अमेझॉन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष जेफ बेजोस यांचे प्रेरणादायी जीवन चरित्र माहिती. जेफ बेजोस यांचाकडे भविष्याचा वेध घेण्याची अफाट शक्ती आहे. अमेझॉन सारख्या कंपनीची, त्या काळात स्वप्नवत वाटणारी संकल्पना त्यांनी यशस्वीरित्या सत्यात उतरून दाखवली. Amazon Founder Jeff Bezos Information Biography in Marathi language
Amazon Founder Jeff Bezos Information Biography in Marathi language
फोर्ब्सची अब्जावधींशांची यादी, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती यादी 6 मार्च 2018 अहवाल प्रकाशित झाला. या यादिमध्ये केलेल्या नाविव विक्रमाने सर्वजन आच्छर्यचकित झाले. जेफ बेजोस यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आले असून, ते सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 2018 फोर्ब्सचा यादीनुसार जेफ बेजोस यांची एकून संपत्ती 150 अब्ज डॉलर्स एवढी आहे. मागील तीन दशकांत हे रेकॉर्ड सर्वप्रथमच नोंदवले गेले. 150 अब्ज डॉलरचा टप्पा प्रथमच नोदावला गेला. 2017 साली 84.5 अब्ज डॉलर एवढ्या संपत्तीने बिल गेट्स सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होते. 1982 पासून आजपर्यंतच्या काळातील बेजोस हे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
जेफ बेजोस यांचे जीवन चारित्र्य माहिती मराठी
जेफ बेजोस हे मार्टिन ल्युथर किंग, अब्राहम लिंकन, ज्यूनिअर आणि जॉन एफ. केनेडी यांना आदर्श मानत. या व्यक्तिंनीच अमेरिकेला जगात पुढच्या रांगेत नेवून बसविले आहे असे ते मानतात.
जेफ बेजोस यांनी 1994 साली अमेझॉन डॉट कॉमची सुरूवात केली. सुरूवातीला एका कार गॅरेजमध्ये तीन संगणकांसह सुरू केलेली कंपनी ही आज जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते.
१२ जानेवारी १९६४ मध्ये न्यू मेक्सिकोमध्ये जेफ यांचा जन्म झाला. त्यांचा आईचं नाव जॅकी गेज जॉर्जसन, तर वडिलांचं नाव टेड जॉर्जसन असे आहे.
बेजोस यांनी वयाच्या 16 व्या वर्षी मॅकडोनाल्ड मध्ये त्यांच्या आयुष्यातील पहिली नोकरी स्विकारली. ते त्यावेळी आपल्या आजीकडे सुट्टीसाठी गेले होते. सोबत खेळण्यासाठी कोणी नसल्यामुळे त्यांनी कुठेतरी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. नोकरी साफसफाई कामगारची होती. त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. टेबलची साफसफाई करणे, केचपचे डाग पुसणे आणि इतर साफसफाईची गोष्टी ते करत. एकदा मॅकडोनाल्डच्या किचनमध्ये त्यांच्याकडून पाच गॅलन केचपच असलेला कंटेनर फुटला. बेजोस यांना ती साफसफाई करण्यास सांगितले. त्यांना हे काम आवडले नाही, पण काम करत असताना आलेले अनुभव त्यांना खूप काही शिकउन गेले.
पुढे बेजोस यांनी अभियांत्रीक क्षेत्रात संगणकीय शिक्षण पूर्ण केले. बँकींग ट्रस्ट या कंपनीत ते नोकरी करू लागले. त्यांना फिरायला नवनवीन लोकांना भेटायला आवडे. अमेरिकेत फीरण्याची संधी त्यांना याच कामाने दिली. प्रवासादरम्यान होणाऱ्या भेटीमधून, खरेदीमध्ये येणार्या अडचणींची माहिती त्यांना होत गेली. फिरण्याचा आणि बोलण्याचा सवईमुळे मार्केटिंगची कौशल्ये त्यांचात विकसित झाली.
पुढे काही काळातच ते बँकर्स ट्रस्टचे उपाध्यक्ष बनले. या काळामध्ये इंटरनेट वापरणार्यांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत होते. त्यांचा मनात ऑनलाइन करियरचा गोष्टी येत असत. त्यांनी विचार केला की, ई-मार्केटिंग कंपनी सुरू करावी. खूप विचार केल्यावर त्यांचा निर्णय पक्का झाला आणि नोकरी सोडली! 1994 मध्ये अमेझॉन या कंपनीची स्थापना केली. या निर्णयाचा त्यांचा आप्तेष्टांना धक्का बसला पण जेफ बेजोस डगमगले नाहीत. आपल्या आई-वडिलांच्या गॅरेजमध्ये त्यांनी लहानशी कंपनी सुरू केली. त्यांचेकडे गुंतवणूक करण्यासाठी मुबलक पैसा नव्हता. कंपनीसाठी एक लाख डॉलर्सची गुंतणूक करण्यासाठी आपल्या आजोबांना विनंती आजोबांनी गुंतवणूक केली.
ज्यावेळी त्यांचा वडिलांना ही गोष्ट माहित झाली तेंव्हा त्यांना इंटरनेट म्हणजेच काय हेदेखील माहित नव्हते. पण जेफ वर त्यांचा विश्वास होता. त्यांची पत्नी मॅकेन्झी यांना त्यांना मोलाची साथ दिली. बेजोस यांच्या कार्यक्षमतेवर तिचा विश्वास होता. सुरूवातीच्या काळात मॅकेन्झीने कंपनीमध्ये अकौंटींगची जबाबदारी पार पाडली. कुटुंबाची जबाबदारी पार पाडून मदत केली.
Amazon Founder Jeff Bezos Information Biography in Marathi language
ई-मार्केटिंग कंपनी असल्यामुळे ती इंटरनेटवर आधारीत होती. ग्राहक इंटरनेटवरूनच आपल्या ऑर्डर देणार होते. सुरूवातीला ऑनलाईन विकता येतील अशा 20 उत्पादनांची यादी तयार केली. यात पुस्तकांवर जास्त लक्ष केंद्रित केले. बेजोस यांची इच्छा जगातील सर्वात मोठा पुस्तकविक्रेता होण्याची होती. पुढे अमेझोन वरून सॉफ्टवेअर, डीव्हिडी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरने यांचा खप वाढला. अवघ्या दोन महिण्यामध्ये अमेझॉन ने अमेरिकेमधील 50 राज्यांमध्ये आपला विस्तार केला.
1998 साली गुगलचे संस्थापक Larry Page and Sergey Brin यांनी 250000 डॉलरची इनवेस्टमेंट अमेझॉन कंपनीत केली.
बेजोस यांच्या अमेझॉनमुळे ऑनलाईन खरेदी ही संकल्पना लोकप्रिय झाली असे टाइम्स या नियतकालिकाने म्हटले आणि इ.स.1999 साली टाइम या नियतकालिकाने जेफ बेजोस यांना पर्सन ऑफ द इअर किताब बहाल केला. कंपनीला 2001 मध्ये पहिल्यांदाच नफा झाला.
2013 साली अमेरिकेतील जुने, वॉशिंग्टन पोस्ट हे वर्तमानपत्र जेफ बेजोस यांनी 250 मिलिअन डॉलरला विकत घेतले.
पीपीटी सादर करण्यापेक्षा कंपनीतील कर्मचार्यांनी आपल्या संकल्पना 6 पाणी मेमोरेन्डमच्या स्वरूपात सादर कराव्यात अशी जेफ बेजोस यांची मागणी असते. यामुळे कल्पनाशक्ती चांगली होते. काम करण्याची कुशल पध्दती ते नेहमी शोधतच असतात. बेजोस यांचे भविष्यातील प्लान हा अंतराळ पर्यटनाचा आहे. अंतराळामध्ये सहली सुरू करण्याच्या त्यांचा मानस आहे. या सहलीसाठी प्रतिव्यक्ती तब्बल दीड कोटी रूपये एवढा खर्च येणार आहे. या सहलिसाठी कमर्शिअल रॉकेट बनविण्यासाठी सुरूवातदेखील झाली आहे.
जेफ बेजोस ही कुशाग्र बुध्दिमत्ता, अफाट इच्छाशक्ती, भविष्याचा वेध घेण्याची शक्ती आणि उत्तम मार्केटिंग कौशल्य असलेली व्यक्ती आहे. ज्या काळात इंटरनेट काय आहे हे लोकांना नीट समजत नव्हते त्या काळात इंटरनेटचा वापर करून ऑनलाई वस्तू विक्रीचा व्यावसायाचे स्वप्न त्यांनी बघितले. अशा भविष्याचा वेध घेणाऱ्या मूर्तीला सलाम!
-सागर गोरखे.
मित्रांनो प्रेरणादाई व्यक्तींचे जीवन चरित्र वाचण्यासाठी कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा भेट द्या. जेफ बेजोस यांचे जीवन चारित्र्य माहिती मराठी Amazon Founder Jeff Bezos Information Biography in Marathi language कसे वाटले हे आम्हाला प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा.
College Catta माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Leave a Reply