career margdarshan in marathi How to get into Harvard Business School from India हार्वर्ड यूनिवर्सिटी एडमिशन संधी
हार्वर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. परंतु काही विद्यार्थ्यांना असे वाटते की हे फक्त स्वप्नच आहे. हे स्वप्न आपण सत्यामध्ये उतरवू शकतो. कारण हार्वर्ड विद्यापिठाच्या एमबीए अभ्यासक्रमासाठी बुस्तानी फौंडेशनमार्फत हुशार आणि नेतृत्वगुणसंपन्न आंतरराष्ट्रीय अर्जदारांना दर दोन वर्षांनी शिष्यवृत्ती देण्यात येते.
जगातील विद्यापीठांच्या व्यवस्थापन विभागातील सर्वोत्कृष्ठ अशी ओळख असलेले अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कुल सर्वत्र प्रसिद्ध आहेच. आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्या पाच व्यवस्थापन विद्यापीठामध्ये येणारे आणि अमेरिकेतील पहिले क्रमांकाचे व्यवस्थापन विभाग म्हणून ओळखले जाणारे हार्वर्ड स्कुल . एमबीएसाठी याठिकाणी प्रवेश मिळवणे कित्येकांचे स्वप्न असते. त्याचे कारणसुद्धा तसेच आहे. त्या विद्यापीठामधील जागतिक स्तरावरील प्राध्यापक वर्ग, उद्योग व्यवस्थापनातील अद्ययावत तंत्राची इथल्या अभ्यासक्रमांना असलेली थेट जोड, सुट्ट्यांदरम्यान उद्योग सुरू करण्याचा मिळणारा प्रत्यक्ष अनुभव आणि त्यामधून मिळणारी औद्योगिक कौशल्ये, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मिळणारे सॉफ्ट स्किलचे मिळणारे प्रशिक्षण आदी गोष्टींमुळे विद्यापीठामध्ये शिक्षण घेणे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. बिझनेस स्कुलकडून पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासकर्मदेखील राबविले जातात. यामध्ये सर्वाधिक पसंती विद्यार्थ्यांकडून पसंती दिली जाते.
याच पदव्युत्तर अभासक्रमासाठी बुस्तानी फौंडेशनमार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. स्वित्झर्लंड आणि मोनँको येथे असलेल्या फौंडेशनची सुरुवात 2006 मध्ये झाली. हार्वर्ड विद्यापीठामधील पूर्णवेळ एमबीएचा कालावधी दोन वर्षांचा आहे. त्यामुळे या संस्थेमार्फत दिला जाणारा शिष्यवृत्तीचा काळावधीदेखील दोन वर्षांचा असतो. जो विद्यार्थी शिष्यवृत्ती घेतो त्याच्या पहिल्या वर्षीच्या संशोधनावर दुसऱ्या वर्षांचा शिष्यवृत्ती अवलंबून असते. या शिष्यवृत्ती मध्ये विद्यार्थ्याला एमबीए अभयसक्रमाचे वार्षिक 45,000 यूएस डॉलर्स शिक्षण शुल्क म्हणून दिले जाते. फौंडेशनमार्फत याव्यतिरिक्त विद्यार्थ्याला विमानप्रवास, निवास आणि मासिक वेतन या स्वरूपात मदत याद्वारे केली जाते. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर इतर कोणालाही हस्तांतरित करता येत नाही.
या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. Click here for Admission form या संकेत स्थळावर जमा करावा लागतो. अर्जासाहित विद्यार्थ्याने त्याचा सिव्ही, त्याचा फोटो , एस ओ पी, जी मॅट आणि टोफेल किंवा आय ई एलटीएस परीक्षांचे मार्कशीट, त्यांचे शैक्षणिक पर्शवभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्टसच्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी पाठवाव्यात.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक पर्शवभूमी, त्याचा विकास आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात घेऊनच विद्यार्थ्याची मुलाखतीसाठी निवड केली जाते. मुलाखतीतून विद्यार्थ्याची निवड करण्यात येते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जलदगतीने कळविले जाते. त्यानंतर आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची लवकरात लवकर पूर्तता करून घेतल्यावर विद्यार्थ्यास शिष्यवृत्तीचा फायदा जून महिन्यापासून मिळण्यास सुरुवात होते.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मे महिन्याच्या दरम्यान उपलब्ध असतात.
यासंदर्भातील अधिक माहितीसाठीया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
career margdarshan in marathi How to get into Harvard Business School from India. हार्वर्ड यूनिवर्सिटी एडमिशन रिक्वायरमेंट्स
-सागर गोरखे.
Leave a Reply