अहो तुम्हाला राजकारण समजलेच नाही! आजचे पाताळयंत्री, स्वतःचा स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारे राजकारणी यांचासाठी अटल बिहारी वाजपेयी ही एक चपराक होती. राजकारण हे किती सरळ साधे असू शकते हे अटलजींनी जगाला दाखऊन दिले. अशा अटलबिहारी वाजपेयी बद्दल माहिती. Atal Bihari Vajpayee Information Biography History in Marathi language
Atal Bihari Vajpayee Information Biography History in Marathi language
Atal Bihari Vajpayee Essay Nibandh Speech In Marathi Language
अटलजींचा लोकशाहीवर पूर्ण पणे विश्वास होता. त्यांचे राजकारण हे देशहितकारी, लोकहितवादी होते म्हणूनच तर त्यांचा कोणी विरोधी, प्रतीस्पर्धी नव्हताच त्यांनी सर्वांना बरोबर घेऊनच राजकारण केले.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे तीन वेळा पंतप्रधान झाले.
टुटें हुए सपनें कि सुने कौण सिसकी? अंतर को चिर व्यथा पलकों पर ठिठकी।
हार नहीं मानुंगा। रार नई ठानुंगा। काल के कपाल पर लिखता-मिटाता हूँ ।गित नए गाता हूँ।
अटल बिहारी वाजपेयींनी लिहिलेली ही कविता.
या कवितेतूनच अटलजींचे वयक्तिमत्व समजायला सुरुवात होते आपल्याला! भारतमातेला लाभलेला एकमेव “कवी मनाचा” पंतप्रधान! अत्यंत सुसंस्कृत, शांत, प्रसंगी तितकाच कठोर. राजकारणातील “भीष्म पितामह”, भारताला लाभलेला “सर्वोत्कृष्ट संसदपटू”, लोकशाही म्हणजे काय हे सगळ्यांना आपल्या आचरणातून ज्यांनी दाखवून दिले ते अटल बिहारी वाजपेयी.
पक्षीय राजकारण बाजूला सारून सर्वप्रथम “देश” असं बोलणारा द्रष्टा राजकारणी. डोक्याने राजकारणी आणि मनाने कवी असणारा हा माणूस.
Atal Bihari Vajpayee Information Biography History in Marathi language
अटलबिहारी वाजपेयी यांचे बालपण
अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंम्बर 1924 ला ग्वालियार मध्यप्रदेश मध्ये झाला.
त्यांच्या पित्याचे नाव पंडित कृष्णबिहारी वाजपेयी होते तर आईचे नाव कृष्णादेवी वाजपेयी होते.
त्यांना 3 मोठे भाऊ आणि 3 बहिणी होत्या. अटलजी सर्वात लहान होते. अटलजींचे वडील शाळेत शिक्षक होते तसेच ते कवी देखील होते त्यामुळेच अटलजींना कवितेची आवड निर्माण झाली. अटलजींनी पहिली कविता 15 वर्ष वयाचे असताना लिहिली होती तेव्हा ते इयत्ता नववीत शिकत होते.
अटलजींना वाचनाची आवड होती. महात्मा रामचंद्र वीर यांनी लिहिलेली “विजय पताका” वाचल्यानंतर तर अटलजींचे पूर्ण जीवनच बदलून गेले.
अटलजींनी त्यांचे पहिले भाषण दिले तेव्हा इयत्ता पाचवीत शिकत होते. त्यांनतर अटलजींनी ग्वालियार कॉलेजमध्ये असताना पाठ केलेले भाषण दिले पण ते मधेच विसरले तेव्हा लोकांनी त्यांची आलोचना केली होती. तेव्हा पासून अटलजींनी ठरवल की ते कधीच पाठ केलेलं भाषण नाही देणार म्हणून!
अटलजींनी ग्वालियार च्या व्हिक्टोरिया कॉलेज मधून बी.ए.च शिक्षण पूर्ण केलं. एकदा कॉलेजकडून त्यांना वादविवाद प्रतियोगीतेमध्ये भाग घेण्यासाठी इलहाबादला पाठवले पण ते उशिरा पोहचले पण जेव्हा अटलजींनी भाषण दिले तेव्हा पूर्ण सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दणाणून गेले त्यात अटलजींना पहिले पारितोषिक भेटले.
बी. ए. झाल्यांनातर 1945 मध्ये अटलजींपुढं प्रश्न उभा राहिला पुढचं शिक्षण कस करायचं तेव्हा ग्वालियरचे महाराज जिवाजीराव सिंधिया यांनी प्रत्येक महिन्याला 75 रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अटलजींचे शिक्षण चालू राहिले. पुढे त्यांनी कानपुरच्या DAV कॉलेज मधून त्यांनी POLITICAL SCIENCE मध्ये MA ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या सोबतच वकिलीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली.
विद्यार्थी दशेत असतानाच अटलजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 1939 मध्ये स्वयंसेवक बनले. 1940-44 दरम्यान अटलजी संघाचे प्रचारक बनले. त्यांनी 1942 च्या “भारत छोडो” आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यांची भाषणे युवकांमध्ये लोकप्रिय होत होती. त्यांना अटकही झाली पण त्यांना आग्र्याच्या बालसुधार गृहात पाठवलं 24 दिवसांसाठी. काही कारणांमुळे वकिलीचे शिक्षण अर्धवटच राहिले. संघासाठी काम करताना त्यांचा संबंध पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्याशी त्यांचा संबध आला. त्यांच्यासोबतच काम करताना अटलजींनी “राष्ट्रधर्म, पांचजन्य, वीर अर्जुन” यांसारख्या पत्रिकांचे संपादक अटलजी झाले.
सक्रीय राजकारणातील सहभाग
शाम प्रसाद मुखर्जींच्या नेतृत्वाखाली ते 1951 मध्ये जनसंघमध्ये सामील झाले आणि येथूनच त्यांच्या राजकीय जीवनाला प्रारंभ झाला. 1955 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली पण लोकांची साथ नाही लाभली आणि वाजपेयी पराभूत झाले पण वाजपेयी फक्त निवडणूक हरले होते हिम्मत नाही! हिम्मत तर जशी काय दुप्पट झाली होती.
1957 मध्ये गोंडा मधून निवडणूक जिंकून ते संसदेत पहिल्यांदा गेले. दीनदयाल उपाध्याय यांच्या मृत्यूनंतर 1968 मध्ये ते जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.
इंदिराजींच्या कणखर नेतृत्वाचे वर्णन करताना अटलजी संसदेत त्यांना दुर्गाचा अवतार आहेत असं संबोधलं होतं. यावरून अस दिसून येते की हा माणूस विरोधकांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करत होता त्याच्यासाठी देश महत्वाचा होता.
पुढे 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात वाजपेयींना अटकही झाली. त्यांनतर 1977 मध्ये जनता पार्टीचा विजय झाला आणि मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. त्या सरकार मध्ये अटलजी परराष्ट्र मंत्री होते.
1977 मध्ये UNITED NATIONS च्या सभागृहात वाजपेयींनी हिंदीमधून भाषण दिले. “मै भारत की जनता की ओर से राष्ट्रसंघ के लिये शुभकामनवो का संदेश लाया हूँ।” अशी त्यांचा भाषणाची सुरवात होती. भारतीय संस्कृतीची “वसुधैव कुटुंबकम” ही संकल्पना त्यांनी त्या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यक्रमात मांडली. असे करणारे ते पहिले भारतीय होते. संपूर्ण भारतात आणि जगात अटलजींचे कौतुक झाले. यावरून अटलजींचे आपल्या मातृभाषेवरील प्रेम दिसून येते. अटलजी इतके लोकप्रिय झाले होते की नेहरूंनी देखील भविष्यवाणी केली होती की वाजपेयी एक दिवस भारताचे पंतप्रधान होतील.
1979 मध्ये जनता पार्टी चे सरकार कोसळले. त्यांनतर 1980 मध्ये जनसंघाचे कार्यकर्ते एकत्र येऊन “भारतीय जनता पार्टी” ची स्थापना केली आणि अटलजी त्या पार्टी चे प्रथम राष्ट्रीय अध्यक्ष झाले. अटलजींमुळेच पार्टीचे चिन्ह कमळ घेतले. त्यांचे आवडते फुल कमळ होते. ते बोलायचे, “अंधेरा हटेगा बादल झटगा और कमळ खिलेंगा।” परंतु त्यांच्या पहिल्या निवडणुकीत भाजपला फक्त 2 जागांवरच समाधान मानावे लागले.
1986 साली अटलजींनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला. 1986 साली लालकृष्ण आडवाणी अध्यक्ष झाले 1990 च्या दशकात राम जन्मभूमीचा मुद्दा देशात गाजत होता. त्या काळातच अडवाणींनी रथयात्रा काढली होती. पुढे 1994 साली झालेल्या कर्नाटक आणि त्यानंतर 1995 साली झालेल्या महाराष्ट्र आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला.
नव्वदच्या दशकात 1993- 96 तत्कालीन कॉंग्रेस सरकारचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना इराण इथं भरलेल्या मुस्लिम परिषदेसाठी भारताचं शिष्टमंडळ पाठवायचं होतं. या शिष्टमंडळाचं नेतृत्त्व नरसिंहरावांनी कोणाकडं सोपवलं तर अटलबिहारी वाजपेयींकडं! विरोधी पक्षात असलेल्या अटलजींनीही शिष्टमंडळाचं नेतृत्त्व स्विकारलं. तिथं पाकिस्तानचं शिष्टमंडळ होतंच. आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मिर मुद्दा काढण्याची संधी त्यांनी सोडायची नाही. हे पाकिस्तानचं धोरण होतं, त्याला अनुसरुन या शिष्टमंडळानं त्या परिषदेत म्हटलं की, “काश्मिर के बिना पाकिस्तान अधुरा है।” अटलजींनी देखील त्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं, “आप कहते है काश्मिर के बिना पाकिस्तान अधुरा है। लेकीन हम मानते है की पाकिस्तान के बिना हिंदुस्थान अधुरा है।”
Atal Bihari Vajpayee Information Biography History in Marathi language
अटल बिहारी वाजपेयी यांचा विषयी माहिती निबंध भाषण कार्य मराठी
नोव्हेंबर 1995 साली मुंबई मध्ये भाजपच्या झालेल्या कार्यक्रत आडवांनीनी जाहीर केली की मे 1996 च्या निवडणुकीत भाजपा विजयी झाल्यावर अटलजी पंतप्रधान होतील. मे 1996 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप मोठी पार्टी ठरली राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी अटलजींना सरकार बनवण्यासाठी आमंत्रित केले तेव्हा अटलजी भारताचे 10वे पंतप्रधान बनले पण हे सरकार फक्त 13 दिवस टिकले. संसदेत भाषण देत असतानाच अटलजींनी जाहीर केले की ते राजीनामा देणार आहेत.
त्यांनतर 1998 मध्ये झालेल्या निवडणुकीत परत भाजप मोठी पार्टी ठरली तेव्हा त्यांनी 13 पार्टी सोबत घेऊन NDA ची स्थापना केली आणि अटलजी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले पण हे सरकार देखील 13 महिनेच टिकले. एका मताने 17 एप्रिल 1999 रोजी अटलजींच्या सरकार विरोधात अविश्वास ठराव संमत झाला.
या सरकारच्या काळातच मे 1998 मध्ये भारताने राजस्थानात पोखरण मध्ये 5 underground nuclear test केल्या आणि जगाला दाखवून दिले की आम्ही पण अणुऊर्जा समृद्ध आहोत अमिरीकेचा विरोध मोडून काढत भारत सैन्याने आणि शास्रज्ञानीन ह्या चाचण्या यशस्वी केल्या. भारताच्या इतिहासात ह्या चाचण्या “पोखरण 2” म्हणून ओळखल्या जातात. त्यांनतर 2 आठवड्यांनी पाकिस्तानने पण अनु चाचण्या करून भारताला डीवचण्याचं काम केलं.
1998 च्या शेवटी आणि 1999 च्या सुरुवातीला अटलजींनी पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. 1999 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयींनी 19-20 फेब्रुवारीला दोन दिवसांचा पाकिस्तान दौरा केला होता. त्याचवेळी त्यांनी दिल्ली-लाहोर बससेवाही चालू केली. किंबहुना याच बसचे पहिले प्रवासी म्हणून वाजपेयींनी वाघा सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला होता. त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ तिथं उपस्थित होते. वाजपेयींनी पाकिस्तान दौऱ्यावर जाताना बसमध्ये 22 पक्षांचे प्रतिनिधी घेतले होते. शिवाय पाकिस्तानात जन्मलेले ज्येष्ठ अभिनेते देव आनंद तसंच जावेद अख्तर यासारखी कला-साहित्य क्षेत्रातली मंडळीही सोबत घेतली होती. या बसनं फाळणीच्यावेळी बिछडलेल्या अनेकांना एकत्र आणलं.
दोन्ही देशातली एकमेकांपासून तुटलेली नाती पुन्हा जुळण्यास मदत झाली. वाजपेयींच्या या निर्णयानं सकारात्मकतेनं वेगळंच वारं वाहू लागलं. पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री मोहम्मद हुसैन यांनी वाजपेयींच्या धाडसाचं खुलेपणानं कौतुक करताना म्हटलं, की आजच्या कठीण परिस्थितीत या पद्धतीनं पाकिस्तानला भेट देण्याचं धैर्य वाजपेयीच दाखवु जाणोत. खास करुन कराची, लाहोर आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांतात वाजपेयींची लोकप्रियता ‘सातवे आसमॉं’ वर जाऊन पोहोचली होती. वाजपेयींबद्दल पाकिस्तानी लोकांमध्ये निर्माण झालेलं प्रेम पाहून अचंबित झालेले पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ म्हणाले, “अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानातसुद्धा निवडणूक जिंकू शकतात.”
अर्थात त्या नंतर काही दिवसातच ‘कारगील’ घडलं होतं. भारत-पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांमध्ये सौहार्दाचं नातं निर्माण होतं आहे. पाकिस्तानी जनतेमधली भारताबद्दलची कटुता कमी होण्याची शक्यता आहे. हे पाहून दुखावलेल्या पाकिस्तानी लष्करानं भारताच्या पाठीत सुरा खुपसला होता. पाकिस्तानातली लोकशाही दिखावू आहे, वास्तवात ती लष्कराच्या मुठीत आहे, याची पक्की जाणीव वाजपेयींना होती. म्हणूनच त्या परिस्थितीतही त्यांनी ‘लाहोर बस’ बंद केली नाही. एकीकडं ‘कारगील’ लढवत असतानाही राजकीय टीकेची पर्वा न करता बस सेवा चालू ठेवण्याचा निर्णय त्यांच्या कवी मनावर मात करणाऱ्या त्यांच्यातल्या निडर नेत्याची साक्ष देणारा होता. सन 2001 मध्ये संसदेवरच जेव्हा हल्ला झाला तेव्हा मात्र वाजपेयींनी दिल्ली-लाहोर बस सेवेला लाल झेंडा दाखवला. जुलै 2003 मध्ये पुन्हा ती चालू केली. एवढंच नव्हे तर सार्क परिषदेवरुन येताना 2004 च्या जानेवारीत त्यांनी इस्लामाबादलाही पुन्हा भेट दिली. कारण त्यांचं म्हणणं होतं, “आप मित्र तो बदल सकते हैं, लेकिन पड़ोसी नहीं।”
Atal Bihari Vajpayee Poems in Marathi
“भारत-पाकिस्तान पड़ोसी, साथ-साथ रहना है।
प्यार करें या वार करें, दोनों को ही सहना है।
तीन बार लड़ चुके लड़ाई, कितना महँगा सौदा,
रूसी बम हो या अमेरिकी, खून एक बहना है।
जो हम पर गुजरी, बच्चों के संग न होने देंगे। जंग न होने देंगे।”
या कवितेचा माध्यमातून अटलबिहारी वाजपेयीखूप काही सांगून जातात. पाकिस्तान हे आपलं कधीही न बदलू शकणारं प्राक्तन आहे. हा देश लष्कराच्या इच्छेवर चालतो. पाकिस्तानात लोकांनी चालवलेली खरी लोकशाही जोवर नांदत नाही तोवर या देशाबरोबरचे भारताचे संबंध सुरळीत होऊ शकत नाहीत. पण प्रयत्न तर सोडता येणारच नाहीत.
याचाच भाग म्हणून भारत आणि पाकिस्तान या दोन्हीकडच्या जनतेचा जीव की प्राण असणाऱ्या क्रिकेटला चालना देण्याचा प्रयत्न वाजपेयींनी केला. थेट चौदा वर्षांच्या खंडानंतर भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदाच पाकिस्तानच्या दौऱ्यावर निघाला. साल होतं 2004. सौरव गांगुली भारताचा कर्णधार होता. यावेळी वाजपेयींनी भारतीय संघाला शुभेच्छा काय दिल्या ?
“खेल ही नही, दिल भी जितीए!” गांगुलीच्या संघानं नेमकं तेच केलं. पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानच्या संघाला चारीमुंड्या चित केलं. पाकिस्तानी स्टेडियममधून तिरंगा फडकवला गेला. भारतानं वनडे मालिका 3-2 ने आणि टेस्ट मालिका 2-1 अशी खिशात घातली. मुलतानच्या पहिल्याच टेस्टमध्ये विरेंद्र सेहवागनं 309 धावांची स्फोटक खेळी खेळली होती. 6 उत्तुंग षटकार आणि 39 खणखणीत चौकारांनी सजवलेल्या या दणकेबाज त्रिशतकामुळं विरुला ‘मुलतान का सुलतान’ अशी उपाधी मिळाली होती. याच सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिननं नाबाद 194 धावा चोपल्या होत्या. दोघांच्या या स्फोटक खेळीमुळं पहिलीच कसोटी भारतानं एक डाव आणि 52 धावांनी जिंकली होती. विरु, सचिन, राहुल, सौरव, लक्ष्मीपती बालाजी, युवराज, इरफान पठाण आदी भारतीय खेळाडुंनी पाकिस्तानी चाहत्यांमध्ये तुफान लोकप्रियता मिळवली. अगदी वाजपेयींना हवं तसंच घडलं. भारतीय संघानं क्रिकेटचं मैदानही मारलं आणि पाकिस्तानी चाहत्यांचं प्रेमही मिळवलं.
तो पाकिस्तानचा दौरा खेळलेल्या प्रत्येक भारतीय खेळाडूसाठी अविस्मरणीय ठरला. जाईल तिथं त्यांचं देवासारखं स्वागत झालं होतं. माझ्यासारखे सीमेच्या या आणि त्या बाजुचे लक्षावधी क्रिकेटप्रेमीही तो दौरा कधीच विसरु शकणार नाहीत. केवळ अटलबिहारींमुळं तो दौरा झाला होता. खरंच त्यावेळी ते पाकिस्तानातून कुठूनही निवडून आले असते…नवाझ शरीफ म्हणाले त्या प्रमाणं.
Atal Bihari Vajpayee Essay Nibandh Speech In Marathi Language
अटल बिहारी वाजपेयी यांचा विषयी माहिती निबंध भाषण कार्य मराठी
कारगिल विजयानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाला. 543 पैकी 303 जागांवर NDA चे उमेदवार निवडून आले.
आणि अटलजी भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले.
ह्या वेळेला त्यांनी पूर्ण 5 वर्ष राज्यकारभार केला.आणि पूर्ण 5 वर्ष सरकार चालवणारे ते बिरग काँग्रेसी पाहिले पंतप्रधान ठरले. त्यांनी 1999-2004 पर्यंत सरकार चालवले. डिसेंबर 1999 मध्ये अतिरेक्क्यांनी INDIAN AIRLINES flight IC 814 ताब्यात घेतले आणि त्याबदल्यात अतिरेक्यांना सोडायची मागणी केली. प्रवाशांच्या बदल्यात भारत सरकारने काही अतिरेकी सोडून दिले.
मार्च 2000 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष “BILL CLINTON” भारत भेटीला आले. 1978 नंतर म्हणजे तब्बल 22 वर्षांनंतर पहिल्यांदाच अमिरीकेचे राष्ट्राध्यक्ष भरतभेटीला आले होते. या काळात वाजपेयी सरकारने दळणवळनावर भर दिला. देशातले तब्बल निम्मे महामार्ग ह्याच काळात बनवले गेले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यासारख्या योजना राबवल्या गेल्या. 2001 मध्ये वाजपेयी सरकारने सर्व शिक्षा अभियान सुरू केले.
2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलीमध्ये खूप मोठी हानी झाली. तब्बल 1000 पेक्षा जास्त लोक मारले गेले. तेव्हा वाजपेयींनी गुजरात चे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना “राजधर्माचे” पालन करा असा उपदेश दिला पण सरकार दंगली रोखण्यात अपयशी ठरले. राष्ट्रपती K.R.NARAYANAN यांनीही वाजपेयी सरकार दंगली रोखण्यात अपयशी झाले म्हणून सरकारला दोश दिला.
2002-03 च्या काळात भारतीय अर्थव्यवस्था भरारी घेत होती परंतु 2004 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. वाजपेयींनी राजीनामा दिला आणि मनमोहन सिंगांचं सरकार स्थापण झाले.
वाजपेयींनी विरोधी पक्षनेते पद पण नाकारले आणि आडवाणी विरोधी पक्षनेते पदी विराजमान झाले. डिसेंबर 2005 मध्ये त्यांनी आपण सक्रिय राजकारणातून सन्यास घेत आहोत अशी घोषणा केली. राज्यसभेत भाषण देताना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अटलजींचा उल्लेख “राजकारणातले भीष्म पितामह” असा केला होता.
6 फेब्रुवारी 2009 मध्ये त्यांना छातीत दुखू लागल्यानं मुंबईतील AIIMS रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अस्वथ्यामुळे अटलजींनी 2009 च्या लोकसभेच्या प्रचारात भाग नाही घेतला. वाजपेयी आजीवन अविवाहित राहिले. त्यांनी त्यांची मैत्रीण राजकुमारी कौल यांची मुलगी नमिता इला दत्तक घेतले. अटलजींना कुत्र्यांविषयी विशेष प्रेम होते. त्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडायचे.
“मेरी 51 कविताये” हा त्यांचा कविता संग्रह देखील प्रसिद्ध आहे. अटलजींच्या कविता तरुणांना स्फुरण चढवीत असत त्यांच्यात लढायचे सामर्थ्य जागवीत असत.
अटलजींना त्यांच्या कारकिर्दीत जवळजवळ सगळे पुरस्कार मिळाले त्यामध्ये
- 1992 साली पद्मविभूषण
- 1993 साली D.LIT पदवी कानपुर विद्यापीठाकडून.
- 1994 साली लोकमान्य टिळक पुरस्कार.
- 1994 साली उत्कृष्ट संसदपटू.
- 1994 साली भारतरत्न पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार.
- 2015 साली भारतरत्न.
- 2015 साली “Blangladesh Liberation War Honour”
असे पुरस्कार मिळाले.
वाजपेयी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सामाजिक जीवनापासून दूर गेले. आपल्या भाषणाने ज्यांनी देशाला वेड लावले त्याच वाजपेयींना त्यांच्या शेवटच्या काळात बोलता येत नवते. वाजपेयींच्या शेवटच्या काळात त्यांचे संगोपन त्यांची मुलगी नमिता भट्टाचार्य यांनीच केले. अखेर 16 ऑगस्ट 2018 वयाच्या 93 व्या वर्षी भारतमातेच्या या देशभक्ताने आपले प्राण सोडले.
भारतीय राजकारणात अटलजींच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झालीय ती भरून काढणं अशक्य आहे.
जेव्हा 1999 मध्ये शरद पवार विरोधी पक्षनेते होते. तेव्हा अविश्वासाच्या ठरावावर भाषण दिल्यानंतर
त्या दिवशी संध्याकाळी अटलजींनी पवारांना फोन केला आणि बोलले आज चांगले आणि अभ्यासपूर्ण बोललात. 2002 च्या गुजरात भूकंपाच्या दरम्यान सुद्धा शरद पवारांना लातूरमध्ये झालेल्या भूकंपाची माहिती आणि नियोजन कस करायचं याची माहिती होती त्यामुळे अटलजींनी त्यांना गुजरात मध्ये पाठवले. त्यांनी देश सर्वप्रथम मनाला म्हणून तर विरोधक पण अटलजींविषयी कधी वाईट बोलत नसत.
“सरकारे तो आती जाती रहेंगी पार्टीया भी आती जाती रहेंगी पर मेरा देश रहेगा”
असे बोलणारे अटलजी होते.
देशाच्या राजकारणात अटलजींचे स्थान हिमालयासारख आहे. जे कधीच कमी नाही होऊ शकत.
अटलजींची म्र्युत्यू वर एक कविता आहे
Atal Bihari Vajpayee Poems in Marathi
“मौत से ठण गई”
जुझने का मेरा कोई इरादा न था। मोड पर मिलेंगे इसका वादा न था।
रास्ता रोक कर खड़ी हो गई। ए लगा जिंदगी से बड़ी हो गई।
मौत की उम्र क्या है? दो पल भी नहीं।
जिंदगी सिलसिला आज़ कल कि नहीं।
मैं जी भर जियां मैं मन से मरूं।
लौट के आऊंगा, में कुछ से क्यों डरूं?
तु दबें पांव चोरी छुपे न आन, सामने वार कर फिर मुझे आजमा।
जिंदगी का सफर मौत से बेखबर, शाम हर सुरमई रात बनारसी का स्वर।
बात ऐसी नहीं के कोई ग़म ही नहीं, दर्द अपने पराए कुछ कम भी नहीं।
प्यार इतना परायो से मुझको मिला, न अपनों से बाकी है कोई गिला।
हर चुनौती से दो हाथ मैंने किए, आंधियों में जलाए हैं बुझते दिए।
रास्ता रोक कर खड़ी हो ए, ए लगा जिंदगी से बड़ी हो गई।
शेवटी एवढंच बोलावं वाटतं. प्रत्येकाला मृत्यु अटल आहे पण अटलजी अमर झाले! अटल बिहारी वाजपेयींना शत शत नमन!
-अक्षय जाधव.
कडूस आगरमाथा.
मित्रहो, याप्रकारची माहिती वाचण्यासाठी आपल्या आवडत्या College Catta संकेतस्थळाला पुन्हा भेट द्या.
Atal Bihari Vajpayee Information Biography History in Marathi language . Atal Bihari Vajpayee Essay Nibandh Speech In Marathi Language. अटल बिहारी वाजपेयी यांचा विषयी माहिती निबंध भाषण कार्य मराठी.
ही माहिती कशी वाटली हे खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा.
College Catta म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Nice