धीरूभाई बनन्याच स्वप्न बघतो पण धीरुभाईंनी सुरुवातीला केलेली कामे करण्यास त्याला कमीपणा वाटतो. तुम्ही फक्त स्वप्न बघून मोठ नाही होउ शकत त्यासाठी कष्टाची जोड आसाविच लागते तरच माणूस धीरूभाई होतो.
Dhirubhai Ambani information Biography in Marathi Language
प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी विषयी माहिती मराठी
अनेक अपयशानंतर धीरूभाई अंबानींनी आपल्या मोठया भावाच्या मदतीने यमन येथे नोकरी करण्याचा निर्णय घेतला. शेल कंपनीच्या पेट्रोल पंपावर त्यांची नोकरी सुरू झाली जवळजवळ 2 वर्ष नोकरी केल्यानंतर आपल्या कार्यकुशलतेच्या आणि योग्यतेच्या जोरावर ते मॅनेजर पदापर्यंत पोहोचले. नोकरी करत असतांना देखील धिरूभाई नेहमी व्यवसायाच्या संधी शोधत राहायचे. अगदी सुरूवातीपासुनच ते व्यवसायाची कुठलीही संधी हातातुन गमावु इच्छित नव्हते. त्यांच्या याच ध्येयामुळेच ते जगातील सर्वात यशस्वी उद्योगपतींमधील एक ठरले. नोकरी करत असतानाही त्यांनी आपले उद्योजग होण्याच स्वप्न कधीच सोडले नाही. त्यांना मोठ व्हायची किती इच्छा होती यबाबतीत त्यांच्या जीवनातील एक किस्सा आहे तो सांगतो. शेल पेट्रोल पंपावर काम करत असताना ३०० रुपये मासिक पगार होता. तेथील कर्मचाऱ्यांना २५ पैस्यात चहा भेटायचा पण धीरुभाई हे महागडया होटल मध्ये जिथे १ रुपया मध्ये चहा भेटायचा तिथे चहा पियायला जायचे. कारण होते की या होटेल मध्ये मोठमोठे व्यवसायिक येत असत त्यांच्या गोष्टी धीरूभाई ऐकत असत व्यवसायातील बारकावे हे ऐकुनच धीरूभाई शिकले. या व्यतिरीक्त धिरूभाईंच्या आत एक यशस्वी उद्योजक होण्याचे गुण मोठया प्रमाणात अस्तित्वात होते याचा अंदाज यावरून देखील येऊ शकेल की धिरूभाई यमन येथे प्रचलित चांदीची नाणी लंडन येथील एका कंपनीत वितळवीत असत कारण त्यांच्या लक्षात आले होते की चांदीच्या नाण्यांपेक्षा मिळणाऱ्या चांदिचे मुल्य अधिक आहे.
धीरूभाई अंबानी ज्यासुमारास यमन येथे नोकरी करीत होते त्यावेळी यमनच्या स्वातंत्र्याकरता आंदोलनांनी पेट घेतला होता. परिस्थीती एवढी बिकट झाली होती की यमन येथे नोकरी करीत असलेल्या भारतियांना आपले काम सोडावे लागले. अश्यात धिरूभाईंना नौकरी सोडुन भारतात परतावे लागले. उद्योगपती होण्याचं स्वप्न उरी बाळगलेल्या धिरूभाईंनी त्यावेळी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पण कोणत्याही व्यवसायाची सुरूवात करण्याकरता चांगल्या भांडवलाची आवश्यकता होती आणि धिरूभाईंजवळ व्यवसाय सुरू करण्याकरता त्यावेळी पैश्यांची तरतुद नव्हती.पुढे त्यांनी आपला भाऊ त्र्यंबकलाल दामाणी यांच्या समवेत पाँलिस्टर धागे आणि मसाल्यांच्या आयात-निर्यातीचा व्यापार सुरू केला.
केवळ 15000 रूपयांमध्ये धिरूभाईंनी मस्जिद बंदरच्या नरसिम्हा स्ट्रीटवर रिलायंस कमर्शियल काँर्पोरेशन ची सुरूवात केली. आणि येथुनच रिलायंस कंपनीचा उदय झाला. त्यावेळी धीरूभाई अंबानी आणि त्यांचा परिवार भुलेश्वर येथील जय हिंद इस्टेट मधल्या एका लहानश्या अपार्टमेंटमध्ये राहात होते. सुरूवातीला धिरूभाई अंबानींची इच्छा पाँलिस्टर यार्न आयात करणे आणि मसाल्यांची निर्यात करणे ही होती.रिलायंस काँर्पोरेशन चे पहिले ऑफिस नर्सिनाथन स्ट्रीट येथे सुरू झाले होते. हे ऑफिस म्हणजे केवळ 350 स्क्वेअर फिटची एक लहान रूम होती ज्यात फक्त एक टेबल, 3 खुच्र्या होत्या. सुरूवातीला त्यांच्याजवळ केवळ दोन सहकर्मचारी होते जे त्यांच्या कामात त्यांना मदत करीत असत.
धीरूभाई अंबानी आणि चंपकलाल दमानी यांचा स्वभाव आणि व्यवसाय करण्याची पध्दत अगदीच भिन्न होते आणि यामुळेच धीरूभाई अंबानी यांनी 1965 ला चंपकलाल दमाणी यांच्या समवेतची आपली भागिदारी संपुश्टात आणली. आणि स्वबळावर स्वतःच्या व्यवसायाची सुरूवात केली. चंपकलाल दमाणींच्या व्यवसाय करण्याच्या पध्दतीत एक सावधानता आणि सतर्कता होती. सुत बनविण्याकरता जो कच्चा माल लागतो त्या व्यवसायात त्यांना अजिबात रूची नव्हती आणि या विपरीत धीरूभाई अंबानींना व्यवसायात जोखीम पत्करणारा व्यापारी म्हणुन ओळखले जायचे. पुढे धिरूभाईंनी सुत व्यवसायात उतरून सकारात्मक दिशेने पाऊलं उचलली.
हळुहळु कापड व्यवसायात धिरूभाईंचा चांगलाच जम बसु लागला होता. त्यात चांगल्या संधी मिळाल्याने 1966 च्या दरम्यान त्यांनी अहमदाबाद मधील नैरोड़ा येथे एका कापड मिलची स्थापना केली. याठिकाणी कापड बनवितांना पाँलिस्टर धाग्यांचा वापर होऊ लागला. या ब्रांड चे धिरूभाईंनी ‘विमल’ असे नामकरण केले.1975 मध्ये विश्व बॅंकेच्या टेक्नीशियन टिम ने रिलायंस टेक्सटाईल्स कंपनीचा निरीक्षण दौरा केला आणि विकसीत देशांच्या मानांकनापेक्षा देखील ही कंपनी चांगली असल्याचे सांगितले. 1980 च्या दशकात धीरूभाई अंबानींनी सरकारकडुन पाँलिस्टर फिलामेंट यार्न निर्मीतीचे लायसन मिळविले. पुढे धिरूभाई यशाची एकएक पायरी चढत गेले, आणि त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या व्यवसायात कधीही मागे वळुन पाहिले नाही.
आपल्या आयुष्यात धीरूभाईंनी रिलायंसचा विस्तार अनेक क्षेत्रामंध्ये केला. यात प्रामुख्याने पेट्रोरसायन, दूरसंचार, सूचना प्रौदयोगिकी, ऊर्जा, विज, कापड/टेक्सटाईल, मुलभुत सुविधा सेवा, शेअर मार्केट, आणि प्रचालन-तंत्र यांचा समावेश आहे. एका छोटया खोलीत सुरू झालेल्या रिलायंस कंपनीत आज जवळ जवळ २ लाख कर्मचारी कार्यरत आहेत.
महान उद्योगपती धीरूभाई अंबानींना 24 जुन 2002 ला हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रिच कॅंडी रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांनतर मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि 6 जुलै 2002 रोजी भारतातील या थोर व्यक्तिमत्वाने अखेरचा श्वास घेतला.
‘‘स्वप्नं कायम मोठी पहायला हवीत, समर्पणाला पर्याय नाही आणि प्रयत्न नेहमी महान असायला हवेत’’.
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर.
Dhirubhai Ambani information Biography in Marathi Language प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी विषयी माहिती मराठी मित्रांनो, ही महत्वपूर्ण माहिती कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. अशा पद्धतीची माहिती वाचण्यासाठी कॉलेज कट्टाला सबस्क्राईब करा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Dhirubhai Ambani information Biography in Marathi Language
प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी विषयी माहिती मराठी
उद्योगपती धीरूभाई अंबानी रियल स्टोरी जीवनी यांचे विचार
Dhirubhai Ambani Essay Speech in Marathi
प्रसिद्ध उद्योजक माहिती
5 Udyojak information in Marathi
Leave a Reply