संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज यांना पहिला संगणक बनवताना अनेक अपयश आले. त्यांचा प्रवास जाणून घ्या. Charles Babbage Information Biography in Marathi चार्ल्स बैबेज मराठी माहिती
आज या कोरोना च्या काळात आपण work form home ऐकत आलोय पण हे फक्त माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा पूरवणा-यांसाठीच ही सुविधा आहे. हे कशामुळे शक्य झाले कारण या कामासाठी लागणारे लॅपटॉप आणि कंप्यूटर्स घरी आहेत म्हणून त्यांचे सर्व काम त्यावर होते म्हणून. हे सर्व शक्य झाले कंप्यूटरच्या शोधामुळे त्यामध्ये आजपर्यंत क्रांती झाली आणि लॅपटॉप आणि बाकी सुविधा उपलब्ध झाल्या. पण याच कंप्यूटरचा शोध कोणी लावला माहीत आहे का ? तर त्यांच नाव चार्ल्स बैबेज. अर्थात तेव्हाच्या कंप्यूटर मध्ये आणि आत्ताच्या कंप्यूटर्स मध्ये जमीन असमानाचा फरक असणार हे आपण लक्षात घेतले पाहीजे तेव्हा कंप्यूटरचा उपयोग गणना करण्यासाठी आकडेमोड करण्यासाठी जास्त प्रमाणात होत होता हे लक्षात घेतले पाहिजे.
यांच्याबद्दलच आज आपण थोडी माहिती घेऊ.
चार्ल्स बॅबेज यांचे बालपण
Charles Babbage Information Biography in Marathiचार्ल्स बैबेज मराठी माहिती
चार्ल्स बॅबेज यांचा जन्म २६ डिसेंबर १७९१ मध्ये लंडन इंग्लैंड मध्ये झाला होता.
ती एकूण ४ भावंडे होती त्यातील २ लहानपणीच वारली आणि फक्त चार्ल्स आणि त्यांची बहिण मेरी हे दोघेच बचावले. चार्ल्स लहाणपणापासुनच जीज्ञासु वृत्तीचे होते. त्यांना एखादे खेळने जरी दिले तरी ते विचारत या खेळण्या मध्ये काय आहे ते कसे काम करते. त्यांना गणिताची प्रचंड आवड होती बीजगणित तर ते स्वतःच शिकले होते. चार्ल्स यांचा परिवार सधन परिवार होता त्यांचे सुरुवातीचे शिक्षण खासगी शिक्षकांकडूनच झाले होते.
१८१० मध्ये त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. इथे त्यांना शिकविणा-या गणिताच्या शिक्षकांपेक्षा चार्ल्स यांना जास्त गणिताची माहिती होती हे विशेष.
चार्ल्स बँबेज यांचा कॉम्पुटर बनवण्याचा प्रवास
चार्ल्स यांनी अॅनालिटिकल सोसायटीचे आयोजन करण्यास मदत केली.
- 1822 मध्ये चार्ल्स बॅबेजने डिफरेंशनल इंजिन नावाचे एक उपकरण तयार केले. या यंत्राने गणितीय आकडेमोड केली व त्याचे प्रदर्शन केले. गणिताच्या सिद्धांता नंतर त्याने याला “डिफरेंशियल इंजिन” म्हटले, त्यात एकूण 25000 धडे होते आणि त्याचे वजन 13600 किलो होते.
- सरकारला त्याच्या डिव्हाइसमध्ये रस होता आणि त्याने त्यांच्या संशोधनासाठी अर्थसहाय्य देण्याचे अस्पष्ट वचन दिले. यामुळे बॅबेजला फुल-स्केल मशीन तयार करण्यास प्रोत्साहित केले. हे काम सोपे आहे आणि लवकर केले जाईल असे बॅबेज यांना वाटले पण तसे नव्हते. इंजिनची चाके, गीअर्स आणि क्रॅन्क्स तयार करण्यासाठी बर्याच मशीन उपकरणाची कमतरता होती. म्हणून बॅबेज आणि त्यांच्या कारागिरांनी स्वतःच ती उपकरणे तयार करण्याचे ठरविले पण पैशाची कमतरता असल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला नाही आणि त्यांना तो बंद करावा लागला.
दरम्यान, बॅबेजच्या सुपिक डोक्यात दुसरे इंजिन बनविण्याची कल्पना आली आणि
- 1847 ते 1849 मध्ये चार्ल्स बॅबेगे यांनी पुन्हा “डिफरन्स इंजिन 2” नावाची मशीन तयार केली. परंतु परत तेच कारण निधिच्या कमतरतेमुळे त्यांचा हा प्रोजेक्ट देखील बंद पडला.
- डिफरन्स इंजिनच्या अपयशामुळे त्यांनी अजुन एक इंजिन बनवले आणि त्याला एनालिटिकल इंजिन असे नाव देण्यात आले. हे इंजिन पंच कार्ड ने पंच करू शकत होते आणि हाच जगतातील पहिला कंप्यूटर ठरला जो खुप मोठा होता जवळजवळ ३ मजली मोठ्या इमारती एवढा हा पहिला कंप्यूटर मोठा होता.
अशाप्रकारे जगतातील पहिला कंप्यूटर तयार झाला आणि आपण पाहू शकतो की आज बॅग मध्ये बसतील असे लॅपटॉप बाजारात आहेत यामध्ये किती सुधारना होत गेली हे आपल्याला कळतच आहे आणि आज कंप्यूटर फक्त आकडेमोड करणारे साधन बनून न राहता किती तरी महत्वाचे उपकरण झाले आहे. त्यामुळेच कंप्यूटरच्या शोधाने जगात क्रांती घडून आणली असे म्हटले जाते.
१८ ऑक्टोबर १८७१ रोजी विज्ञानाच्या या थोर शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला. त्यांच्या संगणकाच्या शोधासाठी चार्ल्स बॅबेज यांना हे जग नेहमीच लक्षात ठेवेल.
अक्षय जाधव
कडूस राजगुरुनगर
Charles Babbage Information Biography in Marathi
10 lines on father of computer in Marathi
चार्ल्स बैबेज मराठी माहिती
संगणकाचा शोध कोणी लावला
Leave a Reply