
Bhagwan Mahavir Jayanti information in Marathi वर्धमान महावीर जयंती माहिती मराठी
“उसको ना अंधा कहिए जो आँखो से बेनूर है। अंधा उसको जाने जो भगवान को समझ पाने से कोसों दूर है।”
जैन धर्माची सुरुवात बौद्ध साहित्य पासून झालेली दिसते. जैन धर्माचे पहिले तीर्थकर ऋषभ उर्फ आदिनाथ हे मानवी संस्कृतीचे निर्माते मानले जातात. त्यांनी शेती, लिखाण, शस्त्रविद्या असे उपजीविकेचे अनेक उद्योग शिकवले.जेणेकरून माणूस कर्माला देव मानून भक्ती व संन्यासी वृत्तीच्या मार्गाला लागेल. तीर्थंकर रिषभांना नमी व विनमी असे दोन नातू होते. विनमीला मातंग नावाचा मुलगा होता. ज्याच्यापासून मातंग वंशाची सुरुवात झाली. या समाजाला अनेक विद्या कौशल्य अवगत असल्यामुळे त्यांना पुढे विद्याधर म्हणले जाऊ लागले. अशा या धर्माचा फार प्राचीन इतिहास आहे.हाच इतिहासात अहिंसेचे मूर्तीमंत प्रतीक भगवान महावीर हे चोविसावे तीर्थंकर म्हणून होऊन गेले.
Bhagwan Mahavir Jayanti information in Marathi वर्धमान महावीर जयंती माहिती मराठी
जन्म व जीवन परिचय:- महावीर यांचा जन्म वैशाली राज्याच्या कुंडलपुर येथे इसवी सन पूर्व ५९९ मध्ये झाला.(आताच्या बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात पूर्वीचे वैशाली नामक गाव आहे) महावीरांचा जन्म त्रिशला नामक स्त्रीच्या पोटी झाला. त्यांचे नाव वर्धमान असे ठेवण्यात आले.त्यांचे वडील सिद्धार्थ राजघराण्यातील असल्यामुळे त्यांचे बालपण राजवाड्यात गेले. यांच्या भावाचे नाव नंदिवर्धन व बहिणीचे नाव सुदर्शना असे होते. ते आठ वर्षाचे असताना त्यांचे शिक्षण सुरू झाले.व 28 वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला.महावीरांचे कुटुंबीय जैनांचे तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते.श्वेतांबर पंथाच्या म्हणण्यानुसार भगवान वर्धमान यांचा यशोदाशी विवाह झालेला होता.परंतु दिगंबर पण थानुस आर भगवान वर्धमान नी ब्रह्मचर्य ह्या त्यांच्या तत्वाचे जीवनभर पालन केले.
ज्ञान प्राप्ती:- भगवान महावीरांनी तिसाव्या वर्षी श्रामणी दीक्षा घेऊन बारा वर्षापर्यंत मौन पाळले. ज्यामधून त्यांना केवलज्ञानाची प्राप्ती झाली.महावीरांनी जनकल्याणासाठी समाजोपयोगी उपदेश देण्यासाठी त्या काळी लोकांमध्ये प्रचलित अशी अर्धमागधी भाषा हिचा वापर केला. जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांची चार तत्वे अहिंसा, अस्तेय, सत्य, अपरिग्रह यामध्ये महावीराने ब्रह्मचर्य हे तत्व विलीन केले व त्याचे आचरण केले. प्रेम, त्याग संयम ,करुणा,शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार आहे. समता हेच जीवनाचे लक्ष्य समजून त्यांनी चतुर्विध संघाची स्थापना केली.
“एखाद्या वस्तूचे अनेक पैलू असतात. पूर्ण ज्ञान फक्त कैवल्य प्राप्तीमुळेच शक्य होते.”हा अनेकांत वादाचा सिद्धांत महावीरांनी केवलज्ञान प्राप्तीनंतर सांगितला. महावीरांनी कैवल्य प्राप्तीची तीन तत्त्वे सांगितली.
१. सम्यक् दर्शन:-हे कुटील वृत्ती पासून मुक्त होण्याचे साधन आहे. कुप्रवृत्तीमुळे वाढलेले भय इथे कमी होऊन व्यक्तीचा आत्मविश्वास दाट होतो.
२. सम्यक् ज्ञान:- भौतिक जीवनातून मुक्ती प्राप्त करण्याच्या मार्गात सम्यक ज्ञान महत्त्वाचे ठरते.भौतिक धर्म जेव्हा व्यक्तीच्या दैनंदिन सवयीत रूपांतरित होतात तेव्हा त्यांची निर्मिती बंधनात होते.
३. सम्यक् चरित्र:- व्यक्तीला सदाचरण आणि सद्गुणांचे दर्शन घडवते. अंतर्मनात सद्गुणांचा भाव निर्माण करते.
मृत्यू व श्रद्धा:- भगवान महावीरांचा मृत्यू इसवी सन पूर्व ५२७ मध्ये बिहार येथील पावापुरी येथे झाला. त्यांचे ७२व्या वर्षी निर्माण झाले. भगवान महावीरांना धर्माचा प्रसार करताना अनेक कष्ट आले. सर्व वस्त्रांचा त्याग त्यांच्या संसारिक सुखांपासुनची विरक्ती दर्शवते. त्यांच्या मृत्यूचा दिवस हा कार्तिक कृष्ण अमावस्येचा होता. महावीरांच्या निर्वाणा दिवशी घराघरात दिवे प्रज्वलित करण्याची मान्यता आहे. संत महावीर यांनी जैन धर्माचा प्रसार करून त्याची महती पवित्रता सर्वदूर पसरवली.६ एप्रिल २०२० तारखेला महावीर जयंती आली आहे. या दिवशी सर्वांनी महावीरांचे तत्व आचरणात आणण्याचा संकल्प धरण्यास हरकत नाही.
– गौरी डांगे.
मित्रांनो, Bhagwan Mahavir Jayanti information in Marathi Bhagwan Mahavir Essay in Marathi वर्धमान महावीर जयंती माहिती मराठी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Leave a Reply